धावपळीच्या आयुष्यात स्वतःसाठी वेळ देणं काहींना जमतं तर काहींना जमत नाही. स्वतःच्या ओग्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेक गंभीर आजार निर्माण होतात. यासह केस आणि त्वचेवर देखील याचा दुष्परिणाम दिसून येतो. त्यामुळे वेळात वेळ काढून स्वतःकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे.
केसांची निगा राखण्यासाठी केस धुणे, केसांना वेळोवेळी तेल लावणे, योग्य आहाराचे सेवन करणे, या गोष्टी महत्वाच्या आहेत. दिवसभर केसांची निगा राखण्यासोबत रात्री देखील केसांची काळजी घेणं गरजेचं आहे. केसांच्या आरोग्यासाठी रात्रीचे केस मोकळे सोडून झोपावे की बांधून, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्यामुळे रात्रीच्या वेळी केसांची कशी काळजी घ्यावी हे पाहूयात(Should I leave my hair open or tie it up while I sleep?).
केस मोकळे सोडून झोपावे की बांधून?
काही लोकं केस बांधून झोपतात तर, काहींना केस मोकळे सोडून झोपण्याची सवय असते. परंतु, तज्ज्ञांच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती केस मोकळे सोडून झोपते, तेव्हा केस तुटण्यापासून इतर समस्या वाढू शकतात. त्यामुळे अनेक जण केस बांधून झोण्याचा सल्ला देतात. केसांची वेणी किंवा केस बांधून झोपल्याने केस कमी तुटतात.
केस बांधून झोपण्याचे फायदे
केस कमी तुटतात
केस बांधून झोपल्याने केस तुटण्याची शक्यता कमी होते. जेव्हा आपण केस मोकळे सोडून झोपतो, तेव्हा केस रुक्ष - निर्जीव होतात. झोपेत आपण एका कुशीतून दुसऱ्या कुशीकडे जेव्हा वळण घेतो, तेव्हा केस अधिक तुटतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर उशीभोवती केस पडलेले दिसतात. अशा स्थितीत झोपण्यापूर्वी केस बांधणे आवश्यक आहे.
एक चमचा दह्यात मिसळा फक्त एक गोष्ट, डार्क सर्कल होतील कमी, डोळे दिसतील सुंदर
केसांना नवी चमक येते
रात्री केस विंचरून झोपावे असा सल्ला देण्यात येतो. ज्यामुळे केसांमध्ये गुंता तयार होत नाही. यासह केस तुटत देखील नाही. केस विंचरण्यापूर्वी तेल लावा, त्यानंतर केस बांधून झोपा. ज्यामुळे केसांना तेलातील योग्य पोषण मिळते. व केस स्मूद - शाईन करतात.
पांढरे केस उपटल्याने बाकीचे केसही खरंच लवकर पांढरे होतात का? तज्ज्ञ सांगतात, खरंखुरं उत्तर
केस सिल्की होतात
आठवड्यातून दोन किंवा तीनवेळा केसांना तेल लावून मसाज करा. केसांना तेल लावून मसाज केल्याने स्काल्पमध्ये रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे केसांना आवश्यक ते सर्व पोषक तत्व मिळतात. केसांना मालिश करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे ताणही कमी होतो. केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. केस धुतल्यानंतर केस सिल्की आणि शाईन करतील.