Join us  

सणसमारंभाना त्वचा सुंदर-मुलायम हवी तर टाळा ३ चुका, त्वचारोगतज्ज्ञ सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2022 2:36 PM

Skin Care Tips Avoid 3 Mistakes : त्वचा चांगली व्हावी यासाठी माहिती न घेता घरीच नाही ते प्रयोग करणे महागात पडू शकते.

ठळक मुद्देचेहऱ्यावर कोणत्याही गोष्टी वापरण्याआधी योग्य तो सल्ला घेतलेला केव्हाही चागंलाअनेकदा मनाने किंवा माहिती न घेता केलेले उपाय अपायकारक ठरु शकतात

सणवार असले की आपण सुंदर दिसायला हवे असे आपल्याला साहजिकच वाटते. त्वचा मुलायम आणि सतेज हवी तर त्यासाठी आपली तब्येत चांगली असण्याची आवश्यकता असते. आपले पोट साफ असेल, मन शांत असेल, झोप चांगली झालेली असेल तर नकळत चेहऱ्यावर ग्लो येतो. इतकेच नाही तर व्यायामामुळे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकले जातात आणि त्वचा नितळ दिसण्यास मदत होते. अनेकदा आपल्याला घाईत कुठेतरी जायचं असतं म्हणून आपण चेहऱ्यावर काहीतरी प्रयोग करतो. मात्र अशा गोष्टींमुळे चेहरा चांगला दिसण्याऐवजी आणखीनच खराब होण्याची शक्यता असते. चेहऱ्यावरचे डाग, सुरकुत्या, पिंपल्स लपवण्यासाठी एकवेळ मेकअप करणे ठिक पण त्वचा चांगली व्हावी यासाठी माहिती न घेता घरीच नाही ते प्रयोग करणे महागात पडू शकते. व्होग वेबसाइटने याबाबत काही त्वचारोगतज्ज्ञांशी संवाद साधला असता त्यांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत (Skin Care Tips Avoid 3 Mistakes).  

(Image : Google)

१. केमिकल असणारे फेस पिल ऑफ वापरणे टाळा

आपण अनेकदा बाजारातून फेसमास्क आणतो. या मास्कमध्ये काय कंटेंट असतो याबाबत आपल्याला माहिती नसते. मात्र चेहरा चांगला दिसावा यासाठी आपण कोणाच्या सांगण्यावरुन एखादा फेसमास्क आणतो. पण त्यामध्ये काही केमिकल्स असतील आणि ते आपल्या त्वचेला सूट होणारे नसतील तर मात्र आपला चेहरा चांगला होण्याऐवजी आहे त्यापेक्षा जास्त खराब होण्याची शक्यता असते. रॅश येणे, त्वचा जळल्यासारखी होणे, कोरडी होणे, फोड येणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला केव्हाही चांगला असे डॉ. माधुरी अग्रवाल सांगतात. 

२. चेहऱ्यावर सुईसारख्या गोष्टींचा वापर करणे 

काही वेळा ब्लॅकहेडस, व्हाईटहेडस काढण्यासाठी किंवा फोड फोडण्यासाठी काही जण सुई, सेफ्टी पीन किंवायासारख्या टोकदार गोष्टीचा वापर करतात. पण अशाप्रकारे चेहऱ्यासाठी टोकदार गोष्ट वापरणे अतिशय घातक ठरु शकते. तेव्हा आपल्याला या गोष्टीचे गांभिर्य लक्षात आले नाही तरी चेहरा अशाप्रकारे कोरल्याने त्वचेची वाट लागण्याची शक्यता असते. यामुळे त्वचेचे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फक्शन्स होऊ शकतात. त्यामुळे असे प्रकार न करता योग्य ते उपचार करावेत असे डॉ. प्रतीक सोंधी सांगतात. 

(Image : Google)

३. चेहऱ्यारवर सायट्रीक गोष्टी लावू नका

आस्था खंडेलवाल जैन सांगतात, लिंबूवर्गीय फळांमध्ये चेहरा उजळवण्यासाठी आवश्यक असणारे घटक असतात. मात्र या गोष्टींचा वापर केल्यास चेहरा लाल होणे, रॅशेस येणे, इरीटेशन होणे अशा समस्या उद्भवू शकतात. या फळांमध्ये असणारे घटक त्वचेला अॅलर्जी येण्यास कारणीभूत ठरतात. लिंबू, संत्रे यांसारख्या गोष्टी जास्त प्रमाणात अॅसिडीक असल्याने घरगुती फेसपॅक किंवा आणखी कशात या गोष्टी घालताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. त्यापेक्षा लिंबाची पावडर करुन ती वापरल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी