Join us  

ग्लोइंग, सतेज त्वचा हवी तर नियमित खा ३ गोष्टी; नितळ त्वचेचे हेल्दी सिक्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2022 3:48 PM

Skin Care Diet Tips : त्वचा चांगली हवी किंवा चेहऱ्यावर खूप डाग, फोड, पिंपल्स, सुरकुत्या नको असतील तर आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे...

ठळक मुद्देएक्सफॉलिएशन, इन्फ्लमेशन आणि नवीन स्कीन निर्माण होण्यासाठी दह्यातील अल्फा हायड्रोक्सी अॅसिडचा अतिशय चांगला फायदा होतो.  बीटामुळे रक्त शुद्ध होण्याचे काम होते आणि शरीर डीटॉक्सिफाय होण्यास मदत होत असल्याने बीट उपयुक्त ठरते

आपली त्वचा चित्रपटातील किंवा टीव्हीतील अभिनेत्रींसारखी नितळ दिसावी असं प्रत्येकीला वाटतं. पण या अभिनेत्री महागडी प्रॉडक्ट वापरतात किंवा पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंटस करतात म्हणून त्यांची त्वचा इतकी छान ग्लोइंग असते असं आपल्याला वाटतं. पण त्याशिवायही या अभिनेत्री आपल्या फिटनेसची आणि आहाराची भरपूर काळजी घेतात. ज्याचा परिणाम त्यांच्या फिगरवर आणि त्वचेवर होत असतो. मलायका अरोरा, आलिया भट, करीना कपूर, शिल्पा शेट्टी यांसारख्या अभिनेत्री आहार आणि फिटनेसच्या बाबतीत काय काय करतात हे अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर येतच असते. त्यामुळे त्वचा चांगली हवी किंवा चेहऱ्यावर खूप डाग, फोड, पिंपल्स, सुरकुत्या नको असतील तर इतर गोष्टींबरोबरच चांगला आहार घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे (Skin Care Diet Tips). 

(Image : Google)

त्वचेशी निगडीत गोष्टी या आपल्या जीवनशैलीशी आणि आहार किंवा पचनाच्या तक्रारींशी निगडीत असतात. त्यामुळे त्वचा चांगला राहावी यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश नियमितपणे असायला हवा याविषयी समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स देतात. त्या सोशल मीडियावर कायम अॅक्टीव असून इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या फॉलोअर्सना काही ना काही टिप्स देत असतात. नुकतीच त्यांनी त्वचा चांगली राहण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टी घ्यायला हव्यात याविषयी एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्या कोणते पदार्थ खाण्यास सांगतात आणि त्या पदार्थांचा कसा उपयोग होतो ते पाहूया...

१. बीट 

बीटामध्ये असणारे घटक अँटीएजिंगचे काम करतात. तसेच यातील सी व्हिटॅमिन मेलानिनची निर्मिती कमी करण्यास मदत करतात. यातील काही घटक हे अँटीइन्फ्लमेटरी म्हणून काम करत असल्याने त्याचाही त्वचेसाठी फायदा होतो. ज्यांना हायपरपिगमेंटेशनचा त्रास आहे किंवा चेहरा कमी वयात सुरकुतायला सुरुवात झाली असे वाटते. अशांनी आहारात बीटाचा अवश्य समावेश करावा. बीटामुळे रक्त शुद्ध होण्याचे काम होते आणि शरीर डीटॉक्सिफाय होण्यास मदत होत असल्याने चमकदार त्वचेसाठी बीटाचा आहारात अवश्य समावेश करायला हवा. 

२. तूप 

तूप हे आपल्या आरोग्यासाठी ज्याप्रमाणे महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे ते आपल्या त्वचेसाठीही अतिशय आवश्यक असते. तूपामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिडस आणि अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण भरपूर असल्याने त्वचेचे पोषण होण्यास मदत होते. तसेच तूपात व्हिटॅमिन ए आणि फॅटी अॅसिड्स जास्त प्रमाणात असल्याने नैसर्गिक मॉइश्चरायजर म्हणून तुपाचा वापर करता येतो. त्यामुळे त्वचा नितळ, सतेज हवी तर आहारात तूपाचा चांगल्या प्रमाणात समावेश करायला हवा. 

३. दही 

दह्यामध्ये लॅक्टीक अॅसिड असल्याने ते त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असते. एक्सफॉलिएशन, इन्फ्लमेशन आणि नवीन स्कीन निर्माण होण्यासाठी दह्यातील अल्फा हायड्रोक्सी अॅसिडचा अतिशय चांगला फायदा होतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी