Join us  

झोपण्याआधी चेहऱ्याला १ गोष्ट लावा; पिग्मेंटेशनचे डाग निघून जातील- त्वचा दिसेल सुंदर, ग्लोईंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 2:56 PM

Simple Home Remedies For Hyperpigmentation : पिग्मेंटेशनपासून बचाव करण्यासाठी उन्हात कमीत वेळ जा. चांगल्या क्वालिटीचे एसपीएफ सनस्क्रीन लावा.

चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या (Acne and pimple Spots) त्वचेचं नैसर्गिक सौंदर्य हिरावतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू, तेल उपलब्ध आहेत. पण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही पिग्मेंटेनशनची समस्या टाळू शकता. यामुळे डाग, सुरुकत्या कमी होण्यास मदत होईल. (Powerful Home Remedies to Get Rid of Skin Pigmentation)

पिग्मेंटेशन काढून टाकण्यासाठी तुम्हाला होममेड सिरम बनवावे लागेल. त्यासाठी तुम्हाला १ चमचा नारळाचं तेल, ४ ते ५ चमचे ग्लिसरीन, व्हिटामीन ई कॅप्सूल, अर्धा चमचा मध, १ चमचा एलोवेरा जेल लागेल. हे साहित्य व्यवस्थित एकजीव करा. यात जराही गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्या.  तुम्ही हे मिश्रण १५ दिवसांसाठी एका डब्यात साठवून ठेवू शकता. (Simple Home Remedies For Hyperpigmentation)

हे सिरम चेहऱ्याला कसे लावावे

रोज रात्री हेअर सिरम अप्लाय करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर तुम्ही हेअर सिरम चेहऱ्यावर अप्लाय करू शकता २ ते ३ मिनिटं व्यवस्थित मसाज करा. त्यानंतर १ ते २ तासांसाठी हे सिरम चेहऱ्यावर सुकण्यासाठी ठेवा.

रोज गळून केस विरळ झाले? महिनाभर ८ पदार्थ खा, भराभर वाढतील केस, दाट-शायनी दिसतील

त्यानंतर ठंड पाण्याने चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा. या उपायाने चेहरा चमकदार दिसेल आणि डाग हळूहळू कमी होतील. हे सिरम लावल्यानंतर चेहऱ्यावर फेस वॉश लावू नका  सिरम क्लिन केल्यानंतर तुम्ही नाईट क्रिम लावू शकता.

पिग्मेंटेशनपासून बचाव करण्यासाठी उन्हात कमीत वेळ जा. चांगल्या क्वालिटीचे एसपीएफ सनस्क्रीन लावा. रात्री चेहऱ्याला एलोवेरा जेल लावून सकाळी गरम पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावर  चांगला ग्लो येईल. ग्रीन टी ची टी बॅग थंड करून पिग्मेंटेनशन असलेल्या ठिकाणी लावा. या उपायामुळे चेहऱ्यावर ग्लो दिसून येईल.

ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? स्वयंपाकघरातील हा पदार्थ लावा; डाय न वापरता काळे होतील केस

कच्चा बटाटा त्वचेला पोषण देतो. कच्च्या बटाट्याच्या वापरानं पिग्मेंटेशनपासून आराम मिळतो.  लिंबू आणि मधांचे मिश्रण १० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर चेहरा धुवा यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल. चेहरा पुसताना कधीच टॉवेलने जोरजोरात घासू नका. यामुळे पिग्मेंटेशची समस्या उद्भवू शकते. चेहरा मॉईश्चराईज ठेवण्यासाठी टॉवेलने हलक्या हाताने टॅप करा.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स