वाढत्या उकाड्यात जेवढी शरीराची काळजी घ्यायला हवी तितकीच आपल्या त्वचेची. (How often to wash your face for oily skin) आपल्या त्वचेवरून अनेकदा आपला मूड कसा आहे हे समोरच्याला कळते. उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे आपण हैराण होतो.(Summer skincare routine for oily and dry skin) त्वचा कोरडी पडणे किंवा तेलकट होण्याच्या समस्येला वारंवार सामोरे जावे लागते. उन्हाळा सुरु झाला की, आपल्यापैकी अनेकांना वारंवार चेहरा धुण्याची सवय असते. (Best way to wash your face in summer)सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये आरोग्यासह आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घ्यायला हवी.(Managing oily and dry skin balance) त्वचा निर्जीव किंवा निस्तेज दिसू लागली आपल्या त्वचेचा रंग बदलतो. अनेकजण दैनंदिन जीवनातील स्किन केअर रुटीन देखील नीट पाळत नाही. त्यातील एक चेहरा वारंवार स्वच्छ करणे. (How many times should you wash your face in summer) चेहरा व्यवस्थित स्वच्छ केला नाही तर मुरुमे, तेलकट होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायला हवी? दिवसातून त्वचा किती वेळा धुवायला हवा? जाणून घेऊया. (Correct way to wash your face for clear skin)
काळपट ओठ होतील गुलाबी! ४ घरगुती उपाय, ओठ कायम दिसतील सुंदर आणि राहतील मऊ
1. चेहरा धुण्याची योग्य वेळ
2. तेलकट आणि मुरुमे असलेली त्वचा
जर आपली त्वचा तेलकट किंवा चेहऱ्यावर मुरुमे असतील तर किमान दिवसातून दोन वेळा चेहरा स्वच्छ करावा. जेव्हा त्वचा जास्त तेलकट असते. तेव्हा दिवसातून दोन वेळा चेहरा धुतल्याने मुरुमे कमी होतात. उन्हाळ्यात घामामुळे वैतागले असाल तर चेहरा तीन-चार वेळा धुवू शकता.
3. कोरडी आणि संवेदनशील त्वचा
जर आपली त्वचा कोरडी आणि संवेदनशील असेल तर दिवसातून दोनदा चेहरा धुणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. कोरड्या त्वचेसाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे सकाळी थंड पाण्याने चेहरा धुणे आणि रात्री झोपण्यापूर्वी फेश वॉशने चेहरा क्लिन करणे. यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकून राहातो आणि कोरडेपणा वाढत नाही.
4. कॉम्बिनेशन स्किन
आपली त्वचा ड्राय आणि तेलकट असेल तर दिवसातून दोन वेळा चेहरा स्वच्छ करायला हवा. त्वचा कोरडी किंवा त्वचेला सतत खाज येत असेल तर हायड्रेटिंग क्रिमी क्लींजरचा वापर करु शकता.
जास्त वेळा चेहरा धुणे वाईट ?
अनेकदा आपण चेहरा पाण्याने सारखा धुत राहातो. त्यामुळे त्वचा स्वच्छ होते पण त्वचेसाठी हे हानिकारक असू शकते. वारंवार चेहरा धुतल्याने त्वचेवरील नैसर्गिक तेल निघून जाते. यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते आणि जळजळ देखील होईल.