केस लांब, दाट असावेत असं प्रत्येकालाच वाटते. (Beauty Tips) चुकीची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, प्रदूषण यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासते. या केमिकल्सयुक्त पदार्थांच्या वापराने केस वेळेआधीच पांढरे होत जातात. पांढरे केस दिसायला लागले की अनेकांना नैराश्य येतं. (Home Remedies For Darken Grey Hair) सतत डाय, शॅम्पू वापरण्याची सवयही नसते. अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय करून केसांना मजबूत बनवू शकता. ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होईल. (How to Get Black Hairs Naturally)
बी ब्युटीफूल.इनच्या रिपोर्टनुसार ब्लॅक टी च्या वापराने केस सॉफ्ट, शायनी होतात आणि केस वाढवण्यास मदत होते. यामुळे पांढरे केस काळे होण्यास मदत होते. कॅफिनमुळे केसांची वाढ चांगली होते आणि केस गळणंही थांबतं. चहाच्या पानांमुळे केसांना गडद रंग टिकून राहण्यास मदत होते. चहाची पावडर उकळून हे पाणी मेहेंदीत घाला. यामुळे केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहतो. स्ट्राँग ब्लँक टी करून थंड झाल्यानंतर सिंकमध्ये केस उलटे करा आणि चहाचे पाणी थंड करून नंतर या पाण्याने केस धुवा. २ ते ३ वेळा हा प्रयोग केल्यास केसांवर नैसर्गिक काळा रंग दिसून येईल.
केस पांढरे झाले असल्यास ते काळे करण्यासाठी ब्लॅक टी खूप चांगला पर्याय आहे. ब्लॅक टी एंटी ऑक्सिडेंट्सनी भरलेली असते. ज्यामुळे अकाली केस गळणे, केस पांढरे होणे यांसारख्या समस्या टाळता येतात. ब्लॅक टी केसांच्या वाढीसही मदत करते. ज्यामुळे तुमच्या केसांना चमक येते. चहा केसांसाठी डायिंग एजिंट (Dying Agent) म्हणून काम करतो. ज्यामुळे केस लगेचच काळे होतात.
केसांसाठी घरगुती हेअर डाय कसा करायचा? (How to Make Homemade Hair Growth)
घरगुती हेअर डाय करण्यासाठी तुम्हाला चहा पावडर, आवळा पावडर, शिकेकाई पावडर, रिठा पावडर आणि मेहेंदी पावडरची आवश्यकता असेल. सगळ्यात आधी एका भांड्यात २ चमचे चहा पावडर घालून व्यवस्थित उकळू द्या.त्यानंतर पाणी कमी झाल्यानंतर त्यात १ चमचा आवळा पावडर, १ चमचा रिठाआणि शिकेकाई घालून मिक्स करा. केसांच्या वाढीच्या हिशोबाने मेहेंदीची पेस्ट तयार करून नंतर केसांना लावा. १ ते २ तास तसंच ठेवून नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही दिवसभरातून २ वेळा या हेअर डायचा वापर करू शकता.