Join us  

Skin Care: स्किन रिपेअर मास्क! घरीच तयार करा आणि फक्त ७ दिवस वापरा, त्वचा होईल मऊ- चमकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 5:23 PM

Beauty Tips: उन्हाळ्यात त्वचेचं कसं होणार ही चिंता आता सोडून द्या.. चेहरा डल वाटला, काळवंडला (dull skin) तर हा सोपा उपाय घरच्याघरी (home hack) करून पहा.. पुन्हा त्वचा होईल फ्रेश- टवटवीत...

ठळक मुद्देउन्हाळ्यात निस्तेज झालेल्या त्वचेसाठी हा होममेड स्किन रिपेअर मास्क वापरून बघा. हा मास्क एकदा तयार केला की तो तुम्ही ७ ते ८ दिवस फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणं हे खरोखरंच एक मोठं आव्हान असतं.. कारण कितीही सनस्क्रिन लावलं, उन्हात घराबाहेर पडताना चेहरा पॅक केला तरी व्हायचं ते त्वचेचं टॅनिंग होतंच (solution for tanning in summer) आणि चेहरा काळवंडतोच. उन्हाळ्यात त्वचेचं डिहायड्रेशन (dehydrated skin) होण्याचा त्रासही वाढतो. यामुळे त्वचा निस्तेज, डल दिसू लागते. चेहऱ्यावरचा सगळा ग्लो गेल्यासारखं वाटतं.. त्यामुळे महिन्यातून दोन वेळा तरी त्वचेची विशेष काळजी घेण्याची, फेसमास्क (special care for summer) लावण्याची गरज भासते.

 

म्हणूनच तर उन्हाळ्यात निस्तेज झालेल्या त्वचेसाठी हा होममेड स्किन रिपेअर मास्क वापरून बघा. हा मास्क एकदा तयार केला की तो तुम्ही ७ ते ८ दिवस फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. हा मास्क कसा तयार करायचा आणि त्यामुळे चेहऱ्याला कोणते फायदे होतात याविषयीच्या ब्यूटी टिप्स इन्स्टाग्रामच्या beautifulyoutips या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आल्या आहेत. Overnight skin repair mask अशी या मास्कची खासियत सांगण्यात आली आहे. हा मास्क लावून आमच्या त्वचेचा पोत खरोखरंच खूप सुधारला, चेहरा चमकदार आणि फ्रेश दिसू लागला, असा अनुभव या ब्यूटी टिप्स फॉलो करणाऱ्यांनी सांगितला आहे.  

 

कसा तयार करायचा स्किन रिपेअर मास्क? (how to make skin repair mask)- हा मास्क तयार करण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन सी च्या २ गोळ्या, २ व्हिटॅमिन ई कॅप्सूल, ४ टी स्पून गुलाबजल, २ टीस्पून ॲलोव्हेरा जेल एवढं साहित्य लागणार आहे. - यासाठी व्हिटॅमिन सी गोळ्या क्रश करून त्याची पावडर तयार करून एका बाऊलमध्ये घ्या.- त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सून फोडून टाका.- गुलाबजल, ॲलोव्हेरा जेल टाकून हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. आपला स्किन रिपेअर मास्क झाला तयार.

 

कसा लावायचा मास्क?- चेहऱ्यावर चांगला परिणाम दिसून यावा, यासाठी हा मास्क सलग ७ दिवस वापरावा.- दररोज रात्री झोपण्यापुर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.- त्यावर आपण तयार केला स्किन रिपेअर मास्क लावा.- १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. - चेहरा धुतल्यानंतर त्याला मॉईश्चरायझर लावण्यास विसरू नका.. 

 

मास्क लावण्याचे फायदे...१. चेहरा फ्रेश आणि टवटवीत दिसेल.२. चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स कमी होतील.३. चेहरा चमकदार दिसेल.४. त्वचेचं टॅनिंग कमी होईल.५. त्वचेचा स्किनटोन एकसारखा होण्यास मदत होईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसमर स्पेशल