Join us  

Skin Care Tips : डोळ्यांजवळ जमा झालेल्या कॉलेस्ट्रॉलच्या खुणा कशा घालवाल? जाणून घ्या योग्य उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 12:20 PM

Skin Care Tips : कॉलेस्ट्रॉल वाढल्यानंतर डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवर एक पापुद्याप्रमाणे पिवळसर त्वचा तयार होते. याला जँथेलाज्मा (xanthelasma) असंही म्हटलं जातं. 

ठळक मुद्देइलेक्ट्रिक नीडल डोळ्यांजवळ जमा झालेलं कोलेस्टेरॉल काढून टाकण्याचा एक नवीन मार्ग आहे. या उपचाराला इलेक्ट्रोडेसिकेशन म्हणतात. लेजर टेक्निकच्या मदतीने डोळ्यांवर जमा झालेला हा कोलेस्टेरॉलचा थर काढून टाकता येतो. लेझरने त्वचेचा थर काढून टाकल्यानंतर काही दिवसांनी नवीन त्वचा येते, जी पूर्वीसारखीच निरोगी असते.

डोळ्यांजवळ अनेकदा पापुद्राप्रमाणे त्वचा तयार होते. अनेक लोक याला साधा त्वचा रोग समजून या डागांकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा  हा त्वचारोग नसल्यानं क्रिम लावूनही काही फायदा होत नाही. डोळ्यांखाली आसपास लहान लहान पॅचेस तयार होतात आणि दाणे उभरल्यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. कॉलेस्ट्रॉल वाढल्यानंतर डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवर एक पापुद्याप्रमाणे पिवळसर त्वचा तयार होते. याला जँथेलाज्मा (xanthelasma) असंही म्हटलं जातं. 

अशाप्रकारे कोलेस्टेरॉल जमा होणं व्यक्तीला हृदयविकाराचा धोका असल्याचे लक्षण असू शकतं. जरी ही खवलेयुक्त त्वचा तुम्हाला हानी पोहचवत नाही, परंतु काही वेळा चेहऱ्यावर डाग दिसल्यामुळे लोकांना ते काढायचे असतात. असे डाग काढून टाकण्याच्या काही उपचार पद्धती आहेत त्या लक्षात घ्यायला हव्यात.

लेजर टेक्निक

लेजर टेक्निकच्या मदतीने डोळ्यांवर जमा झालेला हा कोलेस्टेरॉलचा थर काढून टाकता येतो. लेझरने त्वचेचा थर काढून टाकल्यानंतर काही दिवसांनी नवीन त्वचा येते, जी पूर्वीसारखीच निरोगी असते. त्वचा बरे होण्यास 1-2 आठवडे लागू शकतात. यासाठी तुम्ही चांगल्या त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. लेजर काढणे आजकाल सामान्य आहे आणि हे उपचार बहुतेक ठिकाणी उपलब्ध असतात.

सर्जरी

जर कोलेस्टेरॉल खूप खोल असेल आणि स्तर जाड असेल तर लेजर टेक्निक कार्य करू शकत नाही. अशा परिस्थितीत, आपण सर्जरी करू शकता. पण समस्या अशी आहे की अनेक वेळा शस्त्रक्रियेनंतर कोलेस्टेरॉलचे साठे काढून टाकले जातात, पण शस्त्रक्रियेचे चट्टे कायम राहतात. कधीकधी बरे होताना त्वचेचे टिश्यू चुकीच्या पद्धतीनं जोडले जातात. ज्यामुळे पापण्या तिरकस होऊ शकतात आणि त्यांचा आकार खराब होऊ शकतो.

केमिकल पील्स

जर तुम्हाला लेजर ट्रिटमेंट किंवा शस्त्रक्रिया दोन्ही करायचे नसतील तर तुम्ही केमिकल पील्सच्या मदतीने अशा कोलेस्टेरॉलचे साठे देखील काढू शकता. या उपचारात ते ट्रायक्लोरोएसेटिक एसिडच्या मदतीने काढले जाते. पण या उपचारात एक समस्या अशीही आहे की कधीकधी रुग्णाची त्वचा संवेदनशील असते आणि केमिकल्सचा शरीरावर दुष्परिणाम होतो. म्हणून ही  उपचार पद्धती शक्यतो टाळली जाते. 

फ्रिज थेरेपी

आजकाल डॉक्टर क्रायोथेरपीद्वारे जमा झालेलं कोलेस्टेरॉल काढून टाकत आहेत. त्वचेपासून डाग दूर करण्याची ही एक आधुनिक पद्धत आहे, जी अगदी सुरक्षित आणि वेदनारहित आहे. पण हे करताना, तज्ञांचे मत निश्चितपणे विचारात घ्यायला हवं. कारण उपचारानंतर अनेक वेळा, हायपोपिग्मेंटेशनमुळे, कोलेस्टेरॉल जमा झालेल्या ठिकाणी त्वचेचा रंग हलका होतो, ज्यामुळे तो वेगळा दिसतो.

इलेक्ट्रिक नीडल

इलेक्ट्रिक नीडल डोळ्यांजवळ जमा झालेलं कोलेस्टेरॉल काढून टाकण्याचा एक नवीन मार्ग आहे. या उपचाराला इलेक्ट्रोडेसिकेशन म्हणतात. या उपचारात डॉक्टर गरम सुईच्या मदतीने त्वचा जाळतात आणि अतिरिक्त भाग काढून टाकतात. आपल्या शरीराचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःच दुरुस्त करते. म्हणून, इलेक्ट्रिक सुई उपचारानंतर, त्वचा लवकरच बरी होते आणि पूर्वीसारखीच होते. पण या उपचारानं खोलवर जमा झालेले कोलेस्टेरॉल काढून टाकू शकत नाही. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यब्यूटी टिप्स