Join us  

Shreya Bugade Share Stylish Photo  : स्टायलिश लूकमध्ये विमानतळावर दिसलेल्या श्रेया बुगडेच्या पायातील जोडव्यांनी लक्ष वेधलं; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 2:11 PM

Shreya Bugade Share Stylish Photo : तिनं शेअर केलेला पांढऱ्या जॅकेटमधील फोटो तुफान चर्चेत आहे. या फोटोमध्ये ती विमानतळावर दिसत आहे. तिनं कॅरी केलेले गॉगल्स आणि पर्सनं सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे.

'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमात आपला अभिनय आणि व्यक्तिरेखांमुळे लोकांच्या घराघरात पोहोचलेली श्रेया बुगडे आपल्या डिसेंट लूकमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. छोट्या पडद्यावरील कॉमेडी रिएलिटी शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे हिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली. याचे अप्रतिम कॉमेडीच टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेया महाराष्ट्राला खळखळून हसवते. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ती नेहमीच वेगवेगळे फोटो शेअर करत असते.  (Actress shreya bugde share her stylish photo on social media)

सध्या तिनं शेअर केलेला पांढऱ्या जॅकेटमधील फोटो तुफान चर्चेत आहे. या फोटोमध्ये ती विमानतळावर दिसत आहे. तिनं कॅरी केलेले गॉगल्स आणि पर्सनं सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे.  खासकरून तिनं घातल्यात जोडव्यांची चर्चा सोशल मीडियावर आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर स्पृहा जोशीनं 'ओह' अशी कमेंट दिली आहे. स्वप्नील जोशीनं टस्वॅग' अशी कमेंट केली आहे. तर अभिज्ञा  भावेने 'मोहतर्मा कहा चली',  असं म्हणत रिएक्शन दिली आहे आहे. या फोटोवर जवळपास २६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

जोडव्यांची खासियत

भारतीय परंपरेनुसार लग्नानंतर स्त्रिया पायात जोडवी घालतात. मात्र गेल्या दशकापासून बदलत्या मॉडर्न जीवनशैलीनुसार जोडवी घालण्याचे प्रमाण काही अंशी कमी झाले होते. कारण राहणीमान फॅशनेबल आणि पायातील जोडवी ही जून्या फॅशनचे, त्यामुळे बहुतेक महिला ते वापरणे टाळायचे. आता अभिनेत्रींच्या पायातले जोडवे, त्याचे पॅटर्न्स चर्चेचा विषय ठरत आहेत.

प्रकार

टिव्ही मालिकांमध्ये लग्नानंतर सासरी येणाऱ्या नववधूच्या पायांत या प्रकारची जोडवी दिसतात. आजकाल प्लास्टिकची नाजूक दिसणारी जोडवी फॅशनमध्ये आहेत. ही जोडवी विविध रंग व डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत. यासोबतच रबर, मोती, स्टोनच्या जोडव्यांचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.  स्टीलची जोडवी विशेष आकर्षक दिसतात. स्टर्लिंग सिल्व्हर टो-रिंगने तर आंतरराष्ट्रीय बाजारातही स्थान मिळवले आहे.

प्लॅटिनमसारख्या व्हाईट मेटलची जोडवी फॉर्मल व कॅज्युअल अशा दोन्ही प्रसंगांना तुम्ही घालू शकता. मेटल व विना मेटल अशी दोन्ही प्रकारची जोडवी बाजारात उपलब्ध आहेत. बहुतांश जोडवी पायाच्या दुसऱ्या बोटात घातली जातात. परंतु बदलत्या फॅशनसोबत पायाच्या कुठल्याही बोटात तुम्ही ही घालू शकता. सध्याच्या  काळात तुमचं व्यक्तीमत्व खुलवण्यासाठी तसचं मॉडर्न लूक साठी जोडव्यांचे वेगवेगळे पॅटर्न्स तुम्ही  ट्राय करू शकता. 

टॅग्स :सेलिब्रिटीसोशल मीडियासोशल व्हायरलमराठीश्रेया बुगडेचला हवा येऊ द्या