Lokmat Sakhi >Beauty > श्रावण स्पेशल : फक्त तासभर लावा हातावर मेहेंदी, रंगेल लालचुटूक - रात्रभर न ठेवताही खुलेल रंग...

श्रावण स्पेशल : फक्त तासभर लावा हातावर मेहेंदी, रंगेल लालचुटूक - रात्रभर न ठेवताही खुलेल रंग...

5 Natural & Easy Tips for a Darker Mehndi Colour : Easy Tips for Darker Mehndi Colour : श्रावणात सणावारानिमित्त मेहेंदी काढत असाल तर गडद रंग येण्यासाठी सोप्या ५ टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2024 04:45 PM2024-08-12T16:45:30+5:302024-08-12T17:01:12+5:30

5 Natural & Easy Tips for a Darker Mehndi Colour : Easy Tips for Darker Mehndi Colour : श्रावणात सणावारानिमित्त मेहेंदी काढत असाल तर गडद रंग येण्यासाठी सोप्या ५ टिप्स...

Simple Tips To Darken Mehendi And Make It Long-Lasting Easy Tips for Darker Mehndi Colour | श्रावण स्पेशल : फक्त तासभर लावा हातावर मेहेंदी, रंगेल लालचुटूक - रात्रभर न ठेवताही खुलेल रंग...

श्रावण स्पेशल : फक्त तासभर लावा हातावर मेहेंदी, रंगेल लालचुटूक - रात्रभर न ठेवताही खुलेल रंग...

श्रावण महिना म्हटलं की येतात सणवार. सणवारानिमित्त नटण्याची हौस सगळ्याचजणी पूर्ण करतात. सण आला की प्रत्येकीला आपण नटून थटून सुंदर दिसावे असे वाटत असते. श्रावणात येणाऱ्या प्रत्येक सणाला काहीतरी खास असावे असे आपल्याला वाटते. श्रावणात येणारे सणवार आणि या सणादरम्यान नटणे ही प्रत्येकीची आवड असते. येणाऱ्या प्रत्येक सणाला आपण सुंदर दिसावे म्हणून अनेकजणी पार्लर गाठतात. पार्लरला जाऊन आपण केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत अनेक ट्रिटमेंट्स करुन घेतो. श्रावणातील प्रत्येक सणाला खास दिसण्यासाठी स्त्रिया अनेक ब्यूटी ट्रिटमेंट्स करुन घेतात. याचबरोबर श्रावणात येणाऱ्या सणानिमित्त बहुतेकवेळा अनेकजणी हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी हातांवर मेहेंदी काढतात(Easy Tips for Darker Mehndi Colour).

रक्षाबंधन, गणेशोत्सव यांसारख्या सणांनिमित्त अनेकजणी आपल्या हातांवर मेहेंदी काढतात. हातांवर काढलेल्या मेहेंदीला चांगला गडद रंग आला तरच ती मेहेंदी उठून दिसते. मेहेंदीचा रंग (6 natural ways to make your mehendi darker) जितका उठून दिसतो तितकेच हातांचे सौंदर्य अधिक वाढते. आपले हात अधिक आकर्षक दिसावेत यासाठी आपण हातांवर मेहेंदी काढतो. परंतु ही मेहेंदी काढून जर त्याचा गडद रंगच आला नाही तर आपला हिरमोड होतो. परंतु असे होऊ नये म्हणून आपण मेहेंदीचा रंग अधिक खुलून येण्यासाठी अनेक घरगुती उपाय करून पाहतो. मेहेंदीचा रंग अधिक खुलून येण्यासाठी आपण काही सोप्या घरगुती ट्रिक्सचा वापर करु शकतो. या ट्रिक्स नेमक्या कोणत्या ते पाहूयात(Simple Tips To Darken Mehendi And Make It Long-Lasting).

मेहेंदीचा रंग अधिक खुलून येण्यासाठी काय करावे... 

१. लवंग :- हातावरील मेहेंदीचा रंग अधिक गडद होण्यासाठी आपण लवंगांचा वापर करु शकता. हाताला लावलेली मेहेंदी सुकल्यानंतर ७ ते ८ लवंग घेऊन त्या गरम तव्यावर घालून त्याची धुरी हातांवर घ्यावी. लवंगांची धुरी हातांवर घेतल्याने मेहेंदीचा रंग हातांवर गडद येतो. लवंगाच्या उष्णतेमुळे मेहंदीचा रंग नैसर्गिकरीत्या गडद होतो. हातांवर लवंगाची धुरी घेण्यापूर्वी मेहंदीवर लिंबू आणि साखरेचा रस लावल्यास मेहंदीचा रंग अधिक जास्त गडद होण्यास मदत होईल. 

२. विक्स किंवा बाम :- विक्स किंवा बाम लावल्याने मेहेंदीचा रंग अधिक जास्त गडद होण्यास मदत मिळेल. हातावरील मेहेंदी कोरडी झाल्यावर आपण ती सुकलेली मेहेंदी काढून टाकतो. मेहेंदी हातांवरुन काढल्यावर हातांवर विक्स किंवा बाम लावावा. यामध्ये असणाऱ्या मेन्थॉलमुळे मेहेंदीचा रंग गडद होतो.

१ चमचा अळशी - १ चमचा तांदुळाचे पीठ, उपाय साधा- चेहऱ्यावरून तुमचं वय ओळखता येणार नाही...

३. कॉर्न सिरप :- कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यात पाणी घालून या कॉर्न सिरपचा पातळ थर मेहेंदीवर द्यावा. हे मिश्रण मेहंदीला बराच वेळ ओले ठेवते, त्यामुळे त्याचा रंग गडद होतो.

केस धुतल्यावर केस खूप गळतात, ' अशी ' घ्या काळजी, केसांच्या सौंदर्यात होईल दुपटीने वाढ... 

४. चहा पावडर :- मेहेंदीला गडद रंग येण्यासाठी आपण चहा पावडरचा वापर करु शकता. मेहेंदी लावण्यापूर्वी चहा पावडरच्या कोमट केलेल्या पाण्याने हात धुवून घ्यावेत. यामुळे मेहेंदीचा रंग गडद होण्यास मदत मिळते. 

त्वचेच्या समस्या अनेक, प्रत्येक  त्रासप्रमाणे कोरफड जेलमध्ये मिक्स करा हे ४ पदार्थ, स्किन प्रॉब्लेम्स होतील दूर... 

५. मोहरीचे तेल :- मेहेंदीचा रंग अधिक गडद होण्यासाठी आपण मोहरीच्या तेलाचा वापर करू शकता. मेहंदी सुकल्यानंतर ही सुकलेली मेहेंदी हातांवरुन काढून घेतल्यानंतर प्रथम मोहरीच्या तेलाने हातावर मालिश करा. मोहरीच्या तेलामुळे तळहातावर उष्णता निर्माण होते, त्यामुळे मेहंदीचा रंग गडद होतो.

Web Title: Simple Tips To Darken Mehendi And Make It Long-Lasting Easy Tips for Darker Mehndi Colour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.