Lokmat Sakhi >Beauty > केस फार पिकलेत? हेअर डाय-कलरची गरजच नाही; १ उपाय- काळ्या केसांसाठी असरदार

केस फार पिकलेत? हेअर डाय-कलरची गरजच नाही; १ उपाय- काळ्या केसांसाठी असरदार

Simple Ways to Prevent Gray Hair : आवळ्याचे त्वचा आणि केसांना होणारे फायदे हातांच्या बोटांवर मोजता येणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 01:42 PM2023-08-11T13:42:09+5:302023-08-12T11:44:36+5:30

Simple Ways to Prevent Gray Hair : आवळ्याचे त्वचा आणि केसांना होणारे फायदे हातांच्या बोटांवर मोजता येणार नाहीत

Simple Ways to Prevent Gray Hair : How to get blach hairs naturally using Amla | केस फार पिकलेत? हेअर डाय-कलरची गरजच नाही; १ उपाय- काळ्या केसांसाठी असरदार

केस फार पिकलेत? हेअर डाय-कलरची गरजच नाही; १ उपाय- काळ्या केसांसाठी असरदार

आजकाल लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वाचेच केस पिकलेले पाहायला मिळतात. काहीजण तर पिकलेल्या केसांमुळे पांढरे केस  ठेवण्याचीच हेअरस्टाईल आणि फॅशन करतात. व्हिटामीन सी युक्त आवळा केसांसाठी अनेकप्रकारे फायदेशीर ठरतो. आवळ्यामुळे केसाचं गळणं रोखण्यास मदत होते. आवळ्याचे त्वचा आणि केसांना होणारे फायदे हातांच्या बोटांवर मोजता येणार नाहीत. (How to stop greying hairs)

आवळा एंटी ऑक्सिडंट्सनी परिपूर्ण असतो. यामुळे केसांचा नैसर्गिक रंक टिकून राहण्यास मदत होते. आवळ्याचा योग्य पद्धतीनं वापरही करायला हवा. तेव्हाच याचा चांगला परिणाम केसांवर दिसून येईल. पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी आवळ्याचा वापर कसा  करता येईल ते पाहूया. (How to get black hairs naturally)

पांढरे केस काळे करण्यासाठी आवळ्याचा वापर कसा करावा?

आवळा पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी आणि पीएच लेव्हल सुधारण्यासाठी गुणकारी ठरतो.(Amla Powder)   आवळ्यामध्ये कॉपरचे प्रमाण जास्त असते.  ज्यामुळे मेलानिनचे उत्पादन योग्य प्रमाणात होते. मेलालिनमुळे केसांचा रंग काळा होतो. आवळा केसांना आतून आणि बाहेरून दोन्ही रूपाने फायदे देतो. ज्यामुळे केस काळे होतात आणि त्यांचे आरोग्यही चांगले राहते. आवळा पावडर बनवण्यासाठी आवळा बारीक तुकड्यांमध्ये कापून घ्या नंतर सुकण्यासाठी छतावर ठेवा. आवळा सुकल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. तयार झाली आहे आवळा पावडर.

एक वाटीत मेहेंदी घ्या त्यात आवळा पावड मिसळा. त्यात नारळाचं तेल आणि पाणी मिसळून द्रावण तयार करा. या  हेअर डायमुळे केस काळे होण्यास मदत होईल. हा हेअर मास्क तुम्ही ३ ते ४ तासांसाठी केसांना लावून ठेवू शकता. १५ दिवसात एकदा हा डाय केसांवर लावून ठेवा.

आवळा पांढऱ्या केसांवर वापरण्याची एक कमाल पद्धत आहे. यासाठी आवळा पावडरमध्ये २ व्हिटामीन ई च्या गोळ्या मिसळा त्यात एलोवेरा घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यात पाणी मिसळा.  हा हेअर मास्क पांढऱ्या केसांवर अर्ध्या तासासाठी लावून ठेवा त्यानंतर  केस स्वच्छ पाण्यानं धुवा. आवळ्याच्या नियमित वापरानं केसांचा पोत  सुधारण्यास मदत होईल.

Web Title: Simple Ways to Prevent Gray Hair : How to get blach hairs naturally using Amla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.