चेहरा गोरा असला तरी शरीराचे इतर भाग काळे पडल्याची समस्या अनेकांना जाणवते. उन्हाच्या संपर्कात आल्यानं पाठ, मान, हात काळपट पडतात. (How to Remove a Tan in 20 Minutes) जर तुमच्याही पाठीची त्वचा काळी पडली असेल तर काही सोपे घरगुती उपाय तुमची ही समस्या सोडवू शकतात. (Simple Ways to Remove Tan from the Back) त्वचा टॅन होऊ नये म्हणून रोज सनस्क्रीन न चुकता लावा.
लिंबू आणि एलोवेरा
हा उपाय करण्यासाठी एका वाटीत २ लिंबू पिळून घ्या. त्यात २ मोठे चमचे एलोवेरा जेल मिसळा. हे जेल फ्रेश असेल तर अधिक उत्तम. या दोन्ही वस्तू एकत्र करून हे मिश्रण पाठीला लावा. एक ते दोन मिनिटं तसेच ठेवून या मिश्रणानं मसाज करा आणि लूफाच्या मदतीनं स्क्रबिंग करा. कोमट पाण्यानं पाठ स्वच्छ करून घ्या.
बेसन
प्रत्येकाच्याच घरी बेसन उपलब्ध असते. बेसन वापरून तुम्ही काळपट त्वचेपासून सुटका मिळवू शकता. एका वाटीत एक टेबलस्पून बेसन घेऊन त्यात लिंबाचा रस पिळून घाला. त्यात दोन चमचे दही आणि एक चमचा गुलाब पाणी मिसळा. हे मिश्रण पाठीला लावून ५ मिनिटं तसंच ठेवा. नंतर ओल्या हातांनी स्क्रब करून पाठ स्वच्छ धुवून घ्या.