Lokmat Sakhi >Beauty > व्हिटॅमिन सी असणारं सिरम चेहऱ्याला लावण्याची ६ कारणं; निवडा योग्य सिरम

व्हिटॅमिन सी असणारं सिरम चेहऱ्याला लावण्याची ६ कारणं; निवडा योग्य सिरम

Beauty tips: चेहऱ्याला मॉईश्चरायझर तर आपण नेहमीच लावतो.. पण त्याचसोबत त्वचेला जास्तीचं पोषण मिळण्यासाठी सिरम लावण्याचीही गरज असते. सिरम लावल्यामुळे चेहऱ्याला मिळणारे हे काही फायदे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2022 02:33 PM2022-01-29T14:33:50+5:302022-01-29T14:34:34+5:30

Beauty tips: चेहऱ्याला मॉईश्चरायझर तर आपण नेहमीच लावतो.. पण त्याचसोबत त्वचेला जास्तीचं पोषण मिळण्यासाठी सिरम लावण्याचीही गरज असते. सिरम लावल्यामुळे चेहऱ्याला मिळणारे हे काही फायदे...

Skin care tips: 6 benefits of using serum having vitamin C.  | व्हिटॅमिन सी असणारं सिरम चेहऱ्याला लावण्याची ६ कारणं; निवडा योग्य सिरम

व्हिटॅमिन सी असणारं सिरम चेहऱ्याला लावण्याची ६ कारणं; निवडा योग्य सिरम

Highlightsत्वचेचं योग्यप्रकारे पोषण होण्यासाठी ज्या सिरममध्ये व्हिटॅमिन सी आहे, असं सिरम विकत घेण्यास प्राधान्य द्यावं. 

त्वचा तरूण ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी (vitamin C) अतिशय गरजेचं आहे.. म्हणूनच तर व्हिटॅमिन सी ला त्वचेसाठीचं पॉवर हाऊस म्हटलं जातं. त्यामुळेच आहारातूनही जास्तीतजास्त व्हिटॅमिन कसं मिळेल, याकडे लक्ष देण्याची गरज असते. पण बऱ्याचदा आपल्या आहारातून त्वचेला योग्य पोषण मिळत नाही आणि त्यामुळे त्वचा निस्तेज होते किंवा मग चेहऱ्यावर वय वाढल्याच्या खाणाखुणा अकाली दिसू लागतात. हे सगळं टाळण्यासाठी आणि त्वचेला ज्याची गरज आहे, ते देण्यासाठी व्हिटॅमिन सी असणारं सिरम (benefits of serum for skin) वापरणं गरजेचं आहे. 

 

त्यामुळेच तर सिरम हा अनेक जणींच्या स्किन केअर रूटीनचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्वचा चमकदार होण्यासाठी तसेच डेड स्किन काढून टाकण्यासाठी नियमितपणे सिरम लावणं गरजेचं आहे. त्वचेचं योग्यप्रकारे पोषण होण्यासाठी ज्या सिरममध्ये व्हिटॅमिन सी आहे, असं सिरम विकत घेण्यास प्राधान्य द्यावं. 

त्वचेला सिरम लावण्याचे फायदे
१. त्वचेचा ओलावा टिकून राहतो (hydrates skin)

रुक्ष, कोरड्या त्वचेवर अकाली सुरकुत्या येऊ लागतात. त्यामुळे त्वचेतली पाण्याची पातळी संतुलित राहणे गरजेचे आहे. सिरम लावल्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते. त्यामुळे ती टवटवीत आणि चमकदार दिसते. त्वचेतलं अतिरिक्त ऑईल काढून टाकण्यासाठीही सिरम उपयुक्त आहे.

 

२. त्वचेचा टोन एकसारखा होतो.. (even skin tone)
बऱ्याचदा आपल्या चेहऱ्याच्या त्वचेचा टोन वेगवेगळा असतो. कपाळावरची त्वचा जशी असते, तशी आपल्या गालावर नसते. किंवा हनुवटी आणि गाल, कपाळाची त्वचा वेगवेगळ्या रंगाची असते. सिरम लावल्यामुळे त्वचेचा टोन एकसारखा किंवा एकसमान राहण्यास मदत होते.

३. डोळ्यांभोवतीची काळी वर्तूळे कमी होतात.. (dark circles around eyes)
बहुसंख्य मैत्रिणींना हा त्रास जाणवतो. आहारातील कमतरता, वाढलेला स्क्रिन टाईम किंवा अशक्तपणा यामुळे अनेक जणींच्या डोळ्यांभोवती काळी वर्तूळे दिसतात. व्हिटॅमिन सी असणारं सिरम वापरल्यास हा त्रास कमी होऊ शकतो. सिरममध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करतात. 

 

४. त्वचेचा पोत सुधारतो (improves skin texture)
व्हिटॅमिन सी असणारं सिरम लावल्यामुळे त्वचेचं टेक्स्चर म्हणजेच त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. डेड स्किन निघून जाते आणि त्वचा फ्रेश, टवटवीत दिसू लागते. त्वचेसाठी आवश्यक असणाऱ्या कोलॅजीनची निर्मिती होण्यासाठीही सिरम उपयुक्त ठरतं. 

५. एजिंग प्रोसेस मंदावते (slow downs aging process)
त्वचेला पोषण मिळालं नाही तर त्वचेवर अकाली सुरकुत्या येऊ लागतात. त्यामुळे वय वाढल्यासारखं वाटतं. पण सिरमच्या माध्यमातून त्वचेला नियमितपणे व्हिटॅमिन सी मिळाल्यास त्वचा टवटवीत दिसते आणि एजिंग प्रकिया मंदावते. तसेच त्वचेतला ओलावा टिकून राहिल्यामुळे त्वचा सुरकुतत नाही. 

 

६. त्वचा होते नितळ, चमकदार (glowing and flawless skin)
त्वचा चमकदार राहण्यासाठी व्हिटॅमिन सी असणारं सिरम उपयुक्त ठरतं. चेहऱ्यावरचे डाग, पिगमेंटेशन काढून टाकण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. त्यामुळे त्वचा नितळ होते.  
 

Web Title: Skin care tips: 6 benefits of using serum having vitamin C. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.