केस पांढरे होणं हे सगळ्याच वयोगटातील लोकांमध्ये उद्भवणारा कॉमन प्रोब्लेम आहे. केस बरे दिसावेत म्हणून बरेच लोक केसांवार डाय करतात. डाय केल्यानंतर १ ते २ आठवड्यांसाठी केस काळे दिसतात नंतर पुन्हा केस पांढरे व्हायला सुरूवात होते. कारण त्यातील केमिकल्स केसांचा नैसर्गिक रंग काढून टाकतात. ग्लोबर कलर केल्यानं तेव्हढ्यापुरता केस चांगले दिसतात पण वेळोवेळी हेअर स्पा, हेअर वॉश केले नाही तर पुन्हा केस डॅमेज होतात. (How to get black hairs naturally)अशा स्थितीत डाय न लावता केस काळे करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. ज्यामुळे पांढरे केस कमी करता येऊ शकतात. पांढरे केस कमी करण्यासाठी डायचा वापर कसा करायचा ते पाहूया. (Simple Ways to Dye Hair Black Naturally )
नारळाचं तेल आणि आवळा पावडर
पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. यासाठी नारळ्याच्या तेलात २ ते ३ चमचे आवळा पावडर मिक्स करा. त्यानंतर तेल गरम करून ठंड होऊ द्या. तयार तेल एका जारमध्ये भरून ठेवा नियमित स्वरूपात केसांना हे तेल लावल्यास केस चांगले राहण्यास मदत होईल. यामुळे केस पांढरे होण्यापासून रोखता येऊ शकतं. याशिवाय केस मजबूतही राहतात.
इंडिगो पावडर आणि मेहेंदी
केसांना काळे करण्यासाठी तुम्ही इंडिगो पावडरमध्ये मेहेंदी मिसळून लावू शकता. यासाठी सगळ्यात आधी एक चमचा इंडिगो पावडर आणि १ चमचा मेहेंदी पावडर मिक्स करा. त्यात थोडं दही घालून एक पेस्ट तयार करा. हे मिश्रण केसांना लावा आणि १ तासानं केस स्वच्छ धुवा. यामुळे केस काळे होण्यास मदत होईल. याशिवाय केसांच्या इतर समस्याही कमी होतील.
आवळा आणि शिकेकाई हेअर पॅक
पांढरे केस काळे करण्यासाठी सगळ्यात आधी आवळा आणि शिकेकाई हेअर पॅक तयार करा. याचा केसांवर उपयोग करण्यासाठी एका लोखंडाच्या कढईत ४ चमचे आवळा पावडर घाला त्यात १ चमचा शिकेकाई पावडर मिक्स करून २ ते ३ तासांसाठी तसेच ठेवून द्या नंतर केसांना लावा. रात्रभर तसेच ठेवा सकाळी कोमट पाण्यानं केस धुवा.