लांब सडक काळेभोर केस हे एका स्त्रीचे सौंदर्य मानले जाते. लांबसडक, चमकदार आणि घनदाट केस असावेत, अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. केस लहान असो किंवा मोठे आपल्याला केसांच्या वेगवेगळ्या हेअरस्टाईल करायला आवडतात. आपण आपल्या केसांच्या कितीही सुंदर हेअरस्टाईल केल्या तरी आपल्या कपाळावर असणारे लहान केस त्यांच्यामुळे आपली हेअरस्टाईल बिघडण्याची शक्यता असते. कपाळावर असणाऱ्या या लहान केसांना बेबी हेअर म्हटले जाते. हे बेबी हेअर आकाराने लहान असल्यामुळे ते आपल्या हेअरस्टाइलमध्ये बरोबर बसत नाहीत तसेच आखूड असल्याने त्यांना कानाच्या मागे लपवताही येत नाहीत. या बेबी हेअरमुळे आपल्या हेअरस्टाईलचा लूक बिघडू शकतो. अशा वेळी हे नको असलेले अनावश्यक बेबी हेअर कापून टाकण्याचा विचार करतो. परंतु असे बेबी हेअर कापल्यानंतर ते दिसताना अगदी विचित्र दिसते तसेच यामुळे कपाळ खूपच मोठे दिसते. अशावेळी काही सोप्या टीप्स वापरून आपण हे बेबी हेअर लपवू शकतो किंवा त्यांना नवीन लूक देऊ शकतो. असे हे छोटे - छोटे बेबी हेअर कापण्यापेक्षा त्यांनादेखील आपल्या हेअरस्टाइलचा हिस्सा बनविले तर ते दिसताना खूप सुंदर दिसेल. त्याचप्रमाणे आपल्या हेअरस्टाइलचा हिस्सा बनल्याने त्यांना कापण्याचा प्रश्नच उरत नाही. या बेबी हेअर्सचा आपल्या हेरस्टाईलमध्ये कसा समावेश करून घेऊ शकतो किंवा बेबी हेअर्सना कसा नवीन लूक देऊ शकतो ते समजून घेऊयात(How to hide baby hair : hair care tips).
नक्की काय करता येऊ शकत ?
१. करा कर्ल - आपण आपल्या या छोट्या बेबी हेअर्सना कर्ल म्हणजेच कुरळे करू शकतो. हेअरलाईनवरील बेबी हेअर्संना कर्ल करण्याच्या मशीनने कर्ल करून एक वेगळाच लूक देऊ शकता. हे केस कर्ल केल्याने किमान त्यांना आधीपेक्षा एक चांगला शेप प्राप्त होईल. हेअरलाईनवर असणाऱ्या या बेबी हेअर्सना कर्ल केल्याने, या लाईट कर्ल लूकमुळे तुमची मेन हेअरस्टाईल अधिकच उठून दिसेल.
२. साईड स्वीप करा - बेबी हेअर्सना साईड स्वीप करण्याचा एक उत्तम पर्याय आहे. जर बेबी हेअर्स दिसू द्यायचे नसतील तर त्यांना तुमच्या आवडीप्रमाणे किंवा ज्या दिशेने तुमच्या केसांचा भांग आहे त्या दिशेने वळवा. तुम्हाला जर तुमचे बेबी हेअर्स हायलाईट होऊ द्यायचे नसतील तर साईड स्वीप करून तुम्ही ते लपवू शकता. बेबी हेअर्सना साईड स्वीप करण्यासाठी त्यांना हेअरस्टाइलिंग जेल लावून घ्या. जेल लावल्यानंतर कंगव्याच्या मदतीने तुमच्या मेन हेअरस्टाईलमध्ये साईड स्वीप करून घ्या. असे केल्याने हे बेबी हेअर्स तुमच्या मेन हेअरस्टाईलचाच भाग वाटतील. साईड स्वीप केल्यामुळे ते हेअरस्टाईलमध्ये लपून हायलाईट होणार नाहीत.
३. मेस्सी बन किंवा ब्रेड - कपाळावर समोरच्या भागावर असणारे हे बेबी हेअर्स आपल्या हेअरस्टाइलचा लूक बिघडवतात. या बेबी हेअर्समुळे आपली हेअरस्टाईल मेस्सी म्हणजेच विस्कटलेली दिसते. अशावेळी याच बेबी हेअर्सचा वापर करून आपण एखादा मेस्सी बन किंवा मेस्सी ब्रेड बांधून आपल्या केसांना एक नवीन लूक देऊ शकतो. मेस्सी बन किंवा ब्रेड बांधताना बेबी हेअर्स सोबतच इतर केसांना देखील थोडा मेस्सी लूक दिल्याने आपली संपूर्ण हेअरस्टाईल उठून दिसते.
४. स्ट्रेट लूक - बेबी हेअर्सना स्ट्रेटनरच्या मदतीने स्ट्रेट लूक देऊन आपण एक नवीन हेअर स्टाईल करू शकतो. कपाळावर असणाऱ्या या बेबी हेअर्सना कर्ल केलेले जर तुम्हाला आवडत नसेल तर स्ट्रेट लूक नक्की ट्राय करून पाहा. जर तुम्ही मोकळे केस सोडणार असाल तर सर्वप्रथम कंगव्याने हे बेबी हेअर्स विंचरून घ्या. त्यानंतर बेबी हेअर्स स्ट्रेटनरच्या मदतीने स्ट्रेट करून घ्या. आता हे बेबी हेअर्स मध्ये भांग पाडून दोन्ही बाजूला विभाजीत करा. ते विभाजित करताना असे विभाजित करा की ते मागच्या लांब केसांमध्ये लपून जातील.