Join us  

केसांचा होईल झाडू, वाढही खुंटेल, 'या' पाण्याने केस धुण्याची चूक अजिबात करू नका, कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2024 10:10 AM

Should You Wash Hair With Hot Water Or Cold : केस धुवत असताना कोणत्या चुका टाळाल्या हव्या..?

हिवाळा असो किंवा पावसाळा काही लोकं प्रत्येक ऋतूत कोमट पाण्यानेच आंघोळ करतात. शिवाय केस धुण्यासाठी काही लोकं फक्त कोमट पाण्याचाच वापर करतात. पण केस धुण्यासाठी फक्त कोमट पाण्याचा वापर करावा का? कोमट पाण्याने केस धुतल्याने केसांच्या निगडीत समस्या वाढतात का? बऱ्याचदा कोमट पाण्याने आंघोळ केल्याने केसांचे मोठे नुकसान होते. शिवाय केसांची मुळे सैल होतात (Hair care Tips). ज्यामुळे केस मोठ्या प्रमाणात गळतात, यासह केसांची वाढ खुंटते, त्यांची पुन्हा वाढ होत नाही. केस गळण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात.

पण जर केस जास्त प्रमाणात गळत असतील तर, टक्कल पडण्याची शक्यता नाकारता येत नाही (Hot or Cold Water). हिवाळ्यात जर केस गळतीचा त्रास होत असेल तर, कोमट पाण्याने आंघोळ करणे टाळा. कोमट पाण्याने केस धुण्याचे दुष्परिणाम किती? पाहूयात(Should You Wash Hair With Hot Water Or Cold).

या पाण्याने धुवू नका केस, अन्यथा केसांचा होईल झाडू

- जरा आपण गरम किंवा कोमट पाण्याने केस धुवत असाल तर, केस अधिक कोरडे होऊ शकतात. ज्यामुळे केसांचा पोत पूर्णपणे बिघडतो.

केस गळतात-टक्कल पडण्याची भीती वाटते? रोज खा 'हे' दाणे-भरभर केस वाढण्याचं सिक्रेट

- कोमट पाण्याने केस धुतल्याने स्काल्पवरील नैसर्गिक तेल कमी होते. ज्यामुळे स्काल्पवरील ब्लड सर्क्युलेशन योग्य प्रकारे होत नाही. शिवाय हेअर पोर्स देखील ओपन होतात. ज्यामुळे पोर्समध्ये घाण साचते, आणि केसांची वाढ योग्यरित्या होत नाही.

- केस धुण्यासाठी नेहमी माईल्ड शाम्पूचा वापर करा. शिवाय आहाराकडेही विशेष लक्ष द्या. आपल्या डाएटमध्ये हिरव्या पालेभाज्या, व्हिटॅमिन ई युक्त पदार्थांचे सेवन करा. याचा फायदा केसांना होईल.

रात्री की सकाळी? केस नक्की केव्हा धुवावे? रात्री केस धुणे चूक हे खरे की खोटे

- केसांना दर आठवड्याला तेल लावा. स्काल्पला तेल लावून मसाज करा. जेणेकरून स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन योग्यरित्या होईल.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स