Join us  

केसांना वारंवार मेहेंदी लावता? सतत मेहेंदी लावण्याचे ५ साईड इफेक्ट्स, सावधान..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2023 4:47 PM

Side-effects of mehndi (henna) you should be aware of! केसांसाठी मेहेंदी वरदान पण सतत लावल्याने होतील केस खराब, पाहा कधी आणि किती वेळा मेहेंदी लावावी..

केस पिकणे, केसात कोंडा तयार होणे, केस गळणे, या समस्येवर अनेकदा आपल्या आजीने मेहेंदी लावण्याचा सल्ला दिला असेल. केस पिकल्यावर बहुतांश महिला मेहेंदी लावताना दिसतात. मेहेंदी हे एक नैसर्गिक डाय म्हणून काम करते. केसांना मेहेंदी लावल्याने नैसर्गिक रंग येतो, केसांचे आरोग्य सुधारते, केसांचा पोत सुधारते आणि ते मऊ होतात, कोंडा होण्याची समस्या दूर होते, केसांची वाढ होते. यासह अनेक फायदे केसांवर होतात.

परंतु, अधिक मेहेंदी लावल्याने त्याचे दुष्परिणामही केसांवर होतो. ज्यामुळे केसांचे नुकसान देखील होऊ शकते. केसांना अधिक मेहेंदी लावल्याने कोणते दुष्परिणाम होतात ते पाहूयात(Side-effects of mehndi (henna) you should be aware of!).

केसांचे रंग लवकर बदलत नाही

केसांना मेहेंदी लावल्याने केस लाल किंवा काळे होतात. वारंवार केसांना मेहेंदी लावल्याने, त्याचा रंग लवकर निघत नाही. अशा परिस्थितीत, जर आपल्याला इतर कोणताही रंग केसांना लावायचे असेल तर, आपण लावू नाही शकत. केसांवर ते रंग लवकर चढत नाही.

फक्त कपाळ खूप काळे पडले आहे? ५ घरगुती उपाय - काळेपणा होईल कमी

ड्राय हेअर

केसांना मेहेंदी वारंवार लावल्याने केस कोरडे होऊ शकतात. कारण मेहेंदीमध्ये तेल नसते, ज्यामुळे केस ड्राय होतात. मेहेंदीमध्ये लॉसन नावाचा डाई असतो, जो एक प्रकारचा केराटिन आहे, जो केसांना प्रथिने पुरवून हेअर फॉलीक्सचे बाह्य थर बनवण्यास मदत करते. याचा जास्त वापर केल्याने केस कोरडे होऊ शकतात.

केसांची चमक कमी होते

केसांना जास्त वेळ मेहेंदी लावल्याने केसांची आर्द्रता कमी होऊ लागते, त्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव दिसतात.

बीटरूटची साल फेकून देता? फक्त २ साहित्यांचा वापर करून बनवा हेअर मास्क, केसांची समस्या होईल दूर

केसांचा पोत खराब होतो

केसांना जास्त मेहेंदी लावल्याने केस निर्जीव दिसतात, ज्यामुळे केसांचा पोतही बिघडू लागतो. केसांच्या खराब पोतमुळे केस लवकर तुटतात.

ओपन पोर्समुळे चेहरा खराब दिसतो, ब्लॅकहेड्स वाढलेत? ३ उपाय, चेहरा दिसेल स्वच्छ-चमकदार

मेहेंदी कशी लावायची

मेहेंदी लावताना लक्षात ठेवा की, मेहेंदी केसांना लावल्यानंतर ५० मिनिटापेक्षा अधिक वेळ ठेऊ नये. याशिवाय महिन्यातून एकदाच मेहेंदी लावावी. मेहेंदी लावल्यानंतर हेअर मास्क लावायला विसरू नका, अन्यथा केस खराब होऊ शकतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी