(Image Credit- Social Media/Nilanshi Patel)
कमीत वयातच लोकांना केस पांढरे होण्याच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. लोक बाजारात मिळणाऱ्या हेअर केअर उत्पादनांचा वापर करतात. ही उत्पादनं महाग असतात. पांढरे केस दिसायला लागले की आपण म्हातारे झालो असं वाटू लागतं. चेहरा वयस्कर दिसतो त्यामुळे आत्मविश्वासही कमी होतो. (Hair care Tips) काही घरगुती उपाय तुमचं काम अधिक सोपं करू शकतात. यामुळे केस फक्त नैसर्गिकरित्या काळे होणार नाही तर लांब आणि दाटही दिसतील. (How to Turn Grey or White Hair Black Naturally)
लांब-काळया केसांसाठी उपाय
कढीपत्ता, मेथीचे दाणे, कलौंजी, कांद्याची सालं, मोहोरीचे तेल हे बेसिक साहित्य तुम्हाला लागेल. लोखंडाच्या कढईत २ चमचे मेथी, मुठभर कढीपत्ते, मुठभर कांद्याचे साल, १ चमचा कलौंजी बीया गॅसवर ठेवा. ८ मिनिटं हे साहित्य व्यवस्थित भाजून घ्या. नंतर थंड होण्यासाठी ठेवा.
मग मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित पावडर बनवून घ्या. या पावडरमध्ये २ चमचे मोहोरीचे तेल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या हाताने किंवा ब्रशच्या साहाय्याने केसांच्या मुळांना आणि केसांच्या लांबीला लावा. या तेलाचा वापर फक्त केसांच्या मुळांवर नाही तर केसांच्या लांबीवरही केला जाऊ शकतो. केस वाढवण्यासाठी हे गुणकारी ठरते.
केसांना काळे करण्यासाठी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता. बटाट्याचा हेअर मास्क बनवण्यासाठी सगळ्यात आधी बटाटे शिजवून घ्या त्यानंतर याचे पाणी आपल्या केसांना लावा. बटाट्यातील स्टार्च केसांमध्ये व्यवस्थित लावल्याने नैसर्गिक काळा रंग टिकून राहण्यास मदत होईल.
पांढरे केस काळे करण्यासाठी, एका ग्लास पाण्यात चहा उकळवा आणि गाळून बाजूला ठेवा. पाणी थंड होऊ द्या. यानंतर हे पाणी केसांना नीट लावा. चहाचे पाणी सुमारे एक तास लावून ठेवा आणि नंतर ते धुवा. पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी आठवड्यातून एकदा हा उपाय करा.
नारळाचे साल कचऱ्यात फेकता? थांबा, पांढरे केस काळेभोर होतील-या पद्धतीनं लावा नारळाचे साल
जास्वंदाचे फुलही केसांच्या वाढीसाठी उत्तम मानले जाते. याच्या वापराने केसांची वाढ होते आणि केस काळे, मजबूत होतात. ही फुलं वापरून केस केस काळे करण्यासाठी काही फुलं रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी या पाण्याने केस धुवा. जर तुम्ही मेहेंदी वापरत असाल तर तुम्ही त्यात जास्वंदाचे पाणीही घालू शकता.