Join us  

Skin Care For Summer: उन्हाळ्यात प्रवास? सनबर्न, टॅनिंग होऊन त्वचेचे हाल टाळण्यासाठी करा ५ उपाय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 6:41 PM

How to Protect Skin From Tanning:उन्हाळ्यात हमखास कुठे ना कुठे व्हॅकेशन प्लॅन केलं जातं.. उन्हाळी सुटीचा छान आनंद घ्या, पण त्या नादात त्वचा तर खराब होणार नाही ना, याची काळजीही घ्या.. 

ठळक मुद्देउन्हाळी सुटीत प्रवासाला निघाला आहात म्हटल्यावर 'ही' गोष्ट तुमच्या पर्समध्ये असणं खूप खूप गरजेचं आहे.

मुलांना एकदा सुटी लागली की हमखास घरोघरी चर्चा रंगते की या सुटीत फिरायला कुठे जायचंय याची... घरात जर एखादं लग्नकार्य नसेल तर मग नक्कीच एखादा मोठा टूर प्लॅन केला जातो. घरातून बाहेर पडेपर्यंत बाहेर निघण्याचा उत्साह अमाप असतो. पण एकदा का प्रवास सुरू झाला की मग उन्हाच्या झळा अक्षरश: होपळून काढू लागतात. प्रवासात बऱ्याचदा आपल्याकडून आपलं स्किन केअर रुटीनही (skin care routine for summer) व्यवस्थित पाळलं जात नाही. त्यामुळे मग प्रवास संपूवन आपण घरी आलो की चेहऱ्यावर सनबर्न, टॅनिंग झाल्याच्या खाणाखुणा दिसू लागतात.(sun burn during summer vacation)

 

प्रवासात असल्यावर कशी घ्यावी त्वचेची काळजी१. सनस्क्रिन (sunscreen)उन्हाळी सुटीत प्रवासाला निघाला आहात म्हटल्यावर ही गोष्ट तुमच्या पर्समध्ये असणं खूप खूप गरजेचं आहे. दिवसातून २ ते ३ वेळा सनस्क्रिन लावा आणि सनस्क्रिन लावल्यानंतर १५ ते २० मिनिटे थेट सुर्यप्रकाशात यायचं नाही, हा नियम कटाक्षाने पाळा

 

२. पाणी भरपूर प्या (dehydration)प्रवासात अनेकदा पोटभर, पुरेसं पाणी प्यायला मिळत नाही. किंवा थोडसंच पाणी असल्याने आपण ते पुरवून पुरवून पिण्याचा प्रयत्न करतो. हा सगळा त्रास नंतर मात्र आपल्या त्वचेला सहन करावा लागतो. पाणी कमी प्यायल्याने डिहायड्रेशन होतं आणि त्याचा परिणाम त्वचेवर होतो. कोरडी, रुक्ष त्वचा लवकर टॅन होते.

 

३. ही फळे खा.. (fruits)टॅनिंग आणि सनबर्न कमी व्हावं यासाठी काही फळ अवश्य खावीत. ही फळं नॅचरल सनस्क्रिन एजंट म्हणून काम करतात. या फळांमध्ये सगळ्यात आधी येतात ती द्राक्षं आणि त्यानंतर डाळिंब. त्यामुळे प्रवासात असताना शक्य तेवढी द्राक्षं आणि डाळिंब खा.

 

४. हॅट वापरायला विसरू नका (use of hat)हॅट वापरणं हे आपल्याला फक्त एक स्टाईल वाटते. पण तसं नाहीये. कारण हॅट घातल्याने खरोखरंच सुर्यप्रकाश थेट तुमच्या कपाळावर येत नाही. तसेच कपाळ सोडून बाकीच्या चेहऱ्यावरही तो ओझरता पडतो. त्यामुळे हॅटचा वापर करून टॅनिंग आणि सनबर्नचा त्रास बऱ्याच प्रमाणात टाळता येतो.

 

५. नाईट स्किन केअर (night care routine)दिवसभरात तर त्वचेसाठी काय काय पाहिजे, हे तर आपण जाणून घेतलं. आता तेवढंच गरजेचं आहे ते प्रवासात असताना रात्री आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणं. दररोज रात्री झोपण्यापुर्वी जर बर्फ मिळाला तर तो तुमच्या त्वचेवर १५ ते २० सेकंद हलक्या हाताने फिरवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पुसून कोरडा करा आणि वॉटर बेस नाईट क्रिम लावून चेहऱ्याला मसाज करा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसमर स्पेशल