Lokmat Sakhi >Beauty > कशाला हवा विकतचा लिप बाम? गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच करा नॅचरल लिप कलर- स्वस्तात मस्त

कशाला हवा विकतचा लिप बाम? गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच करा नॅचरल लिप कलर- स्वस्तात मस्त

How To Make Lip Balm At Home Using Rose Petals: गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून घरच्याघरी खूप सोप्या पद्धतीने लिप बाम तयार करता येतो. तो कसा करायचा ते पाहूया... (natural lip colour)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2024 09:11 AM2024-02-24T09:11:08+5:302024-02-24T09:15:02+5:30

How To Make Lip Balm At Home Using Rose Petals: गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून घरच्याघरी खूप सोप्या पद्धतीने लिप बाम तयार करता येतो. तो कसा करायचा ते पाहूया... (natural lip colour)

Simple method of making lip balm at home, How to make lip balm at home using rose petals, How to make natural lip colour at home? | कशाला हवा विकतचा लिप बाम? गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच करा नॅचरल लिप कलर- स्वस्तात मस्त

कशाला हवा विकतचा लिप बाम? गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच करा नॅचरल लिप कलर- स्वस्तात मस्त

Highlightsगुलाबाच्या पाकळ्या वापरून तुम्ही घरच्याघरी खूप चांगला आणि तुमच्या ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग देणारा लिप बाम तयार करू शकता.

हल्ली त्वचेचा ड्रायनेस खूप वाढला आहे. त्यातल्या त्यात ओठ कोरडे पडल्याने तर त्यांना रोजच लिप बाम लावावा लागतो. त्यामुळे आता तर फक्त हिवाळ्यातच नाही तर उन्हाळा आणि पावसाळ्यातही बहुतांश जणी लिप बामचा वापर हमखास करतातच. विकत मिळणारे लिप बाम तर आहेतच. पण घरच्याघरी १०० टक्के शुद्ध असणारा, कोणतेही केमिकल्स नसणारा लिप बाम तयार करणे मुळीच अवघड नाही (Simple method of making lip balm at home). अवघ्या काही मिनिटांत गुलाबाच्या पाकळ्या वापरून तुम्ही घरच्याघरी खूप चांगला आणि तुमच्या ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग देणारा लिप बाम तयार करू शकता. (How to make lip balm at home using rose petals)

गुलाबाच्या पाकळ्यांपासून लिप बाम तयार करण्याची पद्धत

 

गुलाबाच्या पाकळ्यांपासून लिपबाम कसा तयार करायचा, याविषयीचा एक व्हिडिओ ajbeautymantra या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. लिप बाम तयार करण्यासाठी गावरान गुलाबाचा वापर केला तर अधिक उत्तम.

बघा चमचाभर मेथीची जादू, पातळ केस होतील दाट, लांबसडक- केस गळणं कायमचं बंद

सगळ्यात आधी तर गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुवून घ्या. यानंतर एक कप गुलाबाच्या पाकळ्या असतील तर त्यात पाव कप पाणी टाका आणि हे मिश्रण चांगले उकळून घ्या.

किचनमध्ये ठेवा पॉझिटीव्ह एनर्जी देणारी ५ रोपं.. स्वयंपाक करताना मन राहील प्रसन्न- फ्रेश

जर तुम्ही फक्त गुलाबाच्या पाकळ्यांचाच वापर केला तर लिप बामचा रंग गडद गुलाबी येणार नाही. गडद गुलाबी रंगाचा लिपबाम पाहिजे असेल तर त्या पाण्यात थोडं बीटरुटही टाका.

 

पाणी उकळून झालं की ते गाळून घ्या. जेवढं पाणी असेल त्याच्या अर्ध खोबरेल तेल टाका. खोबरेल तेल जेवढं असेल तेवढंच व्हॅसलिन टाका आणि १ टीस्पून मध घाला.

फुलकोबी चिरल्यानंतर किती वेळाने शिजवावी? आहारतज्ज्ञ म्हणतात, फ्लॉवर चिरुन लगेच फोडणीला घातली तर...

व्हॅसलिन आणि खोबरेल तेल टाकण्यापुर्वी ते गरम करून वितळून घ्या आणि मग टाका. आता सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून काचेच्या डबीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. ८ ते १० तासाने लिप बाम चांगला सेट होईल. हा लिप बाम फ्रिजमध्येच ठेवावा. 

 

 

Web Title: Simple method of making lip balm at home, How to make lip balm at home using rose petals, How to make natural lip colour at home?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.