Join us

एक पैसाही खर्च न करता त्वचा हाेईल सुंदर- दिसाल तरुण, रोज फक्त ५ मिनिटे करा हे काम - सुरकुत्या गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2023 18:33 IST

How To Look Young And Beautiful: त्वचेवरील सुरकुत्या होतील कमी आणि दिसाल आणखी तरुण आणि सुंदर. बघा हा सोपा उपाय...(wrinkle free skin)

ठळक मुद्देत्वचा अशी सुरकुतलेली वाटत असेल तर दिवसातला फक्त ५ मिनिटांचा वेळ त्वचेसाठी द्या

आहारात झालेला बदल, त्वचेला पोषण मूल्यांची असणारी कमतरता, प्रदूषण याचा परिणाम आता त्वचेवर होऊ लागला आहे, यामुळेच अनेक जणींना कमी वयात त्वचेवर सुरकुत्या येण्याचा त्रास होत आहे, डोळ्यांच्या आसपासची त्वचा, ओठांच्याकडेची त्वचा, कपाळ हे भाग जरा लवकरच सुरकुतल्यासारखे दिसत आहेत. तुमचीही त्वचा अशी सुरकुतलेली वाटत असेल तर दिवसातला फक्त ५ मिनिटांचा वेळ त्वचेसाठी द्या आणि बघा एक पैसाही खर्च न करता कशी तरुण, तजेलदार त्वचा तुम्हाला मिळते. यासाठी आपण फेस मसाज किंवा फेस योगा ही पद्धती वापरणार आहोत.(Face yoga or face massage for wrinkle free skin)

 

चेहऱ्यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी फेस योगाहा उपाय इंस्टाग्रामच्या faceyogabysavitusingh या पेजवर सुचविण्यात आला आहे. यामध्ये फेस योगा सांगण्यात आला असून ५ पद्धतीने चेहऱ्याला मसाज करा असे सांगितले आहे. ते कसे ते आता पाहूया१. पहिल्या व्यायामात हाताची मुठ घाला. बोटे कपाळावर टेकवा आणि कपाळाच्या मध्यापासून ते दोन्ही कोपऱ्यापर्यंत दोन्ही हात फिरवा. असे ५ ते ७ वेळा करावे. यामुळे कपाळावरच्या सुरकुत्या कमी होतात.

पाकिटात चिप्स- चिवडा उरला तर पाकिटाचं तोंड बंद करण्याची १ खास ट्रिक, प्रवासात ठरेल उपयुक्त

२. दुसऱ्या प्रकारात हाताची पहिली दोन बोटे वापरावीत. ही बोटे दोन्ही डोळ्यांच्या नाकाजवळच्या टोकावर ठेवावीत. तिथून डोळ्यांच्या बरोबर खाली ओढून कानाच्या बाजूने यू आकारात वर न्यावी. यामुळे डोळ्यांखाली सुरकुत्या येणार नाहीत.

 

३. तिसऱ्या प्रकारात पहिले बोट आणि अंगठा यामध्ये भुवईला पकडा आणि भुवईचे सुरुवातीचे टोक, शेवटचे टोक आणि मध्यभाग यांना वरच्या बाजुने ओढा. यामुळे डोळ्यांवरची त्वचा सुरकुतणार नाही.

केसांचा कोरडेपणा, केस गळणं आणि कोंडा- ३ समस्यांवर एकच उपाय, वापरून बघा हा खास शाम्पू

४. चाैथ्या व्यायामात दोन्ही हातांच्या मुठी घाला. सुरुवातीला मुठी नाकाजवळ ठेवा. त्यानंतर गालाच्या खालून वर ओढून कानाच्या मागे न्या. अशा पद्धतीने U शेपमध्ये गालाच्या खालून हात फिरवा.

५. पाचव्या व्यायामात हनुवटीच्या खाली हाताची मुठ ठेवा आणि जॉ लाईननुसार हाताची बोटे दोन्ही कानांच्या दिशेने वर ओढा. हे सगळे व्यायाम ५ ते ७ वेळा करावेत.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीयोगासने प्रकार व फायदे