Lokmat Sakhi >Beauty > केस फार गळतात- कोंडा खूप झाला? जावेद हबीब सांगतात ४ उपाय, कोंडा जाऊन केस होतील हेल्दी- सुंदर

केस फार गळतात- कोंडा खूप झाला? जावेद हबीब सांगतात ४ उपाय, कोंडा जाऊन केस होतील हेल्दी- सुंदर

Hair Care Tips By Javed Habib For Winter: डोक्यात कोंडा झाला असेल, केस गळत असतील, कोरडे झाले असतील, केसांना फाटे फुटत असतील तर जावेद हबीब यांनी सांगितलेले हे काही उपाय लगेच सुरू करा.(simple solution for dandruff, hair loss, dry hair)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2024 01:36 PM2024-11-15T13:36:50+5:302024-11-15T13:47:24+5:30

Hair Care Tips By Javed Habib For Winter: डोक्यात कोंडा झाला असेल, केस गळत असतील, कोरडे झाले असतील, केसांना फाटे फुटत असतील तर जावेद हबीब यांनी सांगितलेले हे काही उपाय लगेच सुरू करा.(simple solution for dandruff, hair loss, dry hair)

simple solution for dandruff, hair loss, dry hair, how to get rid of dandruff | केस फार गळतात- कोंडा खूप झाला? जावेद हबीब सांगतात ४ उपाय, कोंडा जाऊन केस होतील हेल्दी- सुंदर

केस फार गळतात- कोंडा खूप झाला? जावेद हबीब सांगतात ४ उपाय, कोंडा जाऊन केस होतील हेल्दी- सुंदर

Highlightsकेसांमध्ये खूप कोंडा झाला असेल तर सगळ्यात आधी गरम, कडक पाण्याने केस धुणं टाळा. केस धुण्यासाठी नेहमी कोमट पाणीच वापरा.

हिवाळा सुरू झाला की सगळ्यात पहिले डोक्याची त्वचा कोरडी पडायला सुरुवात होते आणि डोक्यातला कोंडा वाढत जातो. कोंडा वाढला की केस गळायला सुरुवात होते. त्वचेतलं नॅचरल मॉईश्चरायजर कमी झाल्यामुळे केस कोरडे पडू लागतात. हिवाळ्यात केसांना फाटे फुटण्याचं प्रमाणही खूप वाढलेलं असतं (simple solution for dandruff, hair loss, dry hair). म्हणूनच हे सगळे त्रास कमी करायचे असतील तर त्यासाठी काय उपाय करावा, याविषयी ब्यूटी एक्सपर्ट जावेद हबीब यांनी शेअर केलेली ही माहिती एकदा बघाच...(Hair Care Tips By Javed Habib For Winter)

 

१. डोक्यात कोंडा झाला असल्यास उपाय

केसांमध्ये खूप कोंडा झाला असेल तर सगळ्यात आधी गरम, कडक पाण्याने केस धुणं टाळा. केस धुण्यासाठी नेहमी कोमट पाणीच वापरा.

तज्ज्ञ सांगतात चालण्याचा व्यायाम करताना 'या' गोष्टींचं भान ठेवा, नाहीतर ४ आजारांचा धोका

याशिवाय तुमच्या शाम्पूमध्ये थोडं ॲपल साईड व्हिनेगर टाका. शाम्पू आणि व्हिनेगर या मिश्रणाने नियमितपणे केस धुतल्यास कोंडा बऱ्याच प्रमाणात कमी होईल. 

 

२. केस गळत असल्यास उपाय

केस खूप जास्त गळायला लागले असतील तर कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर साधारण १० ते १५ मिनिटांनी केस धुऊन टाका. 

 

३. केस कोरडे पडत असल्यास काय करावे?

हिवाळ्याच्या दिवसांत केस कोरडे पडण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं असतं. त्यामुळे मग केस अक्षरश: एखाद्या झाडूप्रमाणे कोरडे, रुक्ष, रखरख दिसू लागतात.

Winter Fashion: लांब बाह्यांच्या ब्लाऊजचे ८ स्टायलिश प्रकार, यातलं एखादं तरी तुमच्याकडे असायलाच हवं

म्हणून अशा केसांना पुन्हा मऊसूत, सिल्की, चमकदार करायचं असेल तर त्यासाठी केसांच्या लांबीवर मोहरीचं तेल लावा. त्यानंतर १० मिनिटांनी केस धुवून टाका. केस धुतल्यानंतर कंडिशनर लावा. मोहरीच्या तेलामुळे कोरडे केस मऊ, सिल्की होण्यास मदत होते. 

४. केसांना फाटे फुटत असल्यास

केसांना फाटे फुटू नयेत म्हणून दर ३ ते ४ महिन्यांनी ते ट्रिम करायला हवे. 


 

Web Title: simple solution for dandruff, hair loss, dry hair, how to get rid of dandruff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.