लहान मुलांचं मैदानी खेळ खेळण्याचं प्रमाण कमी झालेलं असलं तरी घरातल्या घरात त्यांचा खूप धिंगाणा चालू असतो. दिवसभर मस्ती करतात, जमिनीवर कुठेही लोळतात.. अंगणात, बाल्कनीमध्ये, मातीमध्ये खेळतात. त्यामुळे मग काही अपवाद सोडले तर जवळपास सगळ्याच लहान मुलांचे हाताचे कोपरे, गुडघे, पायाचे घोटे काळे पडलेले दिसतात. आंघोळ करताना साबण लावून ते स्वच्छ होत नाहीत. म्हणूनच आता त्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा (simple and easy home remedy to clean kids knee and elbow). हा उपाय करण्यासाठी आपण सगळे घरातलेच पदार्थ वापरणार आहोत. त्यामुळे मुलांच्या त्वचेसाठी हा उपाय नक्कीच सुरक्षित आहे. तरीही एकदा पॅचटेस्ट करून घेणं अधिक चांगलं.(how to remove tanning or blackness from kids knee and elbow?)
मुलांच्या गुडघ्यांचा काळेपणा कमी करण्यासाठी उपाय
मुलांच्या गुडघ्यांचा काळेपणा कमी करण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीची माहिती aanchalnavneetjain या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये १ चमचा तांदळाचे पीठ घ्या.
कुकरची शिट्टी होताच आतलं पाणी फसफसून बाहेर येतं? ३ टिप्स- पाणी कुकरबाहेर येणार नाही
त्या पिठामध्ये एक चमचा बेसन, अर्धा चमचा कॉफी पावडर आणि चिमूटभर हळद घाला.
यानंतर त्यामध्ये आता एक ते दिड चमचा खोबरेल तेल आणि अगदी थोडंसं पाणी घालून त्याची थोडी घट्ट पेस्ट कालवून घ्या.
आता हा लेप तुमच्या मुलांच्या गुडघ्यांना, हाताच्या कोपऱ्यांना, पायाच्या घोट्याला लावा. त्यानंतर ५ ते ७ मिनिटे तो तसाच राहू द्या.
त्यानंतर त्यावर थोडंसं पाणी किंवा गुलाब जल शिंपडा आणि हळूहळू चोळून लेप काढून घ्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. एक दिवसाआड ४ ते ५ वेळा हा उपाय केल्यास मुलांच्या अंगावरचं टॅनिंग पुर्णपणे निघून जाईल.
जुन्या साड्यांपासून लेकीसाठी शिवा सुंदर ड्रेस- ७ युनिक आयडिया- लाखात उठून दिसेल तुमची लेक
मोठ्या व्यक्तींसाठीही हा उपाय चांगला आहे. मान, गळा, हात, पाय यासोबतच चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी करण्यासाठीही हा उपाय करता येईल.