Join us  

'चक दे इंडिया'फेम सागरीका घाटगे सांगते चमकदार चेहऱ्याचे सिक्रेट; तिच्या चेहऱ्यावर कायम ग्लो दिसतो कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2023 2:17 PM

Skin Care Routine of Actress Sagrika Ghatge : सागरीका असं काय करते ज्यामुळे तिची त्वचा कायम चमकत असते

चित्रपटातील अभिनेत्रींची त्वचा मस्त चमकदार असते, आपण मात्र कितीही प्रयत्न केले तरी आपली तशी होत नाही असं आपल्याला अनेकदा वाटून जातं. पण त्या फॉलो करत असलेले स्कीन केअर रुटीन हे त्यामागील एक महत्त्वाचे कारण असते. उत्तम आहार, व्यायाम याबरोबरच या अभिनेत्री त्वचेची घेत असलेली काळजी खरंच कौतुकास्पद असते. 'चक दे इंडिया' फेम प्रसिद्ध अभिनेत्री सागरीका घाटगेही तिच्या ग्लोईंग स्कीनसाठी ओळखली जाते. गोरा रंग, छानशी उंची आणि तिची नितळ त्वचा यामुळे सागरीकाने अगदी कमी काळात रसिकांच्या मनावर राज्य केले. आता सागरीका असं काय करते ज्यामुळे तिची त्वचा कायम चमकत असते तर तिच्या या सुंदर त्वचेचे रहस्य सागरीकाने नुकतेच शेअर केले असून तिने स्कीन केअर रुटीनमधील काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या कोणत्या आणि त्याचा त्वचेला कसा फायदा होतो पाहूया (Skin Care Routine of Actress Sagrika Ghatge)...

१. सिरम- ग्लोईंग स्कीनसाठी उत्तम बेस

सिरम त्वचेत खोलवर मुरते आणि त्यामुळे त्वचा दिर्घकाळ हायड्रेट राहण्यास मदत होते. सागरीका सांगते त्वचा कायम उजळ राहावी यासाठी सिरम हे एक महत्त्वाचे सिक्रेट आहे. चांगले सिरम तुमच्या त्वचेला सुरकुत्या पडण्यापासून ते त्वचेतील ओलावा टिकून राहण्यापर्यंत बऱ्याच गोष्टींसाठी फायदेशीर असते. 

२. अंडर आय क्रिम - डार्क सर्कल आणि पफीनेस घालवण्यासाठी उत्तम उपाय

बऱ्याच जणींना विविध कारणांनी डोळ्यांखाली काळे डाग येतात. इतकेच नाही तर आरोग्याच्या तक्रारी किंवा झोप कमी जास्त झाली तर डोळ्याखाली सुजल्यासारखे वाटते. याचा सौंदर्यावर परीणाम होत असल्याने डोळे चांगले दिसण्यासाठी अंडर आय क्रिम वापरणे अतिशय उपयुक्त असते. डोळे थकलेले असतील अशावेळी तुम्हाला कॅमेराला सामोरे जायचे असो किंवा एखाद्या कार्यक्रमाला या क्रिममुळे डोळ्यांचे सौंदर्य वाढण्यास निश्चितच मदत होते. 

३. मॉईश्चरायजर - त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवणारा घटक

त्वचेला मॉईश्चराइज करणे ही स्कीनकेअर मधील एक अतिशय महत्त्वाची स्टेप आहे. बरेचदा विविध कारणांनी आपली त्वचा कोरडी पडते. मात्र आपण नियमितपणे सकाळी आणि रात्री मॉइश्चरायजर लावत असू तर त्वचा मुलायम राहण्यास मदत होते. चांगले मॉईश्चरायजर केवळ त्वचा मुलायम ठेवते असे नाही तर हवेतील प्रदूषित घटकांपासून आपली सुरक्षा करण्यासही त्याचा चांगला उपयोग होतो. 

४. सनस्क्रिन - अतिशय महत्त्वाची स्टेप

स्कीनकेअर रुटीनमध्ये सनस्क्रिनला अतिशय महत्त्व आहे. मात्र आपण घराबाहेर पडताना ते लावण्याचा कंटाळा करतो. मात्र सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होण्यासाठी सनस्क्रिन अतिशय फायदेशीर असते. म्हणूनच सागरीका न चुकता सनस्क्रिनचा वापर करते आणि त्वचा सुरक्षित राहील याची काळजी घेते. ही स्टेप सोपी असून ती त्वचा चांगली राहण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे याचे महत्त्व सागरीकाला पटले आहे. तसेच दिर्घकाळ तरुण दिसावं यासाठीही सनस्क्रीन अतिशय फायदेशीर ठरते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसागरिका घाटगे