Join us  

त्वचा खूप ऑइली असेल तर मॉइश्चरायझर लावावं का? त्यानं त्वचा सुंदर होते की चिपचिपी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2023 3:34 PM

Do You Need To Moisturize Oily Skin : ऑइली त्वचेला मॉइश्चरायझर लावलं तर त्वचा अजून तेलकट दिसते का? दुसरा उपाय काय?

आपल्यापैकी प्रत्येकाच्या स्किनचा पोत हा वेगळा असतो. तेलकट स्किन, नॉर्मल स्किन, कोरडी स्किन असे त्वचेचे अनेक प्रकार असतात. आपली स्किन ज्या प्रकारची असते त्या प्रमाणे आपण त्वचेची काळजी घेतो. स्किन कोणत्याही प्रकारची असो तिला मॉइश्चराइज करणे गरजेचे आहे. स्किनचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी स्किनला हायड्रेटिंग आणि मॉइश्चरायझिंग करणे फायदेशीर ठरते. प्रत्येकालाच मॉइश्चराइझ स्किन आवडते. स्किन मॉइश्चराइझ करण्यासाठी आपण स्किनवर वेगवेगळ्या प्रकारचे मॉइश्चराइझर लावतो. तेलकट स्किनला मॉइश्चराइझरची काहीच गरज नसते असा गैरसमज आपल्यापैकी काही जणांचा असतो. परंतु हे असे नसून, स्किनचे हायड्रेशन, कोरडेपणा व तेलकटपणा सारखा नसतो त्यामुळे सर्व प्रकारच्या त्वचेला हायड्रेशनची तसेच मॉइश्चरायझिंगची   गरज असते. तेलकट स्किनला मॉइश्चरायझिंग करण्यासाठी या घरगुती गोष्टींचा वापर करू शकतो. ऑइली स्किनला मॉइश्चरायझर लावण्याची गरज असते का? तसेच महागड्या मॉइश्चरायझरचा वापर न करता नैसर्गिक गोष्टींचा वापर करून तेलकट स्किनला कसे मॉइश्चराइज करू शकतो, हे समजून घेऊयात(Do You Need To Moisturize Oily Skin).   

१. ऑइली स्किनला मॉइश्चरायझर लावण्याची गरज असते का?

होय, ऑइली स्किनला मॉइश्चरायझर लावण्याची गरज असते. तेलकट स्किनला दीर्घकाळ निरोगी आणि तजेलदार ठेवण्यासाठी भरपूर मॉइश्चरायझरची गरज असते. तेलकट स्किनवर मॉइश्चरायझर वापरण्याआधी सर्वप्रथम संपूर्ण चेहेरा आधी स्वच्छ करून मगच मॉइश्चरायझर लावावे. तेलकट आणि नॉर्मल स्किनला वेगवेगळ्या पोषक तत्वांची गरज असते. यामुळेच मॉइश्चरायझरची निवड करताना आपल्या स्किनचा पोत ओळखून मगच त्यानुसार मॉइश्चरायझर निवडावे.

नक्की कोणत्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकतो?  

१. दूध - तेलकट स्किनला मॉइश्चरायझिंग करण्यासाठी दुधाचा वापर करावा. दुधामध्ये असणाऱ्या प्रोटीन आणि लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे तेलकट स्किनला डिप क्लिन होण्यास मदत होते. यासोबतच दुधाच्या वापरामुळे तेलकट स्किनमध्ये तेल तयार करण्याच्या प्रक्रियेचा वेग कमी केला जातो. तेलकट स्किनला मॉइश्चरायझिंग करताना कच्च्या दुधाचा वापर न करता गरम करून थंड केलेले दूध वापरा. 

२. ऐलोवेरा जेल - तेलकट स्किनसाठी ऐलोवेरा जेल हे  बेस्ट मॉइश्चरायझिंग आहे. आपण तेलकट स्किनसाठी जर कोणत्या मॉइश्चरायझरचा वापर करत असाल तर ते मॉइश्चरायझर वॉटर बेस्ड किंवा जेल बेस्ड असावे हे लक्षात ठेवा. रात्री झोपताना ऐलोवेरा जेल आपल्या संपूर्ण चेहेऱ्याला लावा आणि सकाळी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून टाका. यामुळे तुमची स्किन फार तेलकट न होता व्यवस्थित मॉइश्चरायझ केली जाईल. ज्यांची स्किन फार तेलकट आहे अशा व्यक्तींनी दिवसा ऐलोवेरा जेल लावून उन्हांत जाऊ नये, असे केल्यास तुमची स्किन अजूनच तेलकट दिसेल. 

३. गुलाब पाणी - तेलकट स्किनवरील तेलकटपणा दूर घालविण्यासाठी गुलाब पाणी हा उत्तम उपाय असू शकतो. तेलकट स्किनसाठी गुलाब पाणी हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. गुलाब पाण्याचा वापर केल्याने स्किन कोरडी पडणार नाही तसेच स्किनमधून येणारे एक्स्ट्रा ऑइल कमी करण्यास मदत होईल. गुलाब पाण्यात आपण दूध किंवा दही घालून ते स्किनवर लावू शकतो. दही व दूध हे उत्तम  स्किन एक्‍सफोलिएटर आहेत, यांचा वापर केल्यामुळे स्किन डिप क्लिन होण्यास मदत होते.

टॅग्स :ब्यूटी टिप्स