Join us  

काजळ लावलं की पसरतं, डोळ्याखाली काळं होतं? २ सोप्या ट्रीक, डोळे दिसतील सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2022 12:50 PM

Simple Makeup Tips for Applying Perfect Kajal Diwali Makeup : जास्त वेळ काजळ आहे तसेच छान डोळ्यांवर राहावे यासाठी २ सोपे उपाय

ठळक मुद्दे सणावाराला काजळ लावून डोळे सुंदर दिसावेत असे वाटत असेल तर काही सोप्या ट्रीक्स माहिती असणे आवश्यक आहे.पसरत असल्याने अनेकदा आपल्याला आवडत असून किंवा छान दिसत असूनही काजळ लावता येत नाही.

काही वेळा आपण आवरायचं म्हटलं की फक्त काजळ आणि लिपस्टीक लावतो. या दोन्ही गोष्टी आपल्या चेहऱ्याला नकळत हायलाईट करतात. तर काही वेळा काजळ पसरतं म्हणून आपण ते लावायचं टाळतो. काजळामुळे डोळे छान उठावदार दिसतात म्हणून काजळ लावणे आता अगदी सामान्य आहे. सणावाराला आवरताना तर काजळ आवर्जून लावले जाते. पण काही वेळाने हे काजळ आपल्या डोळ्यांखाली पसरते आणि सगळा चेहरा अचानक काळा दिसायला लागतो. कोणत्याही कंपनीचे कितीही भारीचे काजळ लावले तरी थोड्या वेळानी ते पसरल्याने आपल्या चेहऱ्याची पार रया होऊन जाते. अशावेळी आपण आवरलेले दिसण्याऐवजी जास्त अवतारात आहोत असे दिसते (Simple Makeup Tips for Applying Perfect Kajal Diwali Makeup). 

(Image : Google)

त्यामुळे आपल्याला आवडत असून किंवा छान दिसत असूनही काजळ लावता येत नाही. काही दिवसांवर दिवाळीसारखा मोठा सण आला आहे. अशावेळी देवाला जाण्यासाठी, नातेवाईक मित्रमंडळी यांना भेटण्यासाठी आपण आवर्जून आवरतो. त्यामुळे सणावाराला काजळ लावून डोळे सुंदर दिसावेत असे वाटत असेल तर काही सोप्या ट्रीक्स माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आपण जास्त वेळ काजळ आहे तसेच छान डोळ्यांवर राहावे यासाठी २ सोपे उपाय पाहूयात...

(Image : Google)

१. चेहऱ्यावर तयार होणाऱ्या तेलामुळे अनेकदा आपले काजळ पसरते. अशावेळी डोळ्यांखाली कॉम्पॅक्ट पावडर किंवा कोणतीही टाल्कम पावडर लावावी. या पावडरमुळे डोळ्यांखाली तेल जमा होऊन काजळ लवकर पसरत नाही. त्यानंतर डोळ्यांच्या वॉटर लाईनवर काजळ लावावे आणि पुन्हा एकदा हीच पावडर लावावी.  

२. काही वेळा अशाप्रकारे पवडर लावून किंवा स्मज प्रूफ काजळ घेतलं तरी ते थोडा वेळानी पसरतं. अशावेळी काजळ लावल्यावर त्याखाली आय लायनरने एक बारीक लाईन काढावी. त्यामुळे डोळे आहेत त्यापेक्षा जास्त हायलाईट तर होतातच पण काजळ पसरण्याचीही चिंता नसते.  

टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्सदिवाळी 2022