जुन्या काळात तुरटीचा (Alum for skin) वापर सौंदर्यासाठी केला जायचा. त्वचेवर नैसर्गिक चमक तर यायचीच, शिवाय केसांची समस्याही सुटायची. तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे अनेक समस्यांवर प्रभावी ठरतात. सौंदर्य (Skin Care) वाढवण्यासाठी तुरटीचा वापर होतो. आपण याच्या वापराने चेहऱ्यावरील नको असलेले केस देखील काढू शकता. अनेकदा चेहऱ्यावरील केस सौंदर्यात बाधा आणतात. त्यामुळे वेळीच फेशिअल हेअर्स काढायला हवे.
चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी बऱ्याच महिला रेझर किंवा फेशियल वॅक्सिंग करतात. तर, काही महिला लेझर ट्रिटमेंट देखील करून घेतात. पण या सगळ्या महागड्या ट्रिटमेंट घेण्याऐवजी आपण ५ रुपयांच्या तुरटीचा वापर करू शकता. तुरटीच्या वापराने फेशिअल हेअर्स निघून जातील. यासाठी तुरटीचा वापर कसा करावा? पाहूयात(Simple Way to Use Alum & Rose Water for Removal of facial hair).
फेशिअल हेअर्स काढण्यासाठी तुरटीचा उपाय
साहित्य
तुरटी
गुलाब जल
न्यू इअर पार्टीमध्ये चमकायचंय? कांद्याच्या रसात चमचाभर मिसळा ‘ही’ गोष्ट, चेहरा चमकेल
लिंबाचा रस
हळद
फेशिअल हेअर्स काढण्यासाठी तुरटीचा करा असा वापर
सर्वप्रथम, तुरटीची पावडर करून घ्या. नंतर त्यात गुलाब जल, लिंबाचा रस आणि हळद घालून पेस्ट तयार करा. पेस्ट लावण्यापूर्वी चेहरा धुवून घ्या. चेहरा धुतल्यानंतर कॉटन बॉलच्या मदतीने पेस्ट चेहऱ्यावर लावा. पेस्ट सुकल्यानंतर सर्क्युलेशन मोशनमध्ये पेस्ट काढून घ्या. यामुळे फेशिअल हेअर्स निघून जातील. शिवाय चेहरा क्लिन-फ्रेश दिसेल. आपण या पेस्टचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.
चेहऱ्यावर गुलाब जल लावण्याचे फायदे
चेहऱ्यावर गुलाब जल लावल्याने स्किनवर नैसर्गिक ग्लो येतो. यातील अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म चेहर्याला पोषण देते. शिवाय वृद्धतवाच्या लक्षणांपासूनही संरक्षण करते.
हळद
हळदीच्या वापरामुळे त्वचा चांगल्या पद्धतीने एक्सफोलिएट होते. ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटीफंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेची ऍलर्जी, फोड आणि मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करते.
लिंबाचे रस
अनेक जण तेलकट त्वचेपासून त्रस्त असतात. लिंबूमधील गुणधर्मामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. आपण चेहरा उजळवण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करू शकता.