Join us  

आंघोळ केल्यानंतर चुकूनही करू नका ४ चुका, स्किन खराब होण्याचे महत्वाचे कारण; आणि...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2024 10:40 AM

Shower mistakes which can ruin your skin : आपण आंघोळ करताना ४ चुका नियमित करतो, ज्यामुळे स्किन तर खराब होतेच, शिवाय..

स्वच्छतेसाठी आणि फ्रेश वाटावं म्हणून आपण प्रत्येक जण दररोज आंघोळ (Bathing Tips) करतो. सकाळी लवकर उठून आंघोळ केल्याने संपूर्ण दिवस फ्रेश जातो. शिवाय स्किन देखील स्वच्छ होते. पण स्नान करताना किंवा आंघोळ केल्यानंतर अशा काही चुका होतात, ज्यामुळे स्किन ग्लो करण्याऐवजी खराब होते. आता तुम्ही म्हणाल की आंघोळ केल्यानंतर स्किन कशी खराब होऊ शकते?

काही चुका आपल्याकडून नकळत घडतात, ज्यामुळे स्किन आणखीन खराब होते (Skin Care). शिवाय या चुकांमुळे चेहऱ्यावर लवकर वृद्धत्व दिसून येते. आंघोळ केल्यानंतर कोणत्या चुका करू नये? स्किनची काळजी घेताना आंघोळ केल्यानंतर काय करावे? पाहा(Shower mistakes which can ruin your skin).

मेकअप टाळा

स्वच्छ मन आणि शरीर निरोगी राहावे यासाठी दररोज आंघोळ करणं गरजेचं आहे. पण काही जण सकाळी ऑफिस जाण्याच्या घाईत आंघोळ केल्यानंतर लगेच चेहऱ्यावर मेकअप लावतात. जे स्किनच्या हेल्थसाठी योग्य नाही. आंघोळ केल्यानंतर मेकअप लावणे टाळावे. यामुळे स्किनचे पोर्स ब्लॉक होतात. शिवाय स्किन लवकर खराब होते.

धकधक गर्ल माधुरी दीक्षितसारखं चेहऱ्यावर येईल तेज, रोज फक्त १ गोष्ट चेहऱ्याला लावा

टॉवेलने अंग घासू नका

बऱ्याच जणांना आंघोळ केल्यानंतर टॉवेलने अंग घासण्याची सवय असते. पण यामुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. शिवाय स्किन निर्जीव दिसू लागते.

क्रीम लावणे टाळा

आंघोळीनंतर त्वचेवर रासायनिक क्रीम आणि मॉइश्चरायझर लावू नका. यामुळे चेहरा खराब होतो. शिवाय पिंपल्सची समस्या निर्माण होते.

लिंबू पिळून साल फेकून देता? घ्या खास फेसपॅकची कृती, चेहऱ्यावरचे सगळे डाग होतील गायब

बाथरूममध्ये जास्त वेळ घालवू नका

आपण जितका वेळ अंघोळ करू, तितकं शरीर स्वच्छ होतं, असा एक गैरसमज आहे. पण जास्त वेळ पाण्यात राहिल्याने स्किन खराब, निर्जीव होऊ शकते आणि त्वचेचे आजारही होऊ शकतात.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स