Join us  

श्रावणात शंकराला वाहतो तो बेल बहूगुणी, केस आणि त्वचेच्या तक्रारीही होतील दूर- बेल पानांचा औषधी उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2023 12:39 PM

Skin Care And Hair Care Tips: दर श्रावण सोमवारी महादेवाला आवर्जून बेल वाहतात. भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असणारा हा बेल आरोग्यदायी तर आहेच. पण त्वचेसाठी आणि केसांसाठीही खूप उपयुक्त आहे. (Use of bel or bilva patra for skin and hair)

ठळक मुद्देत्वचेवरील ॲक्ने, पिंपल्सचे डाग कमी करण्यासाठी बेलाचे पान उपयोगी ठरते.बेलपानांचा रस केसांना लावल्यास केसांचे आरोग्य सुधारते.

श्रावण सोमवारी बेलाच्या पानांना विशेष महत्त्व असते. बेलाच्या पानाला एवढे महत्त्व असण्याचे कारण म्हणजे तो खरोखरच औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. शरीराच्या दृष्टीने बेलाचे पान (bel or bilva patra) तर गुणकारी आहेच. पण केस आणि त्वचा यांचे सौंदर्य खुलविण्यासाठीही बेलपत्र उपयोगी ठरते. बेलाच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन्स आणि केसांसाठी उपयुक्त ठरणारे बिटा कॅरेटीन असते. शिवाय ॲण्टी ऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत म्हणूनही बेल ही वनस्पती ओळखली जाते. बेलाचे पान, फळ, खोड असे सगळेच गुणकारी आहेत.(Home remedies for pimples and acne)

 

केसांसाठी कसा करायचा बेलाचा उपयोग?१. तिळाच्या तेलात बेलफळाची साले आणि थोडा कापूर घालून ते करावे. थंड झाल्यावर त्या तेलाने केसांच्या मुळाशी हळूवार हाताने मसाज करावी. केसांची चांगली वाढ होण्यास मदत होईल.

रोज करा फक्त ३ व्यायाम, पोट-कंबर आणि मांड्यांवरची चरबी होईल भराभर कमी- बेढब शरीर दिसेल सुडौल

२. बेलपानांचा रस केसांना लावल्यास केसांचे आरोग्य सुधारते. केस धुण्याआधी २० ते २५ मिनिटे बेलपानांचा रस केसांना लावावा. आणि त्यानंतर गरम पाण्याने केस धुवून टाकावेत. केस गळण्याचे प्रमाण कमी होते. 

 

त्वचेसाठी बेलाचा उपयोग१. त्वचेवरील ॲक्ने, पिंपल्सचे डाग कमी करण्यासाठी बेलाचे पान उपयोगी ठरते. यासाठी बेलाची पाने मिक्सरमधून वाटून घ्या आणि त्याचा रस काढा. साधारण दोन चमचे बेलाच्या पानांचा रस असेल तर त्यामध्ये एक चमचा मध टाका.

बाळ अंगावर पीत असतानाही PCOD चा त्रास होतो का? लक्षणं काय नेमकी? तज्ज्ञ सांगतात..... 

हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि चेहऱ्यावर त्याचा लेप लावा. १५ ते २० मिनिटांनंतर चेहरा धुवून टाका. या उपायामुळे त्वचा तजेलदार होते. फोड कमी होऊन चेहऱ्यावरील डाग कमी होतात. 

 

टॅग्स :श्रावण स्पेशलत्वचेची काळजीकेसांची काळजीब्यूटी टिप्स