Join us  

चमचाभर गव्हाच्या पिठाची जादू, त्वचा दिसेल यंग व ग्लोइंग ! तजेलदार त्वचेसाठी इन्स्टंट फेसपॅक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2023 8:23 PM

Try These Amazing Wheat Flour Face Packs For Glowing Skin : सध्याचे धूळ, प्रदूषण यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात, अशा स्थितीत त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण गव्हाच्या पिठाचा वापर करू शकतो...

सध्याच्या धावपळीच्या आणि बिझी लाइफस्टाइलमुळे आपल्याला आपल्या त्वचेची योग्य ती काळजी घेता येत नाही. त्वचेची वेळोवेळी योग्य ती काळजी घेतली नाही तर त्याचे त्वचेवर फार गंभीर परिणाम दिसू लागतात. अशी त्वचा कालांतराने बिघडून त्वचेसंबंधित अनेक समस्या वरचेवर सुरु होतात. आपली त्वचा डाग विरहित, तजेलदार, चमकदार, नितळ असावी असे प्रत्येकालाच वाटत असते. परंतु त्वचेची योग्य ती काळजी न घेतल्यास आपल्याला त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मुरुम येणे, त्वचा काळवंडणे, चेहऱ्यावर डाग येणे यांसारख्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्वचेच्या या समस्या टाळण्यासाठी आपण आपल्या ब्युटी केअर रुटीनवर लक्ष देण्यास सुरुवात करतो. 

आपण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी चंदन, मुलतानी माती यासारख्या विविध औषधी गुणधर्म असलेल्या पावडरचा वापर करतो. याचसोबत आपल्या किचनमधील गव्हाच्या पिठाचा योग्य पद्धतीनं आणि योग्य प्रमाणात वापर केल्यास त्वचेसाठी लाभदायक ठरू शकते. धूळ, माती, प्रदूषणामुळे चेहऱ्याचा रंग तसेच पोत बिघडतो. यामुळे चेहऱ्यावरचे तेज देखील कमी होते. त्वचेवरील छिद्रांमध्ये घाण जमा झाल्यास मुरुमांचीही समस्या निर्माण होते. मुरुम येण्यास कारणीभूत ठरणाऱ्या बॅक्टेरियांचा नाश करण्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर आपण करु शकतो. गव्हाच्या पिठाच्या या फेसपॅकमुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत मिळते(Try These Amazing Wheat Flour Face Packs For Glowing Skin).  

गव्हाच्या पिठाचा फेसपॅक नेमका कसा तयार करावा... 

१. गव्हाचे पीठ व कोरफड जेल :- जर आपल्याला डेड स्किन व त्वचेवरील घाण खोलवर स्वच्छ करायची असल्यास आपण गव्हाचे पीठ व कोरफड यांपासून तयार केलेला फेसपॅक वापरु शकतो. हा फेसपॅक तयार करण्यासाठी ३ टेबलस्पून गव्हाचे पीठ व २ टेबलस्पून कोरफड जेल घेऊन ते एका बाऊलमध्ये मिसळून घ्यावे. आता हा तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावून तो १५ मिनिटे किंवा संपूर्ण सुकेपर्यंत तसाच ठेवून द्यावा. नंतर कोमट पाण्याचे चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन व त्वचेच्या छिद्रांमध्ये अडकलेली घाण सहजरित्या निघून जाण्यास मदत मिळते. 

महागडे तेल-शाम्पू -केमिकल्सचा मारा टाळा, जावेद हबीब सांगतात सुंदर केसांसाठी ५ नॅचरल उपाय...

जास्वंद-मोगरा घालून केलेलं तेल लावा, विसरा केसाच्या समस्या! ऋजुता दिवेकरच्या आईने शेअर केला खास उपाय...

२. गव्हाचे पीठ व कडुनिंब :- गव्हाचे पीठ व कडुनिंब हे दोन्ही पदार्थ औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत. त्वचेचा पोत व रंग उजळवण्यासाठी या फेसपॅकचा उपयोग होऊ शकतो. हा फेसपॅक बनवण्यासाठी २ चमचे गव्हाचे पीठ आणि १ चमचा कडिनिंबाच्या पानांची पावडर मिसळा आणि नंतर त्यात थोडे गुलाबपाणी  घाला. आता हा फेस पॅक चेहरा आणि मानेवर लावा आणि कोरडे झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.  

मेकअप बिघडला म्हणून चेहरा धुण्याची गरज नाही, ५ टिप्स - ५ मिनिटांत मेकअप करा परफेक्ट...

फेशियल नेमके किती दिवसांनी करायला हवे? महिन्यातून एकदा केले तर त्वचेला खरंच फायदा होतो?

३. गव्हाचे पीठ व बीटरूट :- त्वचेची हरवलेली चमक परत मिळवण्यासाठी आपण पीठ आणि बीटरूटचा फेसपॅक देखील लावू शकतो. हा फेसपॅक तयार करण्यासाठी २ चमचे गव्हाचे पीठ, बीटरूट पेस्ट आणि गुलाबपाणी चांगले मिसळून पेस्ट तयार करा. आता ते चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर हा फेसपॅक पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स