तळपायांना भेगा पडण्याच्या किंवा तळपायाची त्वचा कोरडी पडून ते खरखरीत होण्याची समस्या फक्त हिवाळ्याच्या दिवसांतच जाणवते असं मुळीच नाही. उन्हाळ्यातही खूप जणींना हा त्रास होतो. कारण उन्हाळ्यात खूप जास्त घाम येतो. त्यामुळे भरपूर पाणी पिऊनही अनेक जणींना डिहायड्रेशनचा त्रास होतो. डिहायड्रेशनचा परिणाम तळपायाच्या त्वचेवर लगेच दिसून येतो (how to get rid of dryness and cracked heel?). ती त्वचा खूप जास्त काेरडी होते आणि तळपाय तसेच टाचा अगदीच खरखरीत होतात (simple tips and tricks for dry and cracked heel). काही जणींच्या तळपायाला खाज येऊन भेगाही पडतात. हा त्रास कमी करायचा असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहू शकता..(home remedies for smooth and soft heels)
तळपाय खरखरीत होऊन टाचांना भेगा पडल्या असतील तर उपाय
भेगा पडून खरखरीत झालेले तळपाय मऊ- मुलायम करण्यासाठी घरच्याघरी काय उपाय करता येऊ शकतो, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ prajakta_salve_official या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
डोक्यातल्या कोंड्यामुळे वैतागून गेलात? जावेद हबीब सांगतात सोपा उपाय- कोंडा होईल गायब
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी मेणबत्तीचा एक छोटासा तुकडा घ्या आणि त्याचे बारीक तुकडे करा. हे काप एका कढईमध्ये घाला.
त्यामध्ये २ चमचे मोहरीचं तेल आणि १ चमचा खोबरेल तेल घाला. हे सगळं मिश्रण गॅसवर गरम करायला ठेवा. तेलामधले मेणाचे तुकडे विरघळल्यानंतर गॅस बंद करा आणि या मिश्रणाला सतत हलवत ठेवा.
जेव्हा हे मिश्रण थोडं कोमट होईल तेव्हा त्यामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि १ चमचा ॲलोव्हेरा जेल घाला. पुन्हा एकदा सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या.
मुलांना हसत खेळत चांगलं वळण कसं लावावं? एलन मस्क करतात ७ गोष्टी- ट्राय करून पाहा...
त्यानंतर ते एका डबीमध्ये भरून ठेवा. रोज रात्री झोपण्यापुर्वी तळपाय स्वच्छ धुवून घ्या आणि तयार केलेलं घरगुती क्रिम टाचांना तसेच संपूर्ण तळपायाला लावा. यानंतर धुळीत जाणं टाळा. हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास टाचा अगदी मऊ होतील असं व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे..