Join us  

रात्री की सकाळी? केस नक्की केव्हा धुवावे? रात्री केस धुणे चूक हे खरे की खोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2024 10:10 AM

Should You Wash Hair In Morning Or Night : रात्रीच्या वेळेस केस धुतल्याने होतात खराब, गळतात फार..नक्की खरं काय?

केस धुण्याचा (Hair wash) काळवेळ असतो. केसांची निगा राखताना केस धुण्याकडेही तितकेच लक्ष द्यायला हवे. बहुतांश लोकं सकाळच्या वेळेस केस धुतात. तर काही जण रात्रीच्या वेळेस केस धुतात. पण रात्रीच्या वेळेस केस धुण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. अशावेळी केस सकाळच्या वेळेस धुवावे की रात्री? असा प्रश्न निर्माण होतो. अनेकांना व्यस्त जीवनशैलीमुळे सकाळच्या वेळेस केस धुण्यासाठी वेळ मिळत नाही (Hair Care tips).

केस धुण्यासाठी वेळ लागतोच, घाईगडबडीत सकाळच्या वेळेस केस धुणं होत नाही. त्यामुळे बरेच जण रात्रीच्या वेळेस केस धुतात. पण रात्री केस धुतल्याने केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. हे कितपत खरं?(Should You Wash Hair In Morning Or Night).

रात्रीच्या वेळेस केस धुण्याचे दुष्परिणाम

ओले केस उशीवर ठेवून झोपू नका

जेव्हा आपण केस धुतो, तेव्हा ते ओले होतात. ओले केस खूप जड असतात. ओले केस उशीवर किंवा पलंगावर ठेवून झोपल्याने केसांवर जास्त दबाव पडतो. दबावामुळे केसांची मुळे कमकुवत होतात. कमकुवत मुळांमुळे केस प्रचंड प्रमाणात गळतात. त्यामुळे जर आपण रात्रीच्या वेळेस केस धूत असाल, तर केस कोरडे करून झोपा.

उपाशीपोटी खा कढीपत्त्याची ४ पानं रोज, केस वाढतील आणि तारुण्यही वाढेल-पाहा उपाय

स्काल्पवर फंगल इन्फेक्शन

ओल्या केसांमुळे स्काल्पवर फंगल इन्फेक्शन होऊ शकते. जेव्हा अधिक वेळ केस ओले असतात, तेव्हा स्काल्पवर जंतू आणि बुरशीची वाढ होऊ लागते. फंगल इन्फेक्शनमुळे स्काल्पवर खाज सुटणे यासह केस गळण्याची समस्या निर्माण होते.

त्वचेची समस्या

रात्रभर त्वचा ओल्या केसांच्या संपर्कात राहिल्यामुळे मुरुम आणि त्वचेच्या इतर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रात्री केस धुणे टाळावे. पण जर आपण रात्रीच्या वेळेस केस धूत असाल तर, प्रथम केस पूर्णपणे कोरडे करणे फार गरजेचं आहे.

खोबरेल तेलात मिसळा स्वयंपाकघरातल्या २ साध्याच गोष्टी, केस गळती विसराल कायमची, वाढतील केस

केसांचा पोत होतो खराब

ओले केस घेऊन झोपल्याने केसांचा नैसर्गिक पोत खराब होतो. जेव्हा आपण ओले केस तसेच ठेवून झोपतो, तेव्हा ते लवकर कोरडे होत नाही. ज्यामुळे केसांचा पोत तर बिघडतोच, शिवाय असे वारंवार केस धुवून झोपल्याने केस खराब होतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी