Join us  

Skin Care: चेहऱ्यापेक्षा कपाळावर टॅनिंग जास्त? काळवंडण्याची कारणं आणि ५ सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2022 8:37 PM

Beauty Tips: चेहऱ्याच्या इतर भागापेक्षा कपाळावरच जास्त टॅनिंग का होतं? तुमचंही तसंच होत असेल तर हे काही घरगुती उपाय (home remedies) करून बघा..

ठळक मुद्देत्वचेकडे केलेलं दुर्लक्ष हे त्यामागचं एक कारण असू शकतं. पण त्या व्यतिरिक्तही इतर काही कारणांमुळे कपाळावरची त्वचा आणि चेहऱ्याची इतर त्वचा यांच्यात फरक दिसू शकतो..

हा अनुभव बऱ्याच जणांना येतो. चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागाचा रंग वेगवेगळा (uneven skin tone) दिसतो. चेहरा छान एकसमान आणि एकाच रंगाचा म्हणजेच इव्हन टोन दिसावा अशी अनेकांची इच्छा असतेच. पण बऱ्याचदा इतर चेहऱ्याच्या मानाने कपाळावर जरा जास्तच टॅनिंग झालेलं दिसतं. आपणच आपल्या त्वचेकडे केलेलं दुर्लक्ष हे त्यामागचं एक कारण असू शकतं. पण त्या व्यतिरिक्तही इतर काही कारणांमुळे कपाळावरची त्वचा आणि चेहऱ्याची इतर त्वचा यांच्यात फरक दिसू शकतो..(tanning on forehead)

 

कपाळावर जास्त टॅनिंग होण्याची कारणं- खूप कडक उन्हात अधिक वेळ थांबणे- हार्मोनल बदल किंवा असंतुलन- अशक्तपणा किंवा हिमोग्लोबिनची कमतरता.- व्हिटॅमिन्सची कमतरता- अपुरी झोप

 

कपाळ जास्त टॅन झाल्यास उपाय (solutions for tanned forehead)१. हार्मोन्स, अशक्तपणा किंवा हिमोग्लोबिनची कमतरता यामुळे जर कपाळ काळवंडलेले दिसत असेल तर त्यासाठी डॉक्टरकडे जाऊन त्यांच्याकडूनच योग्य ते उपचार घेणे गरजेचे आहे.२. या व्यतिरिक्त जर उन्हामुळे टॅनिंग झाले असेल तर त्यावर अनेक घरगुती उपाय करता येतात. यासाठीचा एक मुख्य उपाय म्हणजे सगळा चेहरा स्कार्फने व्यवस्थित बांधून तर घ्याच, पण त्यासोबतच हॅट किंवा कॅपचा वापरही नियमित करा. हॅट आणि कॅपमुळे कपाळावर थेट सुर्यकिरणं येत नाहीत.

३. कपाळ काळे पडले असेल तर त्यावर हळद, बेसन आणि दही याचा लेप लावावा. २ ते ३ मिनिटे राहू द्यावा आणि त्यानंतर चोळून चोळून काढावा. कपाळ स्वच्छ दिसेल.४. बटाट्याचा रसदेखील या समस्येवर अतिशय गुणकारी ठरतो. बटाटा किसून घ्या आणि त्याचा रस काढा. त्यामध्ये लिंबाचा रस टाका. हे मिश्रण कपाळावर चोळा आणि १० ते १२ मिनिटांनी धुवून टाका.५. मध, कॉफी आणि लिंबू यांचा लेपही कपाळावरचे टॅनिंग कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसमर स्पेशल