Join us  

पिंपल्सचे जुने, काळे डाग घालवून नितळ चेहरा देणारे 5 सोपे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 1:14 PM

काही जणींची त्वचा अगदीच नितळ, स्वच्छ आणि मुलायम पोत असणारी दिसते, तर काही जणींची त्वचा मात्र डागांनी काळवंडलेली, खडबडीत दिसते. त्वचेवरील पिंपल्सचे जुने पुराणे डाग हटवून नितळ त्वचा देणारे हे पाच उपाय नक्की करून पहा.

ठळक मुद्देआपल्या काही मैत्रिणींची त्वचा अगदीच नितळ असते. त्यांनी काहीही खाल्लं किंवा त्वचेची काळजी घेतली नाही, तरी त्यांच्या त्वचेवर काहीही फरक पडत नाही. म्हणूनच हे सोपे घरगुती उपाय करून पहा आणि पिंपल्सचे जुनाट डाग हळूहळू छुमंतर करून टाका.

वयात येण्याची प्रोसेस एकदा सुरू झाली की, अनेक मुलींच्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात. सुरूवातीला तर गालावर, कपाळावर, हनुवटीवर येणारे पिंपल्स पाहून अनेक किशोरवयीन मुली घाबरूनच जातात. चेहरा लपवून टाकावा असे त्यांना वाटू लागते, अगदी घराबाहेर पडण्याचीही लाज वाटते. काही दिवसांनी  मग हे पिंपल्स जातात. पण त्यांचे डाग मात्र चेहऱ्यावर अगदी जसेच्या तसेच राहतात. हळूहळू पिंपल्स येण्याचे आणि त्यांचे डाग चेहऱ्यावर राहण्याचे प्रमाण एवढे वाढते की, चेहऱ्याची सगळी त्वचाच काळवंडून गेलेली दिसते. 

 

१. कच्चे दुध आणि लिंबूचार टेबल स्पुन कच्चे दुध घ्या आणि त्यामध्ये दुधाच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे दोन टेबल स्पून लिंबाचा रस घाला. हे मिश्रण चांगले हलवून घ्या आणि कापसाच्या बोळ्याच्या साहाय्याने सगळ्या चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. या उपायाने पिंपल्सचे काळे डाग जातील आणि चेहरा देखील हळूहळू उजळू लागेल.

२. लिंबू आणि मधलिंबू आणि मधाचे योग्य प्रमाणात केलेले कॉम्बीनेशन चेहऱ्यावरचे व्रण हटवते आणि चेहऱ्याचा पोत सुधारण्यास मदत करते. हा लेप बनविताना लिंबू आणि मध यांचे प्रमाण समान असणे आवश्यक आहे. म्हणजे एक चमचा लिंबाचा रस घेतला तर तेवढाच मध घ्यावा. १५ ते २० मिनिटे हा लेप चेहऱ्याला लावावा आणि त्यानंतर चेहरा धुवून टाकावा. 

 

३. टोमॅटोचा रसटोमॅटो रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतो. तसेच शरिराला व्हिटॅमिन सी चा पुरवठा करतो. म्हणून चेहऱ्यावरील डागांना जर टोमॅटोचा रस लावला तर त्याचा निश्चितच फायदा होतो. मध्यम आकाराचा अर्धा टोमॅटोही या उपचारासाठी पुरेसा होतो. अर्धा टोमॅटो किसून घ्या. त्यामध्ये एक चमचा मध आणि अगदी चुटकीभर बेकींग सोडा टाका. हे मिश्रण १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

४. दही, मध आणि लिंबूया सर्वच गोष्टी त्वचेची काळजी घेणाऱ्या आहेत. त्यामुळे या तिघांचे मिश्रण करून चेहऱ्याला लावलेला लेप निश्चितच त्वचेला उजळवून टाकतो. यामध्ये मध आणि लिंबाचा रस एक टेबल स्पून एवढा घेतला असेल तर दही दोन टेबल स्पून घ्यावा. हा लेप चेहऱ्याला लावून २० मिनिटे तसाच ठेवा आणि त्यानंतर काेमट पाण्याने चेहरा धुवून टाका.

 

५. बटाट्याचा रस आणि लिंबूबटाटा हा नॅचरल ब्लीच म्हणून ओळखला जातो. बटाटा किसून घ्या. यानंतर त्याचे पाणी आणि ज्या भांड्यात बटाटा किसला आहे, त्या भांड्याच्या तळाशी बटाट्यातील जो पांढरा घट्ट पाणीदार पदार्थ म्हणजेच स्टार्च जमा होतो, तो वेगळा काढा. या स्टार्चमध्ये बटाट्याचा थोडा रस आणि थोडा लिंबाचा रस टाका. हे मिश्रण १५ ते २० मिनिट चेहऱ्यावर ठेवा. यामुळे त्वचा निश्चितच मुलायम होते आणि डाग कमी होतात.  

टॅग्स :ब्यूटी टिप्समहिलात्वचेची काळजी