डॉ. अपर्णा संथानम
सध्याच्या बाजारपेठेत त्वचेची काळजी घेण्यासंदर्भात फारच गोंधळ आणि गैरसमज आहेत. अशा परिस्थितीत, त्वचेला अगदी साध्या मात्र परिणामकारक पद्धतीने मॉइश्चराइज करण्यासाठी कोकोनट-बेस्ड तेलासारख्या नैसर्गिक, काळाच्या कसोटीवर खऱ्या उतरलेल्या आणि वैज्ञानिक स्वरुपावर सिद्ध झालेल्या घटकांचा वापर करणं योग्य राहील. शिवाय अशा तेलांमध्ये त्वचेला संरक्षण देण्याच्या आणि संरक्षणात्मक कवच तयार करण्याच्या क्षमताही असतात, ही तेलं प्रदूषणाचा सामना करू शकतात आणि त्वचेतील हायड्रेशन कायम ठेवून ती तरुण ठेवू शकतात. त्यामुळे, या हिवाळ्यात आपल्या रोजच्या सवयींमध्ये त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी या तेलांचा समावेश करायला हवा.
मी तुम्हाला हे नव्याने सांगण्याची गरज नाही की आईच्या दुधाव्यतिरिक्त कोकोनट-बेस्ड तेल हा नैसर्गिक लॉरिक अॅसिडचा एकमेव स्रोत आहे. आपल्या रोजच्या जीवनात या तेलाचा वापर करण्यापूर्वी कोकोनट-बेस्ड तेलातील हा घटक इतका महत्त्वाचा का आहे, हे समजून घ्यायला हवं. कोकोनट-बेस्ड तेलात सापडणाऱ्या लॉरिक अॅसिडमध्ये अँटीमायक्रोबायल प्रॉपर्टीज असतात. ज्यामुळे त्वचेवरील विषाणू मारले जातात आणि त्वचेची जळजळ कमी करण्यावरील तो एक वैज्ञानिकरित्या सिद्ध झालेला उपाय आहे. वायू प्रदूषण आणि वातावरणातील सूक्ष्म घटकांमुळे झालेले त्रासही यातून कमी होतात.
कोकोनट-बेस्ड तेलात त्वचेमध्ये आतपर्यंत झिरपण्याचं वैशिष्ट्य असल्यामुळे हे तेल त्वचेत शोषलं जातं आणि त्यातून त्वचेच्या आतल्या बाजूला प्रतिबंधात्मक लेअर तयार केली जाते. जणू काही त्वचेच्या आत एक छत्री उघडली जाते आणि त्यात त्वचेतील मॉइश्चर टिकून राहतं. त्यामुळे ट्रान्स एपिडर्मल वॉटर लॉस कमी होतो आणि फक्त ६० मिनिटांत त्वचेचं हायड्रेशन सुमारे ३० टक्क्यांनी वाढतं. मात्र, हे तेल अतिप्रमाणात लावल्यास हे तेल संरक्षक आवरणासारखं किंवा मलमासारखं त्वचेच्या बाहेरच्या बाजूला पसरतं आणि आर्द्र वातावरणात ते चिपचिपित वाटतं. तेल लावल्यानंतर अतिरिक्त तेल नेहमी टिश्यू पेपरने हळुवार पुसून काढा. कारण या तेलाची लेअर आतल्या बाजूने तुमच्या त्वचेला सातत्याने मॉइश्चर करणारच असते.
कोकोनट बेस्ड स्किन ऑईलमध्ये फॅटी अॅसिड्स असतात. हे अॅसिड म्हणजे ट्रायग्लिसरइाड्सची मध्यम पातळी आहे आणि त्वचेतही हाच नैसर्गिक घटक असतो. त्यामुळे, आपोआप त्वचेच्या संरक्षणात्मक पातळीत वाढ होते. त्याचप्रमाणे, कनेक्टिव्ह टिश्यूवरही या तेलांचा चांगला परिणाम होतो. त्यातून त्वचा अधिक सुदृढ बनते आणि कोलॅजनची पातळी वाढून त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यात साह्य होते.
मात्र, तुमची त्वचा तेलकट असेल तर तुमच्या त्वचेची पोर्स फार चटकन बंद होतात आणि तुम्हाला सतत ब्लॅकहेड्सचा त्रास होत असेल तर त्वचेवरील तेलकटपणा कमी होईपर्यंत तुम्ही कोकोनट बेस्ड तेल लावणं टाळायला हवं. मात्र सातत्याने पिंपल्स येणाचा त्रास नसेल तर कोकोनट बेस्ड ऑईल तुमच्या रोजच्या स्किनकेअर रुटिनमध्ये फार छान पर्याय ठरेल.
कोकोनट बेस्ड तेलाचे त्वचेला अनेक फायदे मिळतात. त्यातील काही मुख्य फायदे
अँटीबॅक्टेरिअल: कोकोनट बेस्ड तेलामध्ये लॉरिक अॅसिड असतं. यातील अँटीमायक्रोबायल गुणधर्मांमुळे त्वचेवरील बॅक्टेरिया मारले जाता आणि त्वचेची जळजळ कमी होते.
एक्सफ्लोएटिंग: कोकोनट बेस्ड तेलामुळे त्वचेवरील मृत त्वचेचा थर काढून टाकला जातो ज्यामुळे तुमची त्वचा अधिक मऊमुलायम बनते.
त्वचेला संरक्षण: आतल्या बाजूला संरक्षणात्मक आवरण तयार करून हे कोकोनट बेस्ड तेल संरक्षणात्मक क्षमता वाढवतात आणि त्वचेला प्रदूषण, कोरडे थंड हवामान, अयोग्य जीवनशैलीच्या सवयी अशा बाह्य घटकांपासून संरक्षण देतात.
मेकअप रिमुव्हर म्हणूनही उपयोगी: दिवसभरानंतर चेहऱ्यावरचा मेकअपचा थर पुसून काढण्यासाठी कोकोनट बेस्ड तेल हा उत्तम आणि फार परिणामकारक पर्याय आहे. अनेक मेकअप रिमुव्हरमुळे त्वचा कोरडी पडते. तो त्रासही यात होत नाही.
त्वचा बनते मऊमुलायम: कोकोनट बेस्ड तेल त्वचेतील कोलॅजनला चालना देतात हे वैज्ञानिकदृष्टया सिद्ध झालं आहे आणि यातील फॅटी अॅसिडच्या मध्यम साखळीमुळे त्वचा मऊशार होते आणि अधिक तरुण दिसते.
सुरकुत्याचं प्रमाण कमी होतं : कोकोनट बेस्ड तेल तुमच्या त्वचेत आणि कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये चटकन सामावलं जातं आणि कनेक्टिव्ह टिश्यू बळकट आणि लवचिक झाल्यामुळे फाइन लाइन्स, सुरकुत्या दिसणं कमी होतं.
मऊशार त्वचा: कोकोनट बेस्ड तेलात मुबलक प्रमाणात मध्यम साखळीतील फॅटी अॅसिड्स असतात, त्यामुळे तुमच्या त्वचेतील मॉइश्चरचं प्रमाण योग्य राखलं जातं. परिणामी तुमची त्वचा सिल्की स्मूद दिसतेही आणि तिचा स्पर्शही तसाच वाटतो.
जळजळ कमी होते: २०१९ मध्ये झालेल्या संशोधनानुसार कोकोनट बेस्ड तेलामुळे जळजळीला कारणीभूत घटकांचा परिणाम कमी केला जातो आणि त्वचेतील संरक्षणात्मक क्षमता वाढवून त्वचेला जपलं जातं. त्यामुळे त्वचेला प्रदुषणापासून संरक्षण देण्याची क्षमताही वाढते.
मॉइश्चर त्वचेत लॉक होतं: कोकोनट बेस्ड तेलामध्ये ट्रान्स एपिडर्मल वॉटर लॉस (TEWL) लक्षणीय प्रमाणात कमी करण्याचे गुणधर्म आहेत. शिवाय त्यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावरील लिपिड पातळी वाढते आणि त्वचेत आधीपासून असणाऱ्या लिपिड स्ट्रक्चरला बळकटी मिळते. त्यामुळे साबण, शॅम्पू, आर्द्रता, तापमान इत्यादींच्या परिणामाला त्वचा अधिक चांगल्या प्रकारे सामोरी जाऊ शकते.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न अर्थात FAQs -
मॉइश्चरायझेशन आणि हायड्रेशनसाठी कोकोनट बेस्ड तेल कसं वापरायचं?
विशेषत: हिवाळ्यात, त्वचा फारच डीहायड्रेटेड होते आणि खाज सुटते. त्वचेला पुन्हा हायड्रेट करण्यासाठी तसेच खाज कमी करून ती थांबवण्यासाठी तुम्ही कोकोनट बेस्ड तेल मॉइश्चरायझर म्हणून वापरू शकता. सर्वप्रथम एखाद्या जेंटल क्लीन्झरने चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर तेलाचे तीन ते चार थेंब तळहातावर घेऊन ते नीट चोळा. आता या तेलाचे छोटे ठिपके चेहरा आणि मानेवर लावा. हलक्या हाताने चेहऱ्यावर गोलाकार दिशेला मालिश करा. मानेला वरच्या दिशेने मालिश करा. मी कोकोनट बेस्ड तेल शक्यतो रात्रीच्या वेळेला लावते त्यामुळे ते रात्रभर त्वचेवर काम करतं.
कोणत्याही प्रकारचे अशुद्ध घटक त्वचेवर लागू नयेत यासाठी तुम्ही चांगल्या दर्जाचं, ख्यातनाम कोकोनट बेस्ड तेल विकत घेताय याची खातरजमा करा. काही मिनिटे हे तेल त्वचेत शोषलं जाऊ द्या त्यानंतर अतिरिक्त तेल मऊ, कोरड्या टिश्यूने पुसून काढा. तुम्ही सीरम वापरणार असाल तर पाच मिनिटांनंतर तेलावर सीरमची अगदी हलकी लेअर लावा.
मेकअप रिमूव्हर म्हणून कोकोनट बेस्ड तेलाचा वापर कसा करायचा?
कोकोनट बेस्ड तेलाचा मेकअप रिमूव्हर म्हणून वापर करताना आधी तळव्यांवर तेल घेऊन तळवे काहीसे कोमट होइपर्यंत चोळा त्यानंतर ते चेहऱ्यावर हळुवार चोळा. दिवसभराचा सगळा थकवा या तेलामुळे निघून जाईल. शेवटी कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि नंतर कोरडा करा. त्यानंतर तुम्ही हलकं मॉइश्चरायझर किंवा पुन्हा कोकोनट बेस्ड तेलाचे काही थेंब चेहऱ्याला लावू शकता. त्यामुळे त्वचेतील मॉइश्चरायझर टिकून राहील.
लेखिका डर्माटोलॉजिस्ट आहेत