खोबरेल तेलाचा वापर आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे केला जातो. त्वचा व आरोग्यासाठी कोकोनट ऑईल उत्तम मानले जाते. खोबरेल तेल हे एक सर्वोत्तम मॉइश्चरायझिंग एजंट आहे. याचा वापर दैनंदिन आयुष्यात अनेक प्रकारे केले जाऊ शकते. त्यात असे अनेक पोषक घटक आढळतात, जे आपल्या त्वचेला आतून आणि बाहेरून पोषण देतात. रात्री खोबरेल तेलाचा वापर केल्यास सकाळी याचा रिझल्ट दिसून येतो.
या तेलामध्ये कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देण्यापासून, ते अँटिऑक्सिडंट्ससह त्वचेचे संरक्षण करण्यापर्यंतचे गुणधर्म आहेत. यासह अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. केसांना लावण्यापलीकडे खोबरेल तेलाचे ६ जादुई फायदे कोणते आहेत ते पाहूयात(Six Benefits of Coconut Oil).
दात पॉलिश
खोबरेल तेलात लॉरिक अॅसिड असते. जे अँटी-मायक्रोबियल गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे बॅक्टेरिया नष्ट करते आणि दात किडण्यापासून रोखते. हिरड्यांची सूज आणि दातांची संवेदनशीलता कमी करण्यासोबतच हे तेल दात पांढरे करण्यासाठीही उपयुक्त आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या तेलाने दातांचा मसाज करा.
केस गळती होते कमी
जर आपले केस वारंवार गळत असतील तर, केसांवर खोबरेल तेल लावून मसाज करा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा खोबरेल तेल केसांना लावा, व नंतर शॅम्पू-कंडिशनर लावून केस धुवा.
चेहऱ्यापेक्षा मान काळी दिसते? ४ घरगुती सोपे उपाय, काही दिवसात मान होईल स्वच्छ
नखांसाठी फायदेशीर
नारळाचे तेल नखे आणि त्याच्या सभोवतालची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी देखील फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी नखांवर आणि त्याच्या आजूबाजूच्या त्वचेवर खोबरेल तेल लावून झोपा.
पापण्यांवर लावा
डोळ्यांचे आणि चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याचे काम पापण्या करतात. जर पापण्यांना मजबूत आणि दाट बनवायचे असेल तर, झोपण्यापूर्वी त्यावर खोबरेल तेल लावा. यामुळे पापण्या दाट होतील.
भुवया
भुवयांच्या पातळ केसांमुळे कधी कधी लूक खराब दिसतो. भुवयांचे केस काळे किंवा दाट होण्यासाठी त्यांच्यावर खोबरेल तेल लावा. रात्री झोपण्यापूर्वी लावणे उत्तम ठरेल. यामुळे काही दिवसात भुवया दाट होतील.
फक्त २० रुपयांत ३ स्टेप्स वापरुन घरच्याघरी करा पेडिक्युअर, पाय दिसतील सुंदर-स्वच्छ
ओठांसाठी फायदेशीर
बदलत्या ऋतूनुसार ओठांची काळजी घ्यावी लागते. काही वेळेस मॉइश्चर नसल्यामुळे ओठ फुटतात, ओठ फुटल्यानंतर खूप वेदना होते. जर आपल्याला ओठांची समस्या असल्यास दिवसातून किमान दोनदा तेल लावा. ओठांचा काळपटपण कमी करण्यासाठी आपण रात्री ओठांना तेल लावून झोपू शकता.