खोबरेल तेल केसांचे (Coconut Oil) सरंक्षण करते. आणि केसांचे (Hair Care Tips) अनेक समस्या दूर करते. आठवड्यातून एक किंवा २ वेळा आपण केसांना खोबरेल तेल लावून मसाज करतो (Hair Tips). बाजारात विविध प्रकारची तेलं मिळतात. अमक्या तेलामुळे केसांना हा फायदा होईल, तमक्या तेलामुळे केसांची ही समस्या दूर होईल असे अनेक दावे विविध कंपन्यांद्वारे केले जातात. मात्र केसांची उत्तम वाढ व्हावी आणि केस दिर्घकाळ चांगले राहावेत यासाठी पारंपरिक खोबरेल तेल बेस्ट मानले जाते.
खोबरेल तेलात व्हिटॅमिन्स आणि फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असल्याने केसांच्या वाढीसाठी मदत होते. पण अनेकदा फक्त खोबरेल तेलामुळेही केसांची योग्य वाढ होत नाही. जर केसांच्या अनेक समस्या सोडावयाचे असतील तर, खोबरेल तेलात मुठभर कडीपत्ता घाला. या घरगुती तेलामुळे केसांच्या योग्य वाढीस आणि पांढऱ्या केसांपासून सुटका होईल(Simple & Easy Hair Oil for Faster Hair Growth, Curry leaves and Coconut Oil).
कडीपत्ता आणि खोबरेल तेलाचा वापर
कडीपत्त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि अमीनो ॲसिड्स चांगल्या प्रमाणात असतात. यासह त्यात बीटा-कॅरोटीन असते, जे केसांच्या कूपांना भरपूर पोषण देते. ज्यामुळे केसांच्या वाढीस मदत करते. आपण खोबरेल तेलात कडीपत्ता घालून केसांना लावू शकता. ज्यामुळे केसांच्या वाढीस मदत होईल.
कंबर, मांड्या - थुलथुलीत पोट कमीच होत नाही? कोमट पाण्यात घाला 'या' फळाचा रस; वजन घटेल - दिसाल सुडौल
केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेल आणि कडीपत्त्याचा वापर कसा करावा?
- सर्वात आधी एक पॅन घ्या. त्यात खोबरेल तेल घाला. गॅस मंद आचेवर ठेवा. खोबरेल तेल कोमट झाल्यावर मुठभर कडीपत्ता घाला. तेलाला उकळी फुटल्यानंतर गॅस बंद करा. थंड होण्यासाठी पंख्याखाली ठेवा. नंतर कोमट तेल केसांना आणि टाळूला लावून मसाज करा.
- आठवड्यातून २ वेळा या तेलाने स्काल्प आणि केसांना मसाज करा. आपण त्यात कडूलिंबाची पानं देखील घालू शकता. यामुळे केसांची वाढ चांगली होईल आणि केस मजबूत होतील. शिवाय कोंडाही दूर होईल.
फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल
- खोबरेल तेलात आपण दालचिनी पावडरही घालू शकता. यामुळे कोंड्याची समस्याही दूर होईल. यासह केस गळतीही दूर होईल. यापैकी १ पदार्थ आपण खोबरेल तेलात घालू शकता. यामुळे केस दाट होतील.