Join us  

Skin Care: इन्स्टंट ग्लो मिळविण्याचा सोपा आणि झटपट उपाय... फक्त ३ पदार्थ, दररोज लावा, चमकत रहा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2022 5:56 PM

Skin Care: कार्यक्रमासाठी जायचं असो किंवा मग नेहमीसारखं ऑफिसला... चेहरा सुंदर, चमकदार दिसावा, असं वाटत असेल तर हा प्रयोग करून बघाच....(Simple solution for instant glow)

ठळक मुद्देत्वचा चांगली ठेवण्यासाठी, टापटीप दिसण्यासाठी घरच्याघरी करता येतील, असे सोपे उपाय प्रत्येकीला पाहिजेच असतात,म्हणूनच तर हा घ्या एक सोपा उपाय..

आजकाल कार्यक्रम असेल तेव्हाच किंवा एखादा खास प्रसंग असतानाच छान दिसावं किंवा पार्लरमध्ये जाऊन यावं असं काही उरलेलं नाही. प्रत्येक क्षेत्राचंच स्वरूप एवढं बदललं आहे की वर्किंग वुमनला अगदी प्रत्येक दिवशी अटेंटीव्ह रहावंच लागतं. तिच्या दिसण्याकडे, तिच्या चेहऱ्याकडे लक्ष देऊन त्वचेची काळजी घ्यावीच लागते. त्यामुळेच तर त्वचा चांगली ठेवण्यासाठी, टापटीप दिसण्यासाठी घरच्याघरी करता येतील, असे सोपे उपाय प्रत्येकीला पाहिजेच असतात, जेणेकरून वारंवार पार्लरमध्ये (how to get instant glow) जाण्याची गरज पडणार नाही. म्हणूनच तर हा घ्या एक सोपा उपाय..(home remedies) 

 

त्वचेची काळजी कशी घ्यावी, हे सांगणारा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या beautifulyoutips या पेजवर शेअर करण्यात आला आहे. फक्त ३ पदार्थ वापरून घरच्याघरी त्वचेला तजेलदार, अधिक सुंदर कसे बनवायचे, हे यामध्ये सांगितले आहे.हा उपाय करण्याचे फायदे- त्वचेवर छान चमक येऊन त्वचा तुकतुकीत दिसू लागते.- डोळ्यांखालची काळी वर्तूळे कमी होतात.- चेहऱ्याची त्वचा एकसमान दिसू लागते.- त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते.

 

कसे करायचे फेसपॅक- हे ब्यूटी फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला फक्त ३ गोष्टी लागणार आहेत.- हा उपाय करण्यासाठी एका बाऊलमध्ये ४ टीस्पून कोरफडीचा गर घ्या. त्यामध्ये २ व्हिटॅमिन ई कॅप्सूल फोडून टाका.- आता त्यात अर्धा टीस्पून कॉफी टाका.- हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि हा लेप चेहऱ्याला लावून मसाज करा. - ५ मिनिटे हळूवार हाताने मसाज केल्यानंतर १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. - हा लेप तुम्ही हवाबंद डबीत घालून फ्रिजमध्ये ठेवल्यास तो ६ ते ७ दिवस चांगला राहतो. - हा लेप तुम्ही फेस मास्क किंवा डे क्रिम म्हणूनही वापरू शकता. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी