Join us  

फ्रेंच रोल घालताच येत नाही? घ्या सोप्या ट्रिक्स, 5 मिनिटात झटपट स्मार्ट फ्रेंच रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 3:34 PM

Hair style: ऑफिस, पार्टी, लग्न अशा सर्वच ठिकाणी परफेक्ट लूक देणारी हेअरस्टाईल म्हणजे फ्रेंच रोल (French Role). अवघ्या ५ मिनिटांत फ्रेंच रोल घालणं सहज शक्य.. बघा या काही ट्रिक्स आणि टिप्स..

ठळक मुद्देलग्न, वाढदिवस, रिसेप्शन, पार्टी किंवा मग आपलं रोजचं ऑफिस.. असं कुठेही तुम्ही अगदी सहजपणे फ्रेंच रोल घालू शकता.

अगदी विमानातल्या हवाई सुंदरीपासून ते आपल्या ऑफिसमधल्या एखाद्या सहकारी मैत्रिणीपर्यंत सगळ्यांना सुट होणारी आणि सगळीकडे सर्रास दिसून येणारी हेअर स्टाईल म्हणजे फ्रेंच रोल. तुमचे केस छोटे असोत किंवा मग मध्यम लांबीचे, त्यांचा फ्रेंच रोल छान जमतो. मानेच्या थोडे खालपर्यंत केस (hair style for short hair in marathi) असले की अशा केसांची खूप वेगवेगळ्या पद्धतीने हेअरस्टाईल करता येत नाही. पण अशा केसांचा फ्रेंच रोल  (French role within 5 minutes) घालणं मात्र सहज शक्य आहे. 

 

शिवाय फ्रेंच रोलची आणखी एक खासियत म्हणजे लग्न, वाढदिवस, रिसेप्शन, पार्टी किंवा मग आपलं रोजचं ऑफिस.. असं कुठेही तुम्ही अगदी सहजपणे फ्रेंच रोल घालू शकता. तो जेवढा छान साडीवर दिसतो तेवढाच आकर्षक तो फॉर्मल्सवर किंवा मग वेस्टर्न कपड्यांवर दिसतो. त्यामुळे कुठेही अगदी सहज चालून जाणारी ही हेअरस्टाईल आपण शिकून घ्यायलाच हवी अशी आहे. शिवाय ऑफिससाठी तयार होताना आपल्याकडे खूप वेळ नसतो. अशा वेळी केसांची काही तरी झटपट पण आकर्षक स्टाईल करता यावी, असंही आपल्याला वाटत असतं. म्हणूनच कमी वेळेत, उत्तम हेअरस्टाईल करण्याचा विचार करत असाल, तर फ्रेंच रोल यासाठी एक चांगला पर्याय आहे. एकदा का ही हेअर स्टाईल करण्यावर तुमचा हात बसला की, मग अवघ्या ५ ते ७ मिनिटांत तुमचा फ्रेंच रोल घालणं होतो. 

 

कसा घालायचा फ्रेंच रोलHow to do French Role hair style- फ्रेंच रोल घालण्यासाठी एकदा सगळे केस छान विंचरून त्यांच्यातला गुंता काढून घ्या.- आता एरवी केसांचा बो बांधताना तुम्ही जसे सगळे केस एकत्र गोळा करता तसेच करा. फक्त जरा वर, म्हणजेच उंचावर पकडा.- यानंतर डाव्या हाताने केस पकडले असतील तर उजव्या हाताने केसांना वरपासून खालपर्यंत उजवीकडून डावीकडे असा पीळ घाला.

- आता मागून पाहिल्यानंतर उजव्या बाजूने केस प्लेन दिसतील तर डाव्या बाजूने केसांची एक खाप तयार झालेली दिसेल. आता केस वर गोल- गोल करत आणा आणि डाव्या बाजूला असणाऱ्या या खापेत केस खोवा. आकडे किंवा यु पीन्स लावून केस पक्के करा. तुमचा फ्रेंच रोल झाला तयार.- डाव्या किंवा उजव्या अशा कोणत्याही बाजूने फ्रेंच रोल घालता येतो. ज्या हाताने सहज जमेल, सोपे पडेल, त्या हाताने ही हेअरस्टाईल करा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीफॅशन