Lokmat Sakhi >Beauty > उकडलेल्या बटाट्यांनी मिळवा ग्लोईंग टवटवीत त्वचा; टॅनिंग घालवण्यासाठी वाचा वापराची योग्य पद्धत

उकडलेल्या बटाट्यांनी मिळवा ग्लोईंग टवटवीत त्वचा; टॅनिंग घालवण्यासाठी वाचा वापराची योग्य पद्धत

Skin benefits of potato : आज आम्ही तुम्हाला उकडलेल्या बटाट्याचे फायदे सांगणार आहोत. दिवसातून दोन ते तीनवेळी तुम्ही उकळलेल्या बटाट्याच्या फेसपॅकचा वापर करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 05:09 PM2021-05-23T17:09:21+5:302021-05-23T17:28:22+5:30

Skin benefits of potato : आज आम्ही तुम्हाला उकडलेल्या बटाट्याचे फायदे सांगणार आहोत. दिवसातून दोन ते तीनवेळी तुम्ही उकळलेल्या बटाट्याच्या फेसपॅकचा वापर करू शकता.

Skin benefits of potato : Boiled potato face pack for glowing skin | उकडलेल्या बटाट्यांनी मिळवा ग्लोईंग टवटवीत त्वचा; टॅनिंग घालवण्यासाठी वाचा वापराची योग्य पद्धत

उकडलेल्या बटाट्यांनी मिळवा ग्लोईंग टवटवीत त्वचा; टॅनिंग घालवण्यासाठी वाचा वापराची योग्य पद्धत

सगळ्यांच्याच स्वयंपाक घरात बटाट्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तुम्हाला कल्पना असेलच आरोग्याप्रमाणेच सौंदर्याच्या दृष्टीनंही बटाट्याचे अनेक फायदे असतात. कच्या बटाट्याचा रस, किस यांचा वापर करून अनेकजण त्वचेवरच्या डागांपासून तसंच डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांपासून सुटका मिळवतात. आज आम्ही तुम्हाला उकडलेल्या बटाट्याचे फायदे सांगणार आहोत. दिवसातून दोन ते तीनवेळा तुम्ही उकळलेल्या बटाट्याच्या फेसपॅकचा वापर करू शकता. चला तर मग जाणून घेऊया बटाट्याचा फेसपॅक तयार करण्याची पद्धत  आणि फायदे

बटाट्याचा फेस पॅक तयार करण्याची पद्धत

फेस पॅक बनवण्यासाठी प्रथम उकडलेले बटाटे, लिंबू, दही आणि मध घ्या. बटाट्यामध्ये लिंबू, दही आणि मध मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर चांगले लावा. ही पेस्ट चेहऱ्यावर 15 मिनिटांसाठी लावा. 15 मिनिटांनंतर आपला चेहरा स्वच्छ पाण्याने स्वच्छ करा. उकडलेल्या बटाट्याचा फेस पॅक वापरुन त्वचेचा टोन साफ ​​केला जाऊ शकतो. हे फेस पॅक वापरुन उन्हामुळे होणारं फेस टॅनिंग देखील काढून टाकता येतो. जर आपण मुरुम आणि पिंपल्समुळे त्रस्त असाल तर हा पॅक आपल्यासाठी योग्य असेल. बटाट्याचा फेसपॅक लावल्याने त्वचा टाईंटनिंग होण्यासह सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. 

बटाटा आणि मसुरची डाळ

मसूरची डाळ तुम्हाला लागेल तितक्या अंदाजाप्रमाणे वाटून घ्या. त्यात बटाट्याचा रस ५ चमचे, २ चमचे लिंबाचा रस आणि १ मोठा चमचा मध घाला. हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि २० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धूवून घ्या. बटाटा हे नैसर्गिक ब्लीच आहे. तसंच त्यामुळे तुमच्या त्वचेला अनेक फायदे मिळतील.

दही आणि बटाटा

एक मोठा चमचा बटाट्याची पेस्ट तयार करा. यामध्ये एक मोठा चमचा दही एकत्र करा. तयार पेस्ट जवळपास अर्धा तासासाठी तशीच ठेवा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट स्किन ग्लो करण्यासोबतच टाइट करण्यासाठीही मदत करते. 

मुलतानी मातीसह बटाटा

हा पॅक स्किन चमकदार करण्यास मदत करतो. तसेच डाग दूर करण्यासोबतच सूज कमी करण्यासाठीही मदत करतो. हा फेस पॅक तयार करण्यासाठी बटाट्याची साल न काढता पेस्ट तयार करा. त्यामध्ये 3 ते 4 चमचे मुलतानी माती आणि काही थेंब गुलाबाचे पाणी एकत्र करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा आणि 30 मिनिटांनतर चेहरा धुवून टाका. हा फेस पॅक काही दिवस नियमितपणे लावल्याने स्किन ग्लो करण्यास मदत होते.  

बटाट्याचे त्वचेला फायदे

१) बटाट्याचा पॅक त्वचेला लावल्याने पिगमेंटेशन कमी होते, त्वचेतील घाण निघून जाते. १०-१५ दिवस बटाट्याचा रस लावल्यानं नक्कीच उजळदार त्वचा मिळते. 

२) डोळ्यांच्या खाली सूज व काळी वर्तुळे असल्यास ताज्या बनवलेल्या बटाट्याच्या रसात कापसाचा बोळा ओला करून डोळ्यांभोवती लावा. असे रोज केल्यास सूज व काळी वर्तुळे दूर होण्यास मदत होईल.

३) चेहरा उजळवण्यासाठी बटाट्याच्या रसात चिमुटभर हळद घाला. हे मिश्रण मानेवर आणि चेहऱ्यावर लावा. 30 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या.

४) बटाट्याच्या रसामध्ये बेकिंग सोडा एकत्र करा. या मिश्रणामध्ये थोडं पाणी घालून क्लिंजिंग करा. त्यामुळे त्वचेची रोमछिद्र स्वच्छ होण्यास मदत होते. 

Web Title: Skin benefits of potato : Boiled potato face pack for glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.