Lokmat Sakhi >Beauty > Skin Care : त्वचा नेमकी कशी आहे, ड्राय-ऑइली की मिक्स? कसा ओळखाल त्वचा प्रकार..

Skin Care : त्वचा नेमकी कशी आहे, ड्राय-ऑइली की मिक्स? कसा ओळखाल त्वचा प्रकार..

ब्यूटी प्रोडक्ट्सवर हमखास लिहिलेली गोष्ट म्हणजे ते प्रोडक्ट कोणत्या स्किन टाईपसाठी योग्य आहे. जोपर्यंत स्किन टाईप म्हणजेच आपल्या त्वचेचा प्रकार कळत नाही, तोपर्यंत आपल्याला त्वचेसाठी सर्वोत्तम ब्यूटी प्रोडक्ट निवडता येत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 05:44 PM2021-08-23T17:44:17+5:302021-08-23T17:44:49+5:30

ब्यूटी प्रोडक्ट्सवर हमखास लिहिलेली गोष्ट म्हणजे ते प्रोडक्ट कोणत्या स्किन टाईपसाठी योग्य आहे. जोपर्यंत स्किन टाईप म्हणजेच आपल्या त्वचेचा प्रकार कळत नाही, तोपर्यंत आपल्याला त्वचेसाठी सर्वोत्तम ब्यूटी प्रोडक्ट निवडता येत नाही.

Skin Care: How to identify skin type? oily, dry, normal, mix or sensitive skin type | Skin Care : त्वचा नेमकी कशी आहे, ड्राय-ऑइली की मिक्स? कसा ओळखाल त्वचा प्रकार..

Skin Care : त्वचा नेमकी कशी आहे, ड्राय-ऑइली की मिक्स? कसा ओळखाल त्वचा प्रकार..

Highlightsआपली त्वचा कशी आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला घरबसल्या एक सोपी टेस्ट करायची आहे. पण ती टेस्ट योग्य वेळी करणं खूप गरजेचं आहे.

प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असते. कुणाची स्किन खूपच रूक्ष आणि कोरडी असते. तर कुणाची त्वचा ऑईली असते. कुणी संवेदनशील त्वचेमुळे त्रस्त असतं, तर कुणाला आपली त्वचा कधी कोरडी तर कधी ऑईली वाटत असते. प्रत्येक स्किन टाईपच्या वेगवेगळ्या समस्या असतात आणि त्याचे वेगवेगळे सोल्यूशन्स असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण वापरत असलेल्या ब्यूटी प्रोडक्ट्सचा जर चांगला उपयोग आपल्या त्वचेवर व्हावा, असं वाटत असेल तर आपल्याला ब्यूटी प्रोडक्ट्सची निवड अत्यंत काळजीपुर्वक करणं गरजेचं असतं. म्हणूनच तर आपला स्किन टाईप ओळखायचा कसा, हे आपण सगळ्यात आधी जाणून घेऊ या.

 

त्वचेचा प्रकार ओळखण्यासाठी योग्य वेळ कोणती?
आपली त्वचा कशी आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला घरबसल्या एक सोपी टेस्ट करायची आहे. पण ती योग्य वेळी करणं खूप गरजेचं आहे. सकाळी जेव्हा तुम्ही झोपेतून उठता, तेव्हा इतर कोणतीही कामे करण्यापुर्वी टिश्यू पेपरच्या साहाय्याने ही टेस्ट करा. ज्या दिवशी टेस्ट करणार आहात, त्याच्या आदल्या रात्री चेहरा साबण, फेसवॉश या कशाचाही उपयोग न करता साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर चेहऱ्याला कोणतेही क्रिम, मॉईश्चरायझर लावू नका. साधा टिश्यू पेपर वापरून तुम्हाला ही टेस्ट कराची आहे. 

कशी करायची स्किन टाईप टेस्ट?


१. तेलकट त्वचा किंवा Oily skin
सकाळी उठल्यावर जर गाल, नाक, कपाळ हे चेहऱ्याचे भाग टिश्यू पेपरने पुसल्यावर जर टिश्यू पेपर तेलकट झालेला जाणवला, तर तुमची त्वचा ऑईली आहे हे ओळखावे. गालावर जर मोठ्या आकाराचे पोअर्स लगेच दिसून येत असतील, तरीही तुमची त्वचा तेलकट आहे, हे लक्षात घ्यावे. पिंपल्स येण्याचा त्रास अशा त्वचेला खूप जास्त जाणवतो. या त्वचेचा फायदा म्हणजे त्वचेवर लवकर सुरकुत्या येत नाहीत. 

 

२. सामान्य त्वचा किंवा Normal skin
टिश्यू पेपरने चेहरा पुसल्यास जर पेपरवर कोणत्याही प्रकारचे तेलाचे डाग दिसून आले नाहीत, तर तुमची त्वचा नॉर्मल म्हणजेच सामान्य प्रकारात मोडणारी आहे. अशा त्वचेवरचे पोअर्स लवकर दिसून येत नाहीत. मुळातच त्वचेचा पोत चांगला असल्याने या प्रकारच्या त्वचेची अधिक काळजी घेण्याची गरज नसते. 

३. संमिश्र त्वचा किंवा Combination Skin
संमिश्र त्वचेलाच टी झोन त्वचा असेही म्हणतात. ही त्वचा पुर्णपणे कोरडीही नसते आणि तेलकटही नसते. या प्रकारच्या त्वचेत कपाळ, नाक आणि हनुवटी या भागात तेल दिसून येते, तर उर्वरित ठिकाणची त्वचा कोरडीच असते. अशा त्वचेची काळजी घेणं खूप अवघड असतं. कारण या त्वचेची सुंदरता राखायची असेल तर दोन वेगवेगळ्या प्रकारचे ब्यूटी प्रोडक्ट्स वापरावे लागतात. ऑईली असणाऱ्या टी झोनसाठी ऑईल फ्री प्रोडक्ट्स तर इतर त्वचेसाठी वेगळे प्रोडक्ट्स वापरण्याचा सल्ला सौंदर्यतज्ज्ञ देतात. 

 

४. कोरडी त्वचा किंवा Dry Skin
टिश्यू पेपरवर जर तेलाऐवजी डेड स्किन पार्टिकल्स येत असतील तर तुमची त्वचा कोरडी आहे हे लक्षात ठेवा. 
साध्या पाण्याने धुतल्यानंतरही अशी त्वचा ओढल्यासारखी वाटते. या त्वचेवर लहान- लहान आकाराचे पोअर्स दिसून येतात. या त्वचेला मॉईश्चराईज ठेवण्याची खूपच जास्त गरज असते. कारण जर त्वचा व्यवस्थित मॉईश्चराईज केली नाही तर त्वचेवर सुरकुत्या यायला लगेचच सुरूवात होते. 

 

५. संवेदनशील त्वचा किंवा Sensitive Skin
अशा त्वचेची काळजी घेणे खुपच अवघड असते. कारण संवेदनशील त्वचा ही खूपच नाजूक असते. अशा त्वचेसाठी टिश्यू पेपर टेस्टचीही गरज नसते. चेहऱ्याला लावण्याचे कोणतेही प्रोडक्ट जर बदलले तर लगेचच रॅश येणे, त्वचा लालसर होणे, खाज येणे असा प्रकार सुरू झाला तर आपली त्वचा संवेदनशील आहे हे ओळखावे. वातावरणातील बदल किंवा थोडा वेळ जरी उन्हात, थंडीत गेल्यास या त्वचेवर लगेचच परिणाम दिसून येतो. 
 

Web Title: Skin Care: How to identify skin type? oily, dry, normal, mix or sensitive skin type

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.