स्किन केअर रूटीनमध्ये स्क्रबिंगचा समावेश करणे आवश्यक असते. आपली त्वचा सुंदर, नितळ, चांगली दिसावी म्हणून आपण त्वचेसाठी फेसमास्क, फेसस्क्रब, फेशियल अशा अनेक उपायांचा वापर करतो. त्वचेवर जमा झालेली धूळ, प्रदूषण, घाण, माती आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी स्क्रबिंग करणे फार गरजेचे असते. आपण स्क्रबिंगच्या मदतीने आपली त्वचा अगदी खोलवर स्वच्छ करु शकता. जेव्हा त्वचेचा रंग डल किंवा काळपट होतो तेव्हा स्क्रबिंगच्या मदतीने आपण त्वचेचा रंग उजळवू शकतो. स्क्रबिंग केल्यावर आपली त्वचा अॅक्टिव्ह होते आणि ती अधिक सुंदर दिसू लागते(Water Chestnut Scrubbing).
त्वचेला स्क्रबिंग करण्यासाठी आपल्याला बाजारांतून महागडे स्क्रबिंग आणायची गरज नाही. आपण घरच्या घरी देखील नैसर्गिक पदार्थांचा वापर करून स्क्रब तयार करु शकतो. घरात उपलब्ध असणाऱ्या अगदी मोजक्याच पदार्थांचा वापर करुन आपण स्क्रब तयार करु शकतो. उपवासाला वापरल्या जाणाऱ्या शिंगाड्याच्या पिठापासून आपण घरच्या घरी नॅचरल स्क्रब (Singhara Powder Benefits) तयार करु शकतो. शिंगाड्याच्या पिठापासून आपण अनेक चविष्ट पदार्थ तर करतो परंतु याच पिठाच्या वापर करुन आपण आपल्या त्वचेचे सौंदर्य अधिक खुलवून आणू शकतो. शिंगाडयाच्या पिठापासून स्क्रब कसे तयार करावे आणि त्याचा त्वचेला कोणत्या प्रकारचा फायदा होतो ते पाहूयात(Singhara flour scrub benefits for skin whitening).
शिंगाड्याच्या पिठाचा स्क्रब बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-
१. शिंगाड्याचे पीठ - २ टेबलस्पून
२. मध - १/२ टेबलस्पून
३. दही - १ टेबलस्पून
४. गुलाबपाणी - १/२ टेबलस्पून
शिंगाड्याच्या पिठाचा स्क्रब कसा तयार करावा ?
शिंगाड्याच्या पिठाचा स्क्रब तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये शिंगाड्याचे पीठ, मध, दही, गुलाबपाणी असे सगळे पदार्थ एकत्रित घेऊन त्याचंही थोडी घट्टसर पेस्ट तयार करुन घ्या. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस देखील घालू शकता. सर्व साहित्य चांगले मिसळा आणि जाडसर पेस्ट बनवा. तयार केलेला स्क्रब तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर हळूवारपणे लावा आणि नंतर गोलाकार हात फिरवत हलक्या हाताने मसाज करा. ५ ते १० मिनिटे मसाज केल्यानंतर, चेहऱ्यावर ते तसेच राहून कोरडे होऊ द्या आणि नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
शोभितासारखा ग्लो हवा चेहऱ्यावर? पाहा तिचे सोपे सिक्रेट - एकदा लावा चेहऱ्यावर येईल चमक...
शिंगाड्याचे पीठ पाण्यात मिसळून लावण्याचे फायदे...
१. शिंगाड्याच्या पिठात नैसर्गिक गुणधर्म असतात जे त्वचेला एक्सफोलिएट करतात. शिंगाड्याचे पीठ आणि पाणी एकत्रित करुन बनवलेले स्क्रब त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा मऊ होते. या घरी बनवलेल्या नॅचरल स्क्रबच्या नियमित वापराने त्वचा नैसर्गिकरीत्या चमकते.
२. शिंगाड्याच्या पिठापासून तयार झालेला स्क्रब पावसाळ्याच्या दिवसांत त्वचेला लावून स्क्रबिंग करणे फायदेशीर ठरते. कारण शिंगाड्याच्या पिठातील औषधी गुणधर्म तेलकट त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. हे त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रित करते आणि त्वचेची छिद्रे स्वच्छ ठेवते. यामुळे पिंपल्स आणि त्वचेच्या इतर समस्यांचा धोका कमी होऊ शकतो.
१ चमचा अळशी - १ चमचा तांदुळाचे पीठ, उपाय साधा- चेहऱ्यावरून तुमचं वय ओळखता येणार नाही...
३. शिंगाड्याच्या पिठाने त्वचेला स्क्रबिंग केल्याने त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होते. यामुळे त्वचेतील साचलेली घाण काढून टाकण्यास मदत मिळते, ज्यामुळे त्वचा आतून स्वच्छ होऊन अधिक चमकदार दिसते.
४. शिंगाड्याच्या पिठामध्ये फार मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात जे त्वचेवरील एजिंगची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. त्वचेवर शिंगाड्याच्या पिठाचा स्क्रब वापरल्याने त्वचेवरील एजिंगच्या सुरकुत्या आणि बारीक रेषा हळुहळु कमी होतात. याच्या नियमित वापराने त्वचा तरूण आणि टवटवीत राहते.