बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt Birthday Special) आज वाढदिवस आहे. कमी वयातच आलियाने करीयरमध्ये भरारी घेतली आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत आलियाचा समावेश आहे. फिटनेस आणि नॅच्युरल ब्युटीसाठी आलिया भट्ट ओळखली जाते. (Alia Bhatt) जास्तीत जास्त लोक आलिया भट्ट तिच्या ग्लोईंग फेससाठी कोणतं स्किन केअर रूटीन फॉलो करते यासाठी उत्सुक असतात. नेहमीच आलियाचे फॅन्स तिचे स्किन केअर रूटीन जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आलिया अनेकदा तिच्या स्किन केअर रूटीनचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (Skin Care Routine Of Alia Bhatt)
आलिया भट्टचे स्किन केअर रूटीन
आलियाच्यामते स्किन केअरची सगळ्यात आधीची स्टेप आहे क्लिजिंग करणं. ज्यामुळे चेहऱ्यावरची घाण साफ होण्यास मदत होते आणि चेहऱ्यावर तेज येते. यासाठी सकाळी उठल्यानंतर आलिया आपल्या त्वचेला डिप क्लिजिंग करते.
1) स्किन टोन आणि मसाज
क्लिंजिंग केल्यानंतर आलिया आपल्या स्किन टोनला मसाज करण्यासाठी रोलरचा वापर करते. तिच्यामते क्लिजिंग केल्याने फेसचे मसल्स रिलॅक्स होता आणि चेहऱ्यावर ग्लो येतो. आलिया आपल्या त्वचेवर 2 ते 3 मिनिटं मसाज रोलरचा वापर करते.
2) तिसरी स्टेप आयक्रिम
आलिया आपल्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आयक्रिमचा वापर करते. ज्यामुळे डोळ्यांची सूज कमी होते आणि डार्क सर्कल्सपासूही आराम मिळतो.
केस खूपच पातळ झालेत? दाट-लांब केसांसाठी खा 'हे' ५ आंबट पदार्थ, पटापट वाढतील केस
3) नियासिनमाईड सिरम
स्किन केअर रुटीनमध्ये नियासिनमाईडचा वापर आलियाला फार आवडतो. यात व्हिटामीन बी-3युक्त प्राकृतिक गुण असतात ज्यामळे स्किनमधून एस्ट्रा ऑइल निघण्यास मदत होते. यामुळे डार्क स्पॉट्स, फाईन लाईन्स आणि रिंकल्सची समस्याही कमी होते.
4) कॅफेन सोल्यूशन ड्रॉप
आलिया आयक्रिमनंतर डोळ्यांवर कॅफेन सोल्यूशन ड्रॉपही लावते. ज्यामुळे दिवसभर फ्रेश फिल होतं आणि डोळ्यांवर सूजही येत नाही.
जास्वंदाला मुंग्या लागतात-फुलंच येत नाही? रोपात ही वस्तू मिसळा; बहरेल जास्वंद-भराभर फुलं येतील
5) मॉईश्चरायजर लावा
आलियाला आपल्या त्वचेला मॉईश्चराईज करायला कधीच विसरत नाही. तिच्यामते हेल्दी स्किनसाठी त्वचेला मॉईश्चराईज करणं फार महत्वाचे असते. यामुळे डार्क स्पॉट्स, डल स्किन, ड्राय स्किनची समस्या उद्भवत नाही आणि त्वचा ग्लोईंग दिसते.
6) सन्स्क्रीन विसरू नका
स्किन केअरसाठी शेवटच्या स्टेपमध्ये आलिया सनस्क्रीन लावते. ऊन्हापासून बचावासाठी आणि ब्लू रेज पासून बचाव करण्यासाठी तुम्ही सनस्क्रीनचा वापर करायला हवा.