Join us  

एकही पांढरा केस दिसणार नाही, काळ्याभोर-दाट केसांसाठी रामदेव बाबांनी सांगितले खास उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 10:22 AM

Simple Natural Home Remedies to Get Black : रामदेव बाबा यांच्या मते केस गळणं थांबवण्यासाठी आणि केसांना नैसर्गिक काळा रंग येण्यासाठी रोज योगासनं करायला हवीत.

केस पांढरे होणं ही एक नैसर्गिक प्रकिया आहे. आधीच्या काळात पन्नाशींतर केस पांढरे व्हायचे पण आजकालच्या लाईफस्टाईमध्ये विशीतल्या तरूणांचे केस पांढरे होतात. केस पांढरे व्हायला लागले की चेहऱ्यावरही त्याचा परीणाम दिसून येतो. तुमचं वय जास्त दिसून येतं.  प्रदूषण, पोषक तत्वांची कमतरता, मेंटल प्रोब्लेम्स, ताण-तणाव, ड्रिंकची सवय, आयर्नची करतात यामुळे केस लवकर पांढरे होऊ लागतात. (How to get black hairs naturally)

पांढरे केस वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा ते पाहूया. रामदेव बाबा यांच्या मते केस गळणं थांबवण्यासाठी आणि केसांना नैसर्गिक काळा रंग येण्यासाठी रोज योगासनं करायला हवीत. जेणेकरून रक्ताभिसरण व्यवस्थित राहील आणि केसांची वाढ चांगली होईल. (Simple Natural Home Remedies to Get Black)

कढीपत्ता

कढीत्त्यात अनेक प्रकारचे औषधीय गुण असतात. याचा उपयोग अनेक प्रकारचे आजार बरे होण्यासाठी केला जातो. कढीपत्ता केसांना वाढवण्यासाठी आणि पांढरे केस दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो. २ चमचे आवळा पावडर आणि २ चमचे ब्राह्मी पावडर घ्या. आता त्याच्या मिश्रणात बारीक कढीपत्ता घाला. आता या मिश्रणात पाणी मिसळा. आता त्याची पेस्ट केसांना लावा. 1 तास ठेवा आणि नंतर आपले केस धुवा.

ब्लॅक सिड्स

केस  काळे होण्यासााठी  आपल्या रोजच्या आहारात ब्लॅक सिड्सचा समावेश करा. याशिवाय त्यात तीळ,  चिया सिड्स आणि गुळाचा समावेश करा.

आवळा

आवळ्यात असे पदार्थ असतात जे केसांना पोषण देतात. केसांच्या समस्या टाळण्यासाठी आवळा उपयोगी ठरतो कारण व्हिटामीन सी, जिंक, मॅग्नेशियम, सेलेनियम, यांसारखे पोषक तत्व यांत असतात.

व्हिट ग्रास

केसांना पोषण देण्यासाठी व्हीट ग्रास किंवा बार्लीचा ज्यूस प्यायला हवा. यामुळे लिव्हर डिटॉक्स होते आणि यातील पोषक तत्व केसांना पोषण देण्यास मदत करतात.

कांद्याची पेस्ट

जर तुमचे केस लवकर पांढरे  झाले असतील कांद्याची पेस्ट वापरू शकता. यामुळे केस काळेभोर दाट राहतील.  अंघोळीच्या १ तास आधी केसांवर कांद्याची पेस्ट लावा आणि नंतर केस स्वच्छ धुवा. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळेल.

पपईची पेस्ट

ताज्या कच्च्या पपईची पेस्ट बनवून केसांना लावा आणि अर्धा तासानं केस सुकल्यानंतर केस स्वच्छ धुवा. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यब्यूटी टिप्सकेसांची काळजी