Join us  

हिवाळ्यात केसांना मेहेंदी लावली तर तब्येत बिघडते? मेहेंदी भिजवतानाच मिसळा ४ गोष्टी, केसांना सुंदर रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2023 3:11 PM

Should You Apply Mehendi On Hair During Winters : हिवाळ्यात केसांना मेहंदी लावल्यानंतर तब्येत बिघडू नये असं वाटत असेल तर करा हा उपाय

केसांना कृत्रिम आणि रसायनयुक्त कलर लावणं टाळून आपण केसांना मेहेंदी (Hair Mehendi) लावतो. मेहेंदी फक्त केसांना रंगवत नसून, केसांच्या निगडीत अनेक समस्या सोडवण्यास मदत करतात. केस निरोगी, काळे केस, केसातील कोंडा यासह स्काल्प क्लिन करण्यासाठी आपण मेहेंदीचा वापर करतो. बऱ्याच महिला दर दिड ते दोन महिन्यांनी मेहेंदी लावतात. पण हिवाळ्यात केसांना मेहंदी लावली की अनेकींना त्रास होतो.

मेहेंदी लावल्यानंतर डोकं थंड होत असल्यामुळे सर्दी, खोकल्याचाही त्रास होतो (Hair Care Tips). पण केसांची गरज असेल तर अवश्य मेहंदी लावावी असा सल्ला हेअर एक्सपर्ट देतात. पण हिवाळ्यात केसांवर रंग चढावा यासह आरोग्याला कोणताही त्रास होऊ नये असे वाटत असेल तर, कोणती काळजी घ्यावी? आरोग्याला त्रास होऊ नये, यासाठी केसांना कशापद्धतीने मेहेंदी लावावी? पाहूयात(Should You Apply Mehendi On Hair During Winters).

आवळ्याचं पाणी

हिवाळ्यात केसांना मेहेंदी पण आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नये असे वाटत असले तर, आवळ्याचं पाणी फायदेशीर ठरू शकते. आवळ्याच्या पाण्यात मेहंदी भिजवल्यास केसांना मेहेंदीचा रंग चांगला आणि लवकर चढतो. ज्यामुळे जास्त वेळ केसांवर मेहेंदी  ठेवण्याची गरज पडत नाही. तसेच आवळ्यामुळे केस पांढरे होण्यावर नियंत्रण मिळते. मेहेंदी भिजवताना एका वाटीत आवळ्याची पावडर घ्या, त्यात पाणी मिसळून वाटी गॅसवर ठेवा. पाणी कोमट झाल्यानंतर त्यात मेहेंदी पावडर घालून मिक्स करा. नंतर केस विंचरून घ्या. मेहेंदी केसांवर ४० मिनिटांसाठी लावून ठेवा. ४० मिनिटानंतर केस पाण्याने धुवा.

टाचांना भेगा? २ रुपयांची मेणबत्ती आणि चमचाभर मोहरी तेलाचा सोपा उपाय, दुखऱ्या टाचा होतील बऱ्या

तिळाचे तेल

हिवाळ्यात केसांना तिळाचं तेल लावल्यास केस काळेभोर होतात. हे तेल गुणानं गरम असतं. हिवाळ्यात केसांना मेहेंदी लावल्यानंतर सर्दी खोकला होवू नये, यासाठी तिळाचं तेल मेहेंदीत मिसळून लावा. शिवाय मेहेंदीत तिळाचं तेल मिक्स करून  लावल्याने केस लवकर रंगतात, यासह टाळूला उब मिळते. यासाठी मेहेंदी पाण्यात भिजत घाला. मेहेंदी भिजवल्यावर त्यात थोडं तिळाचं तेल गरम करुन मिक्स करा. तयार मेहेंदी केसांना लावून, थोड्या वेळानंतर केस धुवा.

लवंगाचं पाणी

लवंग फक्त जेवणाची रंगत वाढवत नसून, केसांसाठीही फायदेशीर ठरते. लवंगीमधे जिवाणूविरोधी गुणधर्म असतात. ज्याचा फायदा टाळूला होतो. केसांना मेहेंदी लावल्यानंतर शरीर थंड पडू नये म्हणूनही लवंग उपयोगात येते. यासाठी एका वाटीत पाणी घ्या, त्यात ७ ते ८ लवंगा घाला, पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. पाणी कोमट झाल्यानंतर त्यात मेहेंदी मिक्स करा, व केसांना लावा.

अर्धा बटाटा किसून त्यात मिसळा २ पिवळ्या गोष्टी, न्यू इयर पार्टीत चेहरा चमकेल

बीटाचा रस

मेहेंदी भिजवताना त्यात बीटाचा रस घातल्याने केसांना अधिक रंग चढतो. बीटाच्या रसात अँण्टिऑक्सिडण्टस, क, ई जीवनसत्त्व आणि बिटा केरोटीन असते. या गुणधर्मांमुळे केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. यासाठी मेहेंदी भिजवताना त्यात अर्धी वाटी बीटाचा रस घालून मिक्स करा. त्यानंतर केसांना मेहेंदी लावा. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स