Lokmat Sakhi >Beauty > Long Lasting Lipstick: ओठांवरची लिपस्टिक तासनतास राहील जशीच्यातशी! कियारा आडवाणी सांगते खास ट्रिक

Long Lasting Lipstick: ओठांवरची लिपस्टिक तासनतास राहील जशीच्यातशी! कियारा आडवाणी सांगते खास ट्रिक

Makeup Tips By Kiara Advani For Long Lasting Lipstick: ओठांवरची लिपस्टिक तासनतास जशासतशीच ठेवायची असेल तर अभिनेत्री कियारा आडवाणीने सांगितलेली ही ट्रिक वापरून पाहा..(makeup tips for long lasting lipstick)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2025 17:03 IST2025-03-20T16:11:10+5:302025-03-20T17:03:14+5:30

Makeup Tips By Kiara Advani For Long Lasting Lipstick: ओठांवरची लिपस्टिक तासनतास जशासतशीच ठेवायची असेल तर अभिनेत्री कियारा आडवाणीने सांगितलेली ही ट्रिक वापरून पाहा..(makeup tips for long lasting lipstick)

simple and easy tips by Kiara advani for long lasting lipstick, makeup tips for long lasting lipstick | Long Lasting Lipstick: ओठांवरची लिपस्टिक तासनतास राहील जशीच्यातशी! कियारा आडवाणी सांगते खास ट्रिक

Long Lasting Lipstick: ओठांवरची लिपस्टिक तासनतास राहील जशीच्यातशी! कियारा आडवाणी सांगते खास ट्रिक

Highlightsआपण लावलेली लिपस्टिक ओठांवर जास्तीतजास्त तास तशीच राहावी, पाणी प्यायल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर ती जाऊ नये असं वाटतं?

लिपस्टिक आता जवळपास प्रत्येकीच्याच मेकअप रुटीनचा भाग झाला आहे. पुर्वी टिकली, पावडर, काजळ असं प्रत्येकीच्याच मेकअप किटमध्ये असायचं. त्यात आता लिपस्टिकसुद्धा अगदी अलगदपणे येऊन बसली आहे. ऑफिसला जायचं असो, ट्रिपला जायचं असो किंवा मग कॅज्युअली असंच सहज बाहेर फिरायला जायचं असो.. बहुतांशजणी हमखास लिपस्टिक लावतात. लिपस्टिक लावल्यानंतर प्रत्येकीचंच सौंदर्य थोडं आणखी खुलून येतं यात वादच नाही.. म्हणूनच आपण लावलेली लिपस्टिक ओठांवर जास्तीतजास्त तास तशीच राहावी, पाणी प्यायल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर ती जाऊ नये असं वाटणं अगदी साहजिक आहे (makeup tips for long lasting lipstick). त्यामुळेच अभिनेत्री कियारा आडवाणीने सांगितलेली ही एक मस्त ट्रिक वापरून पाहा..(Makeup Tips By Kiara Advani For Long Lasting Lipstick)

 

ओठांवरची लिपस्टिक जास्तीत जास्त तास टिकून राहण्यासाठी टिप्स

ओठांवरची लिपस्टिक Long Lasting असावी, यासाठी कियारा आडवाणी काय करते, याविषयी माहिती सांगणारा तिचा व्हिडिओ anupriyaa_srivastavaa या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

टरबूज खरेदी करायचंय? साध्या सोप्या ३ टिप्स- काही सेकंदातच ओळखा कोणतं टरबूज गोड निघणार

यामध्ये कियारा असं सांगते आहे की सुरुवातीला तुम्हाला पाहिजे तशी लिपस्टिक ओठांवर लावून घ्या. तिचे दोन ते तीन कोट द्या. त्यानंतर एक टिश्यू पेपर घ्या आणि तो दोन्ही ओठांच्यामध्ये ठेवून त्यावर हलकासा दाब द्या. ओठांवरची अतिरिक्त लिपस्टिक त्याद्वारे टिपली जाईल. यानंतर तुम्हाला पाहिजे असेल तर आणखी एकदा ओठांवर लिपस्टिक फिरवून घ्या..


 

ओठांवरची लिपस्टिक टिकवून ठेवण्यासाठी या टिप्सही पाहा.. 

ओठांवरची लिपस्टिक जास्तीतजास्त वेळ जशासतशी राहावी म्हणून तुम्ही या काही गोष्टीसुद्धा करून पाहू शकता..

चॉकलेटचा छोटासा तुकडा बघा काय कमाल करतो! वाचा चॉकलेट खाण्याचे ३ जबरदस्त फायदे

१. ओठांवर लिपबाम लावून लगेच त्यावर लिपस्टिक लावू नका. लिपबाम लावल्यानंतर काही मिनिटांचा वेळ जाऊ द्या. लिपबाम ओठांवर व्यवस्थित सेट झाला की ओठांवर अगदी थेंबभर फाउंडेशन व्यवस्थित पसरवून लावा आणि त्यानंतर त्यावर लिपस्टिक लावा. ती नक्कीच जास्त वेळ टिकेल.

२. ओठांवर लिपस्टिक लावल्यानंतर त्यावर थोडी ट्रान्सलुसंट पावडर लावा. त्यानंतर अतिरिक्त पावडर टिश्यू पेपरने टिपून घ्या. यामुळेही तुमच्या ओठांवरची लिपस्टिक नक्कीच जास्त वेळ टिकायला मदत होईल. 

 

Web Title: simple and easy tips by Kiara advani for long lasting lipstick, makeup tips for long lasting lipstick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.