Join us  

पावसाळ्यात हात -पाय काळवंडले? केमिकल प्रॉडक्ट्स सोडा; दूध- कणकेचा करा ‘हा’ सोपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2024 10:00 AM

Simple DIY Wheat Flour-Based Face Packs To Lighten Skin : टॅनिंग घालवण्यासाठी घरातच तयार करा टॅनिंग रिमुव्हल क्रीम..

आजकाल टॅनिंगची समस्या खूप कॉमन झाली आहे (Beauty Tips). पावसाळ्यात हात - पाय आणि चेहराही काळवंडतो. टॅनिंग घालवण्यासाठी आपण विविध ब्यूटी उत्पादनांचा वापर करून पाहतो (Skin Care Tips). पण बऱ्याचदा टॅनिंग रिमुव्हल क्रीमनेही चेहऱ्याचा काळपटपणा निघत नाही (Tanning Removal). आपण सनक्रीम किंवा टॅनिंग रिमूव्हर क्रीमचा देखील वापर करतो. पण यात देखील केमिकल रसायनांचा वापर होतो. ज्यामुळे स्किन खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जर आपल्याला घरगुती उपायांनी हात - पाय आणि चेहऱ्यावरचं टॅनिंग घालवायचं असेल तर, दूध आणि गव्हाच्या पिठाचा सोपा उपाय करून पाहा. कच्च्या दुधामुळे त्वचेवरचे डाग दूर होतात. दुधातील लॅक्टिक अॅसिड त्वचा अधिक मुलायम आणि चमकदार करते. काळवंडलेला चेहरा पुन्हा टवटवीत दिसावा असं वाटत असेल तर, दूध आणि गव्हाच्या पिठाचा सोपा उपाय करून पाहा(Simple DIY Wheat Flour-Based Face Packs To Lighten Skin).

टॅनिंग रिमुव्हल क्रीम तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

दूध

टूथपेस्ट

तिशीतच हाडं ठणकायला लागली? २ पालेभाज्या खा; मिळेल कॅल्शियम भरपूर-हाडं होतील मजबूत

शाम्पू

गव्हाचं पीठ

इनो

काळवंडलेला चेहरा स्वच्छ तजेलदार करण्यासाठी उपाय

- सर्वात आधी एका बाऊलमध्ये २ चमचे दूध घ्या. त्यात एक चमचा टूथपेस्ट, एक चमचा शाम्पू, एक चमचा गव्हाचं पीठ, अर्धा चमचा इनो किंवा बेकिंग सोडा घालून चमच्याने साहित्य एकजीव करा.

चमचाभर मध आणि 'या' काळ्या बियांचा उपाय, वजनही होईल कमी आणि त्वचाही चमकेल

- मिश्रण एकजीव झाल्यानंतर हाताला किंवा पायांना क्रीम लावून थोड्या वेळासाठी मसाज करा. नंतर १० मिनिटाने ओल्या कापडाने पुसून काढा. आपण या पेस्टचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. यामुळे स्किन क्लिअर दिसेल.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीमोसमी पाऊस