उन्हामुळे चेहरा काळवंडतो. तसेच अति थंडीमुळेही चेहरा काळवंडतो. (skin around the lips is getting darker? causes and remedies )त्यासाठी डिटॅनिंग मास्क वगैरे आपण वापरतो. काही घरगुती उपायांनीसुद्धा ते टॅनिंग कमी करता येते. पण ओठांच्या आजूबाजूची त्वचा काळवंडली की ती पटकन बरी होतच नाही. एवढंच नाही तर ओठांच्या दोन्ही कोपर्यांना सतत खाजही येत राहते. पाणी लावल्यावर गालापासूनचा भाग पांढरा फटक होतो आणि मग अचानक काळवंडतो. याला टॅनिंग नाही तर पिगमेंटेशन म्हणतात. (skin around the lips is getting darker? causes and remedies )असं डॉ. अंकूर सारीन यांनी सागितले आहे. म्हणून ते डिटॅनिंग करून जात नाही. या समस्येमागे अनेक कारणे असतात.
१. स्थूलता हे या समस्येचे एक कारण आहे. शरीरातील नको असलेले घटक शरीर सुदृढ नसल्याने बाहेर पडत नाहीत. त्याचा परिणाम चेहर्यावरही होतो. (skin around the lips is getting darker? causes and remedies )हार्मोन्स संतुलित नसल्यानेही असे होते.
२. काही जणांना ओठांवरून जीभ फिरवायची सवय असते. ते ओठांवरून सारखी जीभ फिरवतात त्यामुळे देखील ओठांच्या आजूबाजूला पिगमेंटेशन होऊ शकते.
३. शरीरातील जीवनसत्त्व बी १२ कमी झाले तरी असा त्रास होतो. त्यामुळे चेकअप करून घ्या. बी१२ची कमतरता ही महिलांमधील मोठी समस्या आहे.
घरगुती उपाय १. जर असं पिगमेंटेशन तुम्हाला सारखे होत असेल तर आठवड्यातून एकदा दह्याचा मास्क चेहर्याला लावा. दोन चमचे दही घ्या. त्यामध्ये चमचाभर बेसन घाला. चमचाभर हळद घाला. तांदळाचे पीठही वापरू शकता. मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे. थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवा. मग गारेगार चेहर्याला लावा. सुकेपर्यंत ठेवा. नंतर धुऊन टाका.
२. चांगल्या कंपनीचे मॉइश्चरायझर वापरा. त्वचेसाठी फार फायदेशीर ठरते.
३. झोपण्याआधी गायीचे शुद्ध तूप चेहर्याला लावायचे. तुपामुळे त्वचेचे सगळेच त्रास बरे होतात. तुपामध्ये अनेक पोषकसत्व असतात.
हनवटी आणि ओठांचा भाग काळवंडण्यामागे अजूनही एक कारण असू शकते ते म्हणजे ऍलर्जी. तुम्हाला जर कोणत्या पदार्थाची किंवा प्रॉडक्टची ऍलर्जी असेल तरी ओठांच्या बाजूची त्वचा काळवंडते. त्या ठिकाणी सतत खाज येत राहते. असे होत असल्यास वेळीच डॉक्टरांची मदत घ्या.