तु लहानच आहेस, तुला कशाला स्किन केअर रुटीन हवं, असं हल्ली आपण टीनएजर्स मुलींना म्हणू शकत नाही. कारण हवेतलं, पाण्यातलं प्रदुषण, त्यांच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी याचा परिणाम त्वचेवर होताेच. त्यामुळे या वयातच मुलींनी त्यांच्या त्वचेची पुरेशी काळजी घ्यायला सुरुवात केली पाहिजे. यासाठी त्यांनी खूप महागडे कॉस्मेटिक्स वापरावे, त्यांची आई ज्या पद्धतीचं स्किन केअर रुटीन फाॅलो करते तसं करावं, असं मुळीच नाही (skin care tips for young girls). पण अशा काही साध्या- सोप्या गोष्टी आहेत, ज्या त्वचेचा पोत पुढे कित्येक वर्षे चांगला ठेवण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरू शकतात. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहा...(skin care routine for teen age girls)
टिनएजर्स मुलींनी त्वचेची काळजी कशी घ्यावी?
टिनएजर्स मुलींनी त्वचेची काळजी कशी घ्यावी, याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी काही साध्या- सोप्या टिप्स दिल्या आहेत, ज्या प्रत्येकीला अगदी सहज करता येतील.
पणत्या लावताना कपड्यावर तेल सांडलं तर चिमूटभर मीठ घेऊन 'हा' उपाय करा, डाग पडणार नाहीत...
१. व्हिडिओमध्ये सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टिनएजर्स मुलींनी त्यांच्या आईचे क्रिम घेऊन ते कधीही स्वत:च्या चेहऱ्यावर लावू नये. कारण आई ज्या वयात आहे, त्या वयासाठी असणारं कोणतंही क्रिम किशोरवयीन मुलींच्या त्वचेसाठी योग्य नसतं. यामुळे त्वचेवर ब्रेकआऊट्स होणे, त्वचा खराब होणे, पिगमेंटेशन असा त्रास होऊ शकतो.
२. दिवसातून २ वेळा थंड पाण्याने चेहरा धुवायलाच पाहिजे. चेहरा धुतल्यानंतर तो मऊ टॉवेलने टिपून घ्यावा. खूप जोरजोरात चेहरा घासू नये. तसेच चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळा.
३. किशोरवयीन मुलींच्या चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येतात. ते पिंपल्स कधीही फोडू नका. कारण त्यांचे डाग किंवा व्रण तुमच्या चेहऱ्यावर कायमसाठी राहू शकतात.
आता चवळीची शेंग झालेल्या अभिनेत्री बघा पुर्वी किती जाड होत्या- वजन कमी करण्यासाठी त्यांनी....
४. तुमच्या त्वचेसाठी सनस्क्रिन निवडताना ते ब्रॉड स्पेक्ट्रम या प्रकारात येणारं असावं.
५. मेकअप करायचा असेल तर कधीतरी करायला हरकत नाही. पण मेकअप न काढता कधीही झोपू नका. कारण यामुळे तुमच्या त्वचेवरील पोअर्स बंद होतात आणि मग त्वचेवर ब्रेकआऊट दिसून येते. यासोबतच संतुलित आहार घ्या आणि पुरेशा प्रमाणात पाणी प्या.