Join us  

एक चुटकी हळद की किंमत तुम क्या जानो.. लावा ३ प्रकारे, चेहऱ्यावर येईल गोल्डन ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2023 1:57 PM

Skin Care: Fight Skin Problems With Turmeric; Learn Ways To Use For Glowing Skin उन्हाळ्यात चेहऱ्याला हळद लावावी की नाही, असा प्रश्न पडला आहे? हे घ्या उत्तर..

बदलत्या हवामानानुसार चेहऱ्यावर अनेक बदल घडतात. आता उन्हाळा सुरु झाला. उष्णता वाढली की अंगाची लाही - लाही होते. रखरखत्या उन्हापासून त्वचेचा सांभाळ करणे अवघड जाते. ज्यामुळे चेहऱ्यावर टॅनिंग, मुरूम - डाग पडणे अशा समस्या उद्भवतात.

त्वचेचे नुकसान झाल्यानंतर काळजी घेण्याऐवजी, आधीपासूनच स्किन केअर रुटीनचे पालन करा. अनेक जण विविध स्किन प्रोडक्ट्सचा वापर करतात. परंतु, बाजारात मिळणाऱ्या ब्युटी प्रोडक्टऐवजी आयुर्वेदिक हळदीचा वापर करून पाहा. हळदीच्या वापरामुळे त्वचा चांगल्या पद्धतीने एक्सफोलिएट होते, व नैसर्गिक चमक मिळते.

हळदमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटीफंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेची योग्य काळजी घेतात. हळद व इतर साहित्य मिसळून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवर ग्लो येतो. हळद लावल्यामुळे त्वचेतील इतर समस्या दूर होतात. त्यामुळे उन्हाळ्यात हळद लावण्याचा सल्ला मिळतो. हळदीची पेस्ट चेहऱ्यासाठी कशी फायदेशीर आहे, व ती कशी वापरायची ते जाणून घेऊया.

हळद आणि मध

कच्च्या मधामध्ये असणारे पोषक घटक त्वचेसाठी चांगले मानले जातात. यासाठी एका वाटीत मध घ्या, त्यात हळद पावडर मिक्स करा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. फेसपॅक सुकल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा. या फेसपॅकमुळे त्वचेची समस्या सुटेल.

हळद आणि गुलाब जल

स्किन केअर रुटीनमध्ये गुलाब जलचा वापर हा होतोच. अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध, गुलाब पाणी केवळ चेहर्‍याची चमकच वाढवत नाही, तर चेहर्‍याला पोषण देखील देते. यासाठी एका वाटीत हळद पावडर व गुलाब जल घेऊन मिक्स करा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. काही वेळानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

हळद आणि दही

शरीरासह त्वचेसाठी दही उपयुक्त आहे. उन्हाळ्यात दहीपासून तयार ताक व लस्सीचे सेवन हमखास केले जाते. दह्यात लॅक्टिक ऍसिड असल्यामुळे त्वचा चमकदार होते. यासाठी एका वाटीत दही आणि हळद पावडर मिक्स करा. मिश्रण चेहऱ्यावर लावा. काही वेळानंतर चेहरा धुवा. चेहऱ्याला उजळ करण्यासाठी हा फेसपॅक मदत करेल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी